Use Of Agricultural Implements
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की अवजारांच्या वापरामुळे पीक उत्पादन खर्च कमी करण्यास कशा प्रकारे मदत मिळू शकेल
.रोटावेटर:-
रोटावेटर हे यंत्र ट्रॅक्टरचलित यंत्र असून यामध्ये जे किंवा एल आकाराचे 24 ते 26 लोखंडाचे पाते बसविलेले असतात. यंत्राची लांबी 120 चे 150 सेंटीमीटर असते. रोटावेटर च्या वापरामुळे जमिनीची नांगरणी केल्यानंतर उठलेले ढेकूळ फोडण्यासाठी मुख्यत्वे करून केला जातो. यासोबतच जमिनीवर पडलेली पाचट, काही पिकांचे अवशेष यांचे बारीक तुकडे करून जमिनीमध्ये मिसळले जाते. त्यामुळे जमिनीमध्ये कंपोस्ट खत तयार होते. एका तासात या अवजाराने एक ते दीड एकर क्षेत्राची मशागत होते.
Use Of Agricultural Implements
नांगरणीनंतर तयार होणारी मोठी ढेकळे फोडून जमीन पेरणी योग्य करण्यासाठी तव्यांचा कुळव याचा उपयोग होतो. तव्यांचा व्यास चाळीस ते साठ सेंटीमीटर असून ते 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर लावलेले असतात.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
ट्रॅक्टरचलित हवा दबाव आधारित टोकण यंत्र:-
या यंत्रामुळे पेरणी दरम्यान दोन ओळीतील अंतर, खोली व रोपातील अंतर अचूकपणे साधणे शक्य होते. हे यंत्र भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले आहे. 35 ते 45 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरला यंत्र जोडता येते. तसेच या यंत्राची कार्यक्षमता 0.5 ते 1.0 प्रति तास आहे. या यंत्राने ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, भुईमूग, भेंडी इत्यादी पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
रुंद वरंबा आणि सर यंत्र:-
बियाण्याचे असमान वाटप, कुशल मजुरांची टंचाई, कमी कार्यक्षमता याचा विचार करून रुंद वरंबा व सरी यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र सोयाबीन, मका, हरभरा, भुईमूग , ज्वारी, बाजरी, उडीद, मूंग, वाटाणा, गहू इत्यादी पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या तबकड्या असून त्या सहज बदलता येतात. तसेच प्रत्येक ओळीसाठी फन असल्यामुळे बियाणे व खतांची योग्य प्रकारे पेरणी करता येते. दोन फणातील अंतर आवश्यकतेनुसार नव्हते 18 इंचापर्यंत ठेवता येते. या यंत्रांच्या दोन्ही बाजूंना संयंत्र असल्यामुळे पेरणी करताना सऱ्या पाडल्या जातात. या सरींमुळे कमी पाऊस पडल्यास जलसंवर्धन होते तर जास्त पाऊस पडल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. हे यंत्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विकसित करण्यात आले आहे.
ट्रॅक्टरचलित कोळपे:-
ट्रॅक्टर चलित कोळप्याला v आकाराचे पाते असून एकाच वेळी तीन ते पाच ओळीतील गवत काढले जाते. एका दिवसात सहा ते सात हेक्टर क्षेत्र पूर्ण करता येते. ट्रॅक्टरने पेरणी केलेल्या क्षेत्रासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. तसेच पिकांच्या ओळी सरळ असल्यामुळे अंतरमशागत पूर्ण होऊन पिकांची हानी कमी होते. या कोळप्यामुळे शेजारची कोळपणी लवकर होते.तणाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते. तसेच मातीचे रोपण आच्छादन होऊन आधार सुद्धा मिळतो. हे यंत्र हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने विकसित केले आहे.
ब्रूम स्प्रेयर:-
ट्रॅक्टरवर पी टी ओ च्या सहाय्याने चालणारे यंत्र आहे. यात चारशे लिटर द्रावण क्षमतेची टाकी बसवलेले असते. यंत्राचे सहाय्याने पाहिजे तेवढे द्रावण प्रती हेक्टरी फवारणी करू शकतो. यासाठी ब्रूम स्प्रेयर वर कंट्रोल बसवलेले असते. याच्या सहाय्याने पाहिजे त्या दाबाने व पाहिजे तेवढा द्रावणाची फवारणी करता येते. पंपाच्या सहाय्याने योग्य त्या दाबाने 50 ते 100 मायक्रोमीटर आकाराचे थेंब तयार होतात.
फवारणी यंत्राच्या सहाय्याने एका दिवसात दहा ते पंधरा एकर क्षेत्रावर फवारणी करता येते.
जर आपण शेती उत्पादनाचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च शेती मशागत, अंतरमशागत, कापणी आणि मळणी यावर होतो. म्हणजेच 30 ते 40 टक्के लागणारा खर्च आपण यंत्राचा वापर केल्यास 15 ते 20 टक्क्यांपर्यंत आणू शकतो. आणि उत्पादनात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.