Method Of Making Compost
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कंपोस्ट खत तयार करण्याच्या आणि शेतकऱ्यांच्या वापरातल्या दोन सर्वोत्तम पद्धती. सध्या लागवडीखाली असलेल्या संकरित जाती आणि पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे शेतामध्ये एकापेक्षा जास्त हंगामात एकापाठोपाठ पिके घेतली जातात. पर्यायाने जमिनीला विश्रांती मिळत नसल्यामुळे तसेच रासायनिक खतांचा बेसुमार वापर इत्यादी कारणांमुळे क्षारपड होत आहेत.
बऱ्याच वर्षांपासून सेंद्रिय पदार्थांच्या कमतरतेमुळे जमिनीचा कस कमी होत आहे. अशा जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कंपोस्ट खत महत्त्वाचे ठरते. म्हणूनच आज आपण कंपोस्ट खत तयार करण्याचे दोन पद्धती जाणून घेणार आहोत.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती:-
इंदोर पद्धत:-
या पद्धतीला ढीग पद्धत असे देखील म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे सहा फूट रुंद व पाच ते सहा फूट उंच आणि सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता यानुसार लांबी ठेवली जाते. यामध्ये शेतातील उरलेले पिकाचे अवशेष, काडी कचरा, शेतातील तण आणि शेण इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा एक थर ठेवला जातो. ढीग पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर म्हणजेच ऑक्सिजन युक्त वातावरणात होते. ही प्रक्रिया लवकर होण्याकरिता एका महिन्याच्या अंतराने ढीग वर खाली करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात . ओलावा टीकावा यासाठी अधून मधून पाणी शिंपडले जाते. तसेच पिकावर प्लास्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया जलद होण्यास मदत होते. त्या प्रक्रियेमध्ये तीन ते चार महिन्यात चांगले कंपोस्ट तयार होते.
Method Of Making Compost
बेंगलोर पद्धत:-
या पद्धतीला खड्डा पद्धत म्हणतात. बेंगलोर पद्धतीमध्ये सर्वात खालचा थर पंधरा ते वीस सेंटीमीटर जाळीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून गोळा केला जातो.अशा प्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत शेण माती मिश्रण करून लिंपून घेतले जाते. सेंद्रिय पदार्थांची कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्याकरिता अधून मधून पाणी शिंपले जाते. कुजण्याची प्रक्रिया सुरुवातीला ऑक्सिजन विरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे खत तयार होण्यास थोडा अधिक वेळ लागतो. या पद्धतीमध्ये अन्नद्रव्य वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.