दुधाळ जनावरांचे गोचीडी पासून नियंत्रण Gochidinche Vyavasthapan Best 15

Gochidinche Vyavasthapan

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजेच गोचडी पासून जनावरांचे कसे संरक्षण करू शकतो या विषयावर माहिती घेणार आहोत. पशुपालक आणि शेतकरी मित्रांनो सध्या सर्वच पशुपालक बांधव जनावरांमधील बाह्य परोपजीवींच्या समस्येने त्रस्त आहेत.

  • दुधाळ जनावरांमध्ये गोचीड, पीसवा, माशा आणि ऊवा या प्रकारातील बाह्य परोपजीवींची समस्या जास्त प्रमाणात आढळून येते.
  • दुधाळ जनावरांवरील बाह्य परोपजीवींवर योग्य वेळी नियंत्रण न मिळवल्यास पशुपालक बांधवांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो.
  • जनावरांमध्ये आढळणाऱ्या विविध बाह्य परपजीवीपैकी गोचीड एक महत्त्वाचा घटक आहे.
  • भारतासारख्या देशात जनावरांमध्ये आढळणारा विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य रोगापासून होणाऱ्या आर्थिक नुकसानापेक्षा जास्त नुकसान बाह्यपरोपजीवींमुळे होते.
  • देशी जनावरांपेक्षा विदेशी जनावरांमध्ये बाह्यपरोपजीवींचे प्रमाण जास्त असल्याने देशी जनावरांचे तुलनेत विदेशी जनावरे बाह्य परोपजीवींपासुन होणाऱ्या रोगांना जास्त बळी पडतात.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

बाह्यपरोपजीवींमुळे निर्माण होणाऱ्या समस्या:-

  • जनावरांच्या शरीरावर असणाऱ्या बाह्यपरोपजीवीमुळे जनावरांच्या शरीराला खाज सुटते, त्यामुळे शरीरावर जखमा होतात, जखमांवर योग्य वेळी उपचार न केल्यास जखमांवर माशा बसल्याने त्यामध्ये किडे पडतात.
  • त्वचा रोग होऊन जनावरांच्या शरीरावरील केस गळू लागतात.
  • गोचीडे जनावरांच्या शरीरातील रक्तपिता , त्यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्याने जनावरांना अशक्तपणा येतो. त्याचाच परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते.
  • गोचीडांच्या चावल्याने जनावरांना रक्ताशय म्हणजेच ॲनिमिया , टिक पॅरालिसिस, रक्त लघवी , थायलेरियासीस यांसारखे जीव घेणे आजार होतात. त्यामुळे पशुपाल लोकांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते.  बाह्य परोपजीवीमुळे जनावरे अशक्त झाल्याने इतर रोगांनाही लवकर बळी पडतात. जनावरांचे शारीरिक वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो.
  • बाह्य परोपजिविंचे प्रमाण लहान वासरे आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये जास्त दिसून येते. त्यामुळे जनावरांची वाढ खुंटते. वजन कमी होते आणि शरीरावरील केस गळतात.

Gochidinche Vyavasthapan

बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी उपाय योजना:-

1)जनावरांच्या अंगावर एकूण गोचीडंपैकी फक्त पाच ते दहा टक्के गोचडी असतात उर्वरित गोचडी गोठयामध्ये आसपासच्या परिसरामध्ये म्हणजेच गोठ्यातील खाच खळग्यात, भिंतींच्या फटींमध्ये, गव्हाणीच्या खाली, जनावरांना बसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॅटच्या खाली असतात. त्यामुळे एकाच वेळी जनावरांच्या अंगावर गोचीड निर्मूलना बरोबरच गोठ्यातील गोचीड निर्मूलन करणे आवश्यक आहे.
2) सर्वप्रथम गोठयातील सर्व जनावरांना डॉक्टरांचे सहाय्याने बाह्य परोपजीवी नियंत्रणासाठी इंजेक्शन करून घ्यावे.
3) गोठ्याची अस्वच्छता हे बाह्य परोपजीवींच्या वाढीमागील मुख्य कारण आहे. त्यामुळे गोठा आणि गोट्याच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ हवेशीर असावा.
4) गोठयाची पूर्ण स्वच्छता करून घ्यावी. गोठ्यात कचरा किंवा गोचीडी लपण्यासाठी जागा राहणार नाही याची काळजी घ्या.
5) गोठयातील सर्व जनावरांवर गोठ्यामध्ये आणि गोठयाच्या आजूबाजूला सर्वत्र बाह्य परोपजीवी नाशक औषधाची फवारणी करावी. यासाठी बाजारात मिळणाऱ्या विविध औषधांचा वापर करू शकतात किंवा जैविक औषधे वापरू शकतात.
6) बाह्य परोपजीवीनाशक औषधे वापरताना डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात वापरावे. कारण औषधे योग्य प्रमाणात न वापरल्यास जनावरांना विषबाधा होऊ शकते.
6) बाह्य परोपजीवीनाशक औषधे वापरताना जनावरे औषध चाटणार नाही जनावरांच्या डोळ्यांमध्ये किंवा तोंडावर औषध पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्यावर किंवा पाण्यामध्ये पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
7) जनावरांच्या शरीरावर जखमा असल्यास जनावरांवर कीटकनाशक औषधाची फवारणी करू नये.
8) औषधाची फवारणी करताना जनावरांना गोठ्याबाहेर बांधून त्यांच्यावर औषधाची फवारणी करावी आणि दोन ते तीन तास उन्हामध्ये बांधावे. त्याचवेळी गोठयामध्ये सर्वत्र औषधाची फवारणी करून घ्यावी.
9) रात्रीच्या वेळी गोचीडे बिळातून किंवा भिंतीच्या फटीमधून बाहेर येतात त्यावेळी फ्लेमगनच्या किंवा तेंभ्याच्या सहाय्याने गोठ्यातील सर्व जागा म्हणजेच फटी, कपारी, भिंती आणि गोचीडे जाळून घ्यावी.
10) गोठयामध्ये सर्वत्र चुना लावा व चुना पावडर गोठ्यामध्ये भूरभूरावी.
11) गोचीड निर्मूलनासाठी एकाच औषधाचा सातत्याने वापर करू नये दर दोन-तीन महिन्यांनी औषधात बदल करावा.
12) जैविक औषध बनवण्यासाठी एक लिटर पाणी घ्यावे त्यामध्ये 40 ग्रॅम करंज तेल, चाळीस ग्रॅम निम तेल, 40 ग्रॅम आंघोळीचा साबण यांचे मिश्रण बनवून वापरावे.
13) प्रत्येक महिन्यामध्ये गोचीड निर्मूलनासाठी वरील उपाययोजना करायला हव्यात.
14) बाह्य परोपजीविनाशक म्हणून डेल्टा मिथिन, सायपर मिथीन, फ्यूमीबरीन यांसारख्या औषधांचा वापर करावा.
15) गोचीड व इतर परोपजीवीमुळे झालेल्या रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच दूध उत्पादनाची झालेली घट लवकरात लवकर जागेवर आणण्यासाठी रोज शंभर मिली लिव्हर टॉनिक दहा दिवस द्यावे.

अशाप्रकारे सर्व बाबींवर लक्ष देऊन नियंत्रण केल्यास आपल्या गोठ्यातील परोपजीवींवर नियंत्रण तर भेटेलच पण त्यापासून होणारे नुकसान ही आपल्याला टाळता येईल. अशा प्रकारे आपण जनावरांची काळजी घेऊन जनवारांचे आरोग्य चांगले ठेवू शकतो . आणि त्याचबरोबर आर्थिक नुकसान टाळून दूध उत्पादन देखील वाढवू शकतो

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Gochidinche Vyavasthapan

Leave a Comment