गांडूळ खत : सेंद्रिय शेतीसाठी वरदानVermicompost Is Best For Organic Farming5

Vermicompost Is Best For Organic Farming

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गांडूळ खत सेंद्रिय शेतीसाठी कशाप्रकारे फायद्याचे ठरेल. तर देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेले आहेत.

शेत जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक दृष्ट्या अपरिमित हानी होत आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत , सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

Vermicompost Is Best For Organic Farming

गांडूळ खत म्हणजे काय:-

यामध्ये गांडूची विस्टा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडूळाचे अंडीपुंज, त्यांच्या बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो. गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो. त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्य , संप्रेरके, उपयुक्त जिवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्य संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत असून जैविक गुणधर्म वाढवते. गांडूळ खत हा सेंद्रिय शेतीचे एक महत्त्वाचा घटक आहे.

गांडूळ खतासाठी गांडूळाच्या योग्य जाती :-

गांडूळाच्या 300 हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने इसीना फोएटिडा, युड्रिलस युजेनिया, पेरिनॉक्सि, एक्झोव्हेट्स, फेरीटिना ईलोगेटा या गांडूळाच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत.

गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ:-

पिकांचे अवशेष:- धसकटे, पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत इत्यादी.
जनावरांपासून मिळणारी उत्पादिते:- शेण, मुत्र, शेळ्या लीद, कोंबड्यांची विष्ठा इत्यादी.
फळझाडे आणि झाडांचा पालापाचोळा:-
हिरवळीची खते:- ताग, धैचा, गिरीपुष्प, शेतातील तण इत्यादी.
घरातील केरकचरा उदाहरणार्थ भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न इत्यादी.

Vermicompost Is Best For Organic Farming

गांडूळ खत तयार करण्यासाठी सुलभ पद्धत:-

गांडूळ खत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. गांडूळ खत ढिग आणि खड्डा या दोन पद्धतीने तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतीमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावे. या शेड ची लांबी दोन ढिगासाठी 4.25 मीटर तर चार ढिगासाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराचे असावेत. बाजूंच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावे. छप्परासाठी गवत, भाताच्या पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे जाड प्लास्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्राचा उपयोग करा. यामध्ये ईसिनीया फोईटिडा किंवा युड्रिलिस युजेणीय या पृष्ठभागावर कार्य करणाऱ्या गांडूळ च्या जातीचा वापर करण्यात येतो.

खड्डा पद्धत:-

या पद्धतीमध्ये सिमेंटच्या खड्ड्याची लांबी तीन मीटर, रुंदी दोन मीटर आणि खोली 60 सेंटिमीटर ठेवावे. खड्ड्याच्या तळाशी नारळाचा काथा, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा, तीन ते पाच सेमी जाडीचा अर्धवट कुजलेला शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारण शंभर किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी 7000 प्रौढ गांडुळं सोडावी. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त 50 सेंटिमीटर जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे.

खत तयार होण्यास लागणारा कालावधी:-

गांडूळाचा वापर करून खत तयार होण्यास साधारण 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.

गांडूळ खत काढण्याची पद्धत:-

खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाल्यावर बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळंसकट बाहेर काढावे व त्यांचा बाहेर उन्हात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकाकृती ढीग करावा. म्हणजे उन्हामुळे गांडूळे तळाला जातील. ढिगाच्या वरचे गांडूळखत काढून घ्यावे. तीन ते चार तासात सर्व गांडूळ परत खत तयार करण्यासाठी खड्ड्यात सोडावी. अशाप्रकारे गांडूळ खत तयार करता येते.

👉👉 अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा 👌👌

गांडूळ खताचे शेतीसाठी फायदे:-

1) गांडूळ खतामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्रित उपलब्ध असतात.

2) गांडूळ खतामधील अन्नद्रव्य पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध होतात.

3) गांडूळ खतांमधील असलेल्या सूक्ष्मजीवांमुळे पिकावर येणारी रोगराई कमी होते. त्यामुळे कीडनाशकांचा खर्च कमी होतो.

4) गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते व पिकांची वाढ अधिक वेगाने होते.

5) जलधारण क्षमता वाढल्याने पाऊस अनियमित झाल्यास पिकाला पाण्याचा ताण पडत नाही.

👉 More Updates Join Whatsapp Group

 

Leave a Comment