Benefits Of Organic Farming
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय खते बनवण्याची पद्धत, वापर आणि त्याचे फायदे. त्यामध्ये आपण ह्युमिक ऍसिड तसेच जीवामृत तयार करण्याची पद्धत बघूया. सर्वप्रथम आपण ह्युमिक ऍसिड तयार करण्याची पद्धत पाहणार आहोत. ह्युमिक ऍसिड बनवण्यासाठी एक प्लास्टिक ड्रम घ्यायचा आहे. त्या ड्रम मध्ये 20 लिटर पाणी टाकायचे आहे. त्यानंतर 5 ते 6 देशी गाईच्या चांगल्या वाळलेल्या शेणाच्या गोऱ्याची भुकटी करून त्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर यामध्ये एक किलो दही, एक किलो गूळ , 200 ग्रॅम बेसन पीठ. त्यानंतर त्या ड्रम मध्ये जेवढे पाणी बसेल तेवढे पाणी भरून घ्यावा. साधारण तुमचा ड्रम 80 ते 100 लिटरचा असायला पाहिजे. त्यानंतर तो ड्रम सावलीमध्ये दहा ते पंधरा दिवसांसाठी ठेवा. आणि रोज एक ते दोन वेळा काडीच्या सहाय्याने तो ड्रम गोलाकार ढवळून घ्यायचा आहे. पंधरा दिवसानंतर त्यामध्ये तयार झालेले मिश्रण सुती कापडाने गाळून घ्यायचे आहे आणि पुन्हा सावलीमध्ये ठेवायचे आहे . गरजेनुसार त्यातले एक दोन लिटर मिश्रण एक एकर साठी ड्रिप किंवा पाटाच्या पाण्याद्वारे पिकाला द्यावे याचे रिझल्ट खूपच छान आपल्याला बघायला मिळतील.
Benefits Of Organic Farming
जीवामृत:- शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत जीवामृत तयार करण्याची पद्धत. सर्वप्रथम 200 लिटर प्लास्टिक ड्रम घ्यावा. त्यामध्ये 170 लिटर पाणी घ्यायचे आहे. याच पाण्यामध्ये दहा किलो शेणखत, दहा लिटर गोमूत्र (देशी गाईचे), दोन किलो बेसन, दोन किलो जिवाणूजन्य माती , दोन किलो l काळा गुळ. आता त्यामध्ये 250ml जिवाणूजन्य मिश्रण टाकावे( जिवाणू संवर्धक). आता मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचे आहे. त्याला हलकेसे झाकण लावायचे आहे. त्यानंतर तयार झालेले मिश्रण सावलीमध्ये सात दिवसांसाठी ठेवावे. या सात दिवसांमध्ये दिवसातून दोन वेळा काढीने गोलाकार ढवळून घ्यायचे. सात दिवसानंतर तयार झालेले मिश्रण सुती कापडाने काढून घ्यायचे आहे. तयार झालेले मिश्रण 200 लिटर प्रति एकर याप्रमाणे ड्रीप किंवा पाटाच्या पाण्याद्वारे पिकाला द्यावे. तसेच तुम्हाला हे मिश्रण फवारणीच्या माध्यमातून वापरायचे असल्यास 20 लिटर जीवामृत 180 लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर साठी वापरू शकता.
फायदे:-
1) पिकातील पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
2) मातीमधील जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे आपले पिकांच्या मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण चांगल्या प्रकारे होणार आहे.
3) पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली होणार आहे.
4) हवेतील नत्र शोषून घेतले जातात. 5) पिकांची वाढ चांगली होणार आहे पीक टवटवीत होणार आहेत आणि पीक निरोगी राहण्यास मदत होणार आहे.
6) जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील वाढणार आहे.
7) यामुळे जमिनीतील गांडूळाची संख्या देखील वाढायला मदत होईल.
8) गांडुळांची क्षमता वाढली तर तुमच्या शेतातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढते.
9) शेतातील भाजीपाला पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते तसेच यांची चव देखील चांगल्या प्रकारे येते.
10) उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगल्या प्रकारे येते.
Benefits Of Organic Farming
शेतकरी मित्रांनो , शेती करताना रासायनिक शेती तर आपल्याला करायचे आहेत कारण लगेच रिझल्ट येण्यासाठी रासायनिक खत टाकण्याशिवाय पर्याय नाही. परंतु त्याचबरोबर रासायनिक शेतीला सेंद्रिय शेतीची जोड द्यायची आहे. 60% रासायनिक शेती आणि 40% सेंद्रिय शेती हा फॉर्म्युला जर तुम्ही वापरला तर तुम्हाला भविष्यामध्ये शाश्वत शेती करता येणार आहे. तुमच्या मुला-बाळांना तसेच पुढच्या पिढीला असेच चांगल्या प्रकारची उपजाऊ शेती मिळणार आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्या
👉 More Updates Join Whatsapp Group
👉 अजून वाचण्यासाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा