डाळिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थ Various Best 4 Processed Foods Of POMEGRANATE

Various Best 4 Processed Foods Of POMEGRANATE

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डाळिंब पासून कशाप्रकारे विविध प्रकारचे पदार्थ बनवता येतात. डाळिंब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बऱ्याच देशातून झाला आहे. भारतात डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या मस्कत, गणेश व जी 137, मृदुल , शेंद्री जातींना बाजारात वाढती मागणी आहे. त्यामुळे डाळिंबाचे क्षेत्र महाराष्ट्रात 25000 हेक्टर पेक्षा जास्त वाढलेले. हे फळझाड अत्यंत काटक व पाण्याचा ताण सहन करणारे आहे . त्यामुळे हे फळझाड विविध प्रकारचे जमिनी व हवामान यांना यशस्वीपणे तोंड देऊ शकते. डाळिंबाला सर्व हंगामात फुले येतात. त्यामुळे याचा कोणताही बहार धरता येतो. यामुळे डाळिंब हे फळ बाजारात वर्षभर उपलब्ध असते. डाळिंबाचे अनेक जाती असल्या तरी गणेश या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढोकला (गुजरात), ज्योती (कर्नाटक), जोधपुर रेड व जालोर सीडलेस (राजस्थान) या जाती भारताच्या इतर भागात लावल्या जातात. डाळिंब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळिंब फळांमध्ये 78% पाणी, 1.9% प्रथिने, 1.7% स्निग्ध पदार्थ, 15 टक्के साखर व 0.7% खनिज असतात. याशिवाय कॅल्शियम 10, फॉस्फरस 70, लोह 0.30, मॅग्नेशियम 12 ,सोडियम 4 व पोटॅशियम 17 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम खनिजे असतात. तसेच थायमिंग 0.06, रिबोफ्लेविन 0.10 व क जीवनसत्व असतात. डाळिंबाच्या फळांमध्ये सरासरी 60 ते 67 टक्के दाणे निघतात. पूर्ण पिकलेल्या डाळिंबात 45 ते 60 टक्के रस निघतो व डाळिंबाच्या दाण्यापासून 76 ते 85% रस निघतो.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

1) डाळिंबाचा रस :-
डाळिंबाचा रस तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली साधारण गोड चंब मोठ्या गराचे दाणे व टनिनचे प्रमाण 0.25 % पेक्षा कमी असलेली फळे निवडावी.फळांचा रस दोन प्रकारे काढता येतो. निवडलेली फळे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावी फळांचे धारदार सुरीने चार किंवा आठ तुकडे करावेत. ते तुकडे सच्छिद्र अशा जाड कापडात गुंडाळावे व लहान आकाराच्या बास्केट प्रेस मध्ये रस काढावा. या रसात टनीनचे प्रमाण साधारणपणे 0.17 टक्के असते. दुसऱ्या पद्धतीने फळे फोडून बीआयुक्त गर हाताने काढावा. हा गर स्क्रू प्रेस नावाच्या उपकरणात घालून रस वेगळा करावा. रस वेगळ काढताना बिया फुटणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. या पद्धतीने काढलेल्या रसात टॅनिन चे प्रमाण 0.12 टक्के पर्यंत कमी असते. हा रस 80 ते 82 डिग्री सेल्सिअस तापमानात 30 मिनिटे तापवून लगेच थंड करावा. नंतर रात्रभर रस भांड्यात तसाच ठेवून वरच्या बाजूचा रस सकाळी वेगळा करून घ्यावा. खाली राहिलेला चोथा टाकून द्यावा. वेगळा केलेला रस आणखी एकदा गाळणीतून गाळून स्वच्छ बाटलीमध्ये भरावा. हा रस जास्त दिवस टिकवण्यासाठी या बाटल्या बंद करून उकळत्या पाण्यात 30 मिनिटे बुडवून थंड करावे.

Various Best 4 Processed Foods Of POMEGRANATE

2) डाळिंबापासून शीतपेय :
डाळिंबापासून उत्तम प्रकारची शीत पेय तयार करता येतात. थंड पाण्यामध्ये दहा टक्के डाळिंबाचा रस 15% टक्के विद्राव्य घटक व 0.25 टक्के आम्लता ठेवून शीतपेये तयार करता येतात. या थंडपेयाच्या 200 मिली बाटलीची सर्व खर्च करून विक्रीची किंमत सरासरी दोन रुपये इतकी कमी येते.

3) डाळिंबापासून सरबत :-
डाळिंबाच्या रसामध्ये 13% ब्रिक्स व 0.8% अमलता गृहीत धरून डाळिंब रसाचे सरबत करण्यासाठी दहा डाळिंबाचा रस, 15% साखर व 0.25 टक्के सायट्रिक ऍसिड या सूत्रानुसार घटक पदार्थ वापरावेत. मोठ्या पातेल्यात पाणी वजन करून घ्यावे. त्यामध्ये साखर टाकून ती पूर्ण विरघळली जाईल याची दक्षता घ्यावी. तयार होणारे साखरेचा पाक पातळ मलमल कपड्यातून दुसऱ्या पातेल्यात गळून घ्यावा. त्यात डाळिंबाचा रस टाकून तो मोठ्या चमच्याने एकजीव करावा. दोन ग्लास मध्ये थोडे थोडे सरबत घेऊन एका मध्ये सायट्रिक ऍसिड व दुसऱ्या जरुरीप्रमाणे खादा रंग टाकून चमच्याच्या साह्याने पूर्ण विरघळून घ्या व नंतर सरबतामध्ये टाकून एकजीव करावे. हे सर्व दोनशे मिली आकारमानाच्या बाटल्या भरून बाटल्या थंड होईपर्यंत रेफ्रिजरेटर मध्ये ठेवावे.

4) डाळिंबापासून सिरप :-
डाळिंबाच्या रसात 13% ब्रिक्स व 0.8% अंमलता गृहीत धरून डाळिंब रस सिरप तयार करण्यासाठी 25% डाळिंब रस, 65 टक्के साखर व 1.5 टक्के सायट्रिक ऍसिडि या सूत्रानुसार घटक पदार्थांचे प्रमाण खालील प्रमाणे वापरावे. डाळिंबाचा रस एक किलो, साखर 2.400 किलो, पाणी 4.700 किलो, सायट्रिक ऍसिड 52 ग्राम, तांबडा खादा रंग जरुरीप्रमाणे, सोडियम बेंझाईट 2.6 ग्रॅम.प्रथम पाणी पातेल्यात वजन करून घ्यावे. त्यामध्ये सायट्रिक ऍसिड टाकून पूर्ण विरघळून घ्यावे व नंतर त्यात डाळिंब रस टाकावा व साखर टाकून चमच्याने हलवून शक्य तेवढी साखर विरघळून घ्यावी. पातेले मंदाग्नी शेगडीवर ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यंत गरम करून घ्यावे. दोन ग्लास मध्ये थोडा थोडा सिरप घेऊन एका मध्ये सोडियम बेंजोएट व दुसऱ्या मध्ये तांबडा खादा रंग विरघळून सिरपमध्ये टाकून एक जीव करावे. निर्जंतुक केलेल्या बाटली मध्ये सिरप भरून त्यांना ताबडतोब झाकणे बसवून त्या हवाबंद करावे. सिरपची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावे.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Various Best 4 Processed Foods Of POMEGRANATE

Leave a Comment