Utpadan Vadhisathi Jivanu Sanvardhake
उत्पादन वाढीकरिता द्रावणीय जिवाणू संवर्धने
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेतीसाठी उपयुक्त द्रावण जिवाणू संवर्धने.
घन जिवाणू खत :-
शेतकरी बंधूंनो एकाच शेत जमिनीतून पीक वाढी करिता व उत्पन्न वाढीकरिता अन्नद्रव्यांचा सतत पुरवठा होऊ शकत नाही व त्यामुळे जमिनीचा कस टिकून ठेवल्या जाऊ शकत नाही . एकोणीस व्या शतकाच्या सुरुवातीला रासायनिक खताचे उत्पादन व वापर सुरू झालेला होता . तत्पूर्वी फक्त सेंद्रिय पदार्थाचाच जास्त वापर होत असे . जमिनीला पुरविण्यात येणाऱ्या अन्नद्रव्यांवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. त्याकरिता सर्व अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करणे हे पीक उत्पादन व जमिनीचे आरोग्य या करीत अत्यंत महत्त्वाचे आहे . रासायनिक खते हा पिकांना अन्नद्रव्य पुरविण्याचा महत्त्वाचा व सर्व शेतकरी बंधूंचे प्रथम क्रमांकाचा आवडीचा मार्ग आहे. परंतु दिवसेंदिवस खताच्या वाढणारे किमती खताची टंचाई व प्रत हे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.
द्रवरूप जिवाणू खत म्हणजे :-
उपयुक्त , जिवंत किंवा सुक्त अवस्थेतील अणु जिवाणूंचे निर्जंतुक वाहकांमध्ये केलेले मिश्रण होय. बीज प्रक्रिया , रोप किंवा मातीतून वापरल्यास त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते व नत्र स्थिरीकरण, स्फुरद विरघळविणे , सेंद्रिय पदार्थांचे विघटन इत्यादी क्रिया वाढवून पिकास अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
जिवाणू खताचे मुख्य प्रकार :-
१) नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू
अ) सहजीवी जिवाणू (उदा. रायझोबीयम)
ब) सहजीवी जिवाणू (उदा. अझोटो बॅक्टर)
क) सहयोगी सहजीवी जिवाणू (उदा. अझोस्पिरीलम)
२) स्फुरद विरघळविणारे जिवाणू उदा. बॅरिलस मेगाटेरियम अस्परजीलस अवमेरी इत्यादि.
३) पालाश हालचाल वाढवणारे जीवनू.
४) सूक्ष्म अन्नद्रव्य विरघळविणारे व हालचाल वाढवणारे जिवाणू.
अ) झिंक व गंधक विरघळविणारे जिवाणू
ब) मॅंगनीज विरघळणारे जिवाणू
नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंचे महत्त्व :-
रायझोबियम:–
सहयोगी पद्धतीने नत्र स्थिर करणे . हे रंगाने पांढरे असते . या शुद्ध द्रवरूप खताचा दुर्गंध येत नाही . याचा सामूह 6.8 ते 7.5 असतो.
एझोटोबॅक्टर :-
असह्यगी पद्धतीने नत्र स्थिर करणे . भात , कापूस व भाजीपाला वर्गीय पिकास नत्र स्थिर करून देतात.
ऍझोस्पिरिलम :-
हे मुख्य करून तृणधान्य (भात, मका, बाजारी, ज्वारी) तेलवर्गीय , कापूस पिकांकरिता उपयोगी आहे . भात पिकात 28 मिलिग्रॅम / ग्राम व ज्वारी व मक्यात 20 मिलीग्राम इतके नत्र स्थिर केला जातो.
द्रवरूप एजोस्पिरीलमचा रंग निळा किंवा पांढरा असतो . जीवनसत्वे , निकोटेनिक ऍसिड , इंडोल ऍसिटिक ऍसिड व जिबर लेन्स या घटकांना एकत्र करून अंकुर व मुळांची वाढ जोमाने करते.
अँसिटोबॅक्टर :-
शर्करायुक्त ऊस पिकांमध्ये सर्वात जास्त क्षमतेने नत्र स्थिर करते.
एवढे असताना देखील शेतकरी बांधवांमध्ये जैविक खताचे वापराचे प्रमाण अत्यंत कमी आहे . यामागील कारणांचा शोध घेतल्यास खालील कारणे प्रथमदर्शनी दिसून येतात.
१) जिवाणू खताची उपलब्धता
२) जिवाणू खताचे महत्त्व व उपयोग्यता याची माहिती नसणे
३) पेरणीपूर्वी कमी वेळेत करावी लागणारी बीज प्रक्रिया
४) जिवाणू खताची गुणवत्ता इत्यादी.
Utpadan Vadhisathi Jivanu Sanvardhake
यासोबतच द्वितीय घटकांमध्ये उत्पादन विषयक घटक सुद्धा महत्त्वाचे आहेत ते म्हणजे :-
१) जैविक खताच्या मागणीत अनियंत्रितपणा असणे.
२) जैविक खताचा कमी उपयुक्तता कालावधी असणे.
३) जमिनीच्या ओलाव्यावर जिवाणूंची वाढ अवलंबून असणे.
४) जिवाणू व तापमान यांचा परस्पर संबंध असणे.
५) जिवाणू खताच्या वापराचा परिणाम लवकर दिसून न येणे.
६) स्थानिक पातळीवर वाहक पदार्थाची अनुपलब्धता.
७) जिवाणूका तयार करताना लागणारे श्रम , मजूर , सुविधा आर्थिक पाठबळ
८) जिवाणू खत वाहतूक खर्च
९) जैविक खताची गुणवत्ता टिकवून ठेवण्याकरिता लागणारा जास्त कालावधी.
या सर्व अडचणी आपल्याला जैविक खते तयार करताना उत्पन्न , प्रसार , वाटप व उपयोग करताना दिसून येतात . त्यामुळेच अत्यंत उपयोगी अशा जिवाणू खतांचा वापर कमी शेतकरी करताना दिसते . हे चित्र बदलून जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना आपण आपल्याला लागणारे जिवाणू खताची मागणी विद्यापीठाकडे मे महिन्यापर्यंत खरिपाची व जुलै महिन्यापर्यंत रब्बीची नोंदविल्यास अत्यंत उच्च गुणवत्तेचे जिवणू खत शेतकऱ्यांना पुरवठा करण्यास विद्यापीठ नेहमी सज्ज राहील.
घनस्वरूपातील वाहक पदार्थाचे जिवाणू खताच्या वापराच्या मर्यादा लक्षात घेता या सर्व घटकांवर मात करून त्या पुढचे पाऊल म्हणजे ‘ द्रवरूप जीवाणू खत ‘ शेती करीत खूप उपयुक्त आहे . द्रवरूप जिवाणु खत म्हणजे अशा प्रकारचे द्रावण जीच्यात उच्च प्रतीचे जास्त संख्येने उपयुक्त जिवाणू व अन्नद्रव्य सोबतच बचाव करणारे पेशी असतात . तसेच या द्रवरूप जिवाणू खताचा उपयुक्तता कालावधी सुद्धा जास्त दिवसांचा असतो.
जिवाणू खताची उच्च प्रत दोन बाबींवर अवलंबून असते ती म्हणजे :-
१) जिवाणू पेशींची संख्या व
२) जिवाणू पेशीची नत्र स्थिरीकरणाची / स्फुरद विरघळविण्याची क्षमता.
उच्च प्रतीचे द्रवरूप जिवाणू खत तयार करण्याकरिता महत्त्वाचे घटक म्हणजे :-
१) योग्य व उपयुक्त आंबविण्याचे माध्यम
२) योग्य आंबवण्याची यंत्र
३) योग्य उभारणी व स्वच्छ बंदिस्त यंत्रणा.
द्रवरूप जिवाणू खताचे महत्त्वाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगता येतील:–
१) द्रवरूप जिवाणू खतांचा उपयुक्तता कालावधी जास्तीत जास्त म्हणजे बारा महिन्यांपर्यंत असतो . म्हणजेच प्रचलित जिवाणू खताच्या चार पट जास्त असतो.
२) द्रवरूप जिवणू खताची साठवणूक करताना उन्हाळ्यात 45 डिग्री सेल्सिअस तापमानावर सुद्धा अतिनिल किरण मध्ये हे द्रावण खत धरू शकतात.
३) द्रवरूप जिवाणू खतामधील जिवाणू संख्या दहा मिली सतत बारा महिन्यांपर्यंत स्थिरपणे राखली जाते . म्हणजेच प्रचलित जिवाणू खतापेक्षा कितीतरी पटीने जास्त.
४) हे द्रवरूप जीवाणु खत असल्यामुळे शेतीमध्ये याचा वापर करणे अत्यंत सोपे व सहज आहे . वेंचुरी व खताच्या टाकीद्वारे ठिबक सिंचनातून सुद्धा हे अगदी सहजरीत्या पिकास देता येते.
५) द्रवरूप जिवाणू खतात महत्त्वाचे बचाव करणारा पदार्थ असतो की ज्यामुळे सुक्त बीजांकुर तयार होतात व वाढत जातात.
६) द्रवरूप जिवाणू खतात महत्त्वाचे खास अन्नद्रव्यांमुळे जिवाणूंची कार्यक्षमता व युक्त कालावधी , बिया व जमिनीत विपरित स्थितीमध्ये सुद्धा टिकून ठेवण्याची क्षमता वाढते.
७) द्रवरूप स्थिती असल्यामुळे वापरण्यास हाताळण्यास सोपे आहे.
८) द्रवरूप जिवाणू खतातील जिवाणू उत्पादन करतानाच स्थिर केल्यामुळे साठवणुकीनंतर त्याचा वापर केल्यावर हे खत जास्त तीव्रतेने व कार्यक्षमतेने पिकावर परिणाम करते.
९) द्रवरूप जिवणु खत जमिनीतील जीवनू संख्या सोबत चांगल्या तऱ्हेने लढून लवकर कार्यक्षमता वाढवतो
१०) या जिवाणू खतात भेसळ नसल्यामुळे विकरांची क्रिया खूपच जास्त असते.
११) प्रचलित घनस्वरूपातील जीवनू खता पेक्षा याची मात्र दहा पटीपेक्षा कमी द्यावी लागतात.
१२) द्रवरूप जिवाणू खताच सामु योग्य राखला जातो.
१३) द्रवरूप जिवाणू खतातील जिवाणूंचे एकत्रीकरण होऊन गाठी तयार होत नाहीत व याच्या वापरा वेळेस ते सहजच पाण्यात विरघळले जातात.
१४) द्रवरूप जिवाणू खतात म्हणजेच ओलावा वाढवून ठेवणारा घटक असल्यामुळे जिवाणूंची बियावर किंवा विविध घटकावर सहजरित्या वाढ जोमाने होते.
१५) द्रवरूप जिवाणू खताची शुद्धता विशिष्ट आंबविण्याच्या वासावरून लगेच ओळखता येते.
१६) द्रवरूप जिवाणू खत तयार करताना या खताचे मापदंड सोपे लवकर होणारे आहेत.
१७) द्रवरूप जिवाणू खत तयार करण्याची प्रक्रिया प्रचलित घनरूप माध्यम जैविक खताप्रमाणे खर्चिक नसून कमी त्रास व कमी मजूर आधारित आहे.
१८) द्रवरूप जिवाणू खतामुळे जास्त उत्पन्न व आर्थिक फायदा होऊ शकतो.
१९) द्रवरूप जिवाणू खत निर्यातीस सुद्धा खूप मोठा वाव आहे.
द्रवरूप जिवाणू खते वापरायच्या पद्धती :-
१) जिवाणू खताचे बियाण्यास अंतरक्षीकरण .
२) रोपावर जिवाणू खतांचे अंतरक्षीकरण.
३) मातीत मिसळणे.
बियाण्यास अंतरक्षीकरण करणे ही एक सर्वत्र आढळणारी फायद्याची आणि कमी खर्चिक पद्धत आहे . प्लास्टिक पिशव्यामध्ये कमीत कमी पाच किलोग्राम पर्यंत बियांना कोटिंग देता येते . प्लास्टिकच्या पिशव्याचा आकार हा मोठा पाहिजे . पिशव्यात दोन किलोग्राम किंवा त्यापेक्षा जास्त बी भरावे . पिशवी उघडून हळुवारपणे शेकिंग करावे . शेकिंग थांबवावे आणि संवर्धन बियाण्यास अशा पद्धतीने सर्व बियांवर सारख्या प्रमाणात लेप असेल . पिशवी मधील बी काढून 20 – 30 मिनिटांसाठी सावलीत ठेवावे . जास्त प्रमाणात बियांना लावण्यासाठी बकेटचा वापर करावा आणि अंतरक्षीकरण हाताने करावे . बियाण्यास अंतरक्षीकरण करण्यासाठी रायाझोबीएम , अझाटोबॅक्टर आणि सोबत स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा वापर करावा.