इंटरनेट ऑफ थिंग्स चा कृषी क्षेत्रातील वापर | Benefits And Use of Internet of Things in Agriculture Best 0

Use of Internet of Things in Agriculture

इंटरनेट ऑफ थिंग्स चा कृषी क्षेत्रातील वापर

संपूर्ण इंटरनेट ऑफ थिंग्स प्रणालीचे पाच घटक आहेत :-

– संवेदके (sensor) :- स्थानिक अथवा दुरुस्त संगणकीय सर्वर (cloud) , संगणकीय निर्णय प्रक्रिया प्रणाली प्रारूप (decision support system computer software)
– वापरकरता हस्तक्षेप साधन / युजर इंटरफेस (user interface)
– नियंत्रक (controller) / संप्रेरक (activator)
– आंतरजाल (internet)/ कनेक्टिव्हिटी (connectivity)
पहिले चारही घटक हे पाचव्या स्थानावर असलेल्या आंतरजालाद्वारे (internet)एकमेकांशी जोडले जातात . ते एकमेकांशी जोडून आवश्यकता माहितीची देवाण-घेवाण करू शकतात . हे आपण गटांमध्ये करत असलेल्या एखाद्या दुहेरी संवाद किंवा समन्वयाप्रमाणे असते.
– शेतामध्ये विविध ठिकाणी लावलेले संवेदक (sensors) माहिती गोळा करतात . ती माहिती स्थानिक अथवा दुरुस्त संगणकीय सर्वर (cloud) कडे पाठवले जाते . तिथे त्याचे विश्लेषण केले जातात.

Use of Internet of Things in Agriculture

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

त्या माहिती द्वारे सर्वर स्थापित केलेले संगणकीय निर्णय प्रक्रिया प्रारूप निर्णय घेते . तो निर्णय वापरकर्त्याकडे असलेल्या हस्तक्षेप साधनाकडे पाठवले जाते . वापर करता ते पाहून त्यांच्या त्या वेळच्या गरजेनुसार काही बदल सुचवू शकतो किंवा संगणकीय निर्णय प्रक्रियेद्वारे घेतलेला निर्णय जसा चा तसा इंटरनेट द्वारे नियंत्रकाकडे पाठवला जातो. या निर्णयाप्रमाणे नियंत्रक निर्दिष्ट प्रणालीकडून अपेक्षित ती कामे करून घेतो .

हे सर्व दुरस्त व स्वयंचलित पद्धतीने होते.
आयोटी तंत्रज्ञानात संवेदकांचा वापर विशिष्ट ठिकाणावरील प्रत्यक्ष माहिती त्याचवेळी किंवा ठरविलेल्या अंतराने नियमित संकलित करण्यासाठी केला जातो.

संवेदकांच्या प्रकारानुसार वातावरणातील अथवा पिकातील वेगवेगळ्या घटकांची गोळा केलेली माहिती ही सामान्यतः मोजण्यायोग्य विद्युत संदेश(electrical signals)व बायनरी कोड (binary code) मध्ये रूपांतरित केली जाते.

ही माहिती इंटरनेट द्वारे पुढील प्रक्रियेसाठी स्थानिक अथवा दुरस्त संगणकीय सर्वर कडे पाठवले जाते. तिथे स्थापित संगणकीय निर्णय प्रक्रिया प्रारूपामध्ये त्याचे विश्लेषण होते.

उदाहरणार्थ तापमान मोजणाऱ्या संवेदकाद्वारे विशिष्ट ठिकाणाचे तापमान दर सेकंड किंवा मिनीटाच्या अंतराने इंटरनेट द्वारे स्थानिक अथवा दुरुस्त संगणकीय सर्वरकडे स्वयंचलितपणे पुढील विश्लेषणासाठी पाठवले जाते. शेतीसाठी वेगवेगळे वातावरण , भौतिक किंवा रासायनिक घटकांची माहिती असणे गरजेचे असते.

Use of Internet of Things in Agriculture

त्यासाठी वेगवेगळ्या संवेदकाची आवश्यकता भासते . उदाहरणार्थ तापमान , आर्द्रता , प्रकाश , सूर्यप्रकाश , पाऊस , वाऱ्याचा वेग जमिनीमधील ओलावा , जमिनीमधील अन्नद्रव्य , पिकातील पाण्याचे प्रमाण , विविध अजैविक व जैविक ताण इत्यादी बाबी मोजणारी संवेदके गरजेप्रमाणे जमिनीत पिकामध्ये हवामान केंद्रात ड्रोन रोबोट्स किंवा इतर फलाटावर (platform) स्थापित केलेले असतात.

आंतरजाल / कनेक्टिव्हिटी याद्वारे आयो टी मधील विविध गोष्टी एकमेकांशी जोडल्या जातात. संवेदकाद्वारे मोजलेली माहिती विश्लेषणासाठी संकणकीय निर्णय प्रक्रिया प्रारूपाकडे त्वरित पाठवले जाते . यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनेट वापरता येते , उदा जी एस एम (GSM),जी पी आर (GPRS),एस सेल्युलर नेटवर्क तंत्रज्ञान (2G,3G,4G,5G),किंवा इतर नेटवर्क यासाठी सिम कार्ड ची आवश्यकता असते..

कृषी क्षेत्राचे डिजिटल सक्षमीकरण :-

नव्या तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर यामुळे भविष्यात शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय साध्य होऊ शकेल . भारतातील शेतकरी आज इंटरनेट ऑफ थिंग्स , कृत्रिम बुद्धिमत्ता , माहिती विश्लेषण , ब्लॉकचेन , रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस सारख्या उदयनमुक्त तंत्रज्ञानाचा फायदा घेत आहे . या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राची लक्षणे वाढ होणार आहे.

कृषी क्षेत्र हा जगातील सर्वात जुने आणि सर्वात महत्त्वाच्या व्यवसायांपैकी एक असून मानवाच्या अस्तित्वासाठीच कृषी आवश्यक आहे . मात्र आज शहरे आणि उद्योगांची वाढ , जलस्रोतांचा होणारा ह्रास , हवामानाचे बदलते स्वरूप आणि अनिश्चितता या सगळ्या कारण्यांमुळे कृषी उत्पन्नत होणारी घट यामुळे आज जागतिक पातळीवरच कृषी क्षेत्र कमी होत चालले आहे. या सगळ्या जागतिक आव्हानांसोबतच , भारताला आणखी काही देशांतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागतो आहे . भारतात कृषी संबंधीचे अनेक निर्णय जसे की पेरणी , पिकांची निवड , खतांचे प्रमाण आणि सिंचन घेण्यासाठी आधीच्या अनुभवांची कुठलीही आधारभूत आकडेवारी आपल्याकडे नसते.

केंद्र सरकारने , अनेक वेळा , कृषी उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यांची उत्पन्न सुधारण्यासाठी संबंधित धोरणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आहे . या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि कृषी धोरणे तसेच कार्यक्रमांच्या अंमलबजावणीला बळ मिळावे यासाठी केंद्र सरकारने अनेक माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान विषयक उपक्रम देखील राबविले आहेत. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान विषयक उपक्रम सुरुवातीच्या काळात स्वतंत्र प्रणालीद्वारे राबविले गेले आणि नंतर त्यांचा वेब आधारित देशव्यापी प्रणालीत विस्तार करण्यात आला. आणि आता त्याचे लक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता , इंटरनेट ऑफ थिंग्स इत्यादींकडे वळले . शेतकऱ्यांना विपणनाचे विविध पर्याय आणि शक्य तेवढी धोरणे राबविण्यात मदत करण्यासाठी केंद्र सरकारने विविध तज्ञ प्रणाली देखील आणले आहेत.

या उपक्रमांचे शाश्वत फायदे आणि त्यांच्या जोडीला नव्या तंत्रज्ञानाचे नाविन्यपूर्ण वापर यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे साध्य होऊ शकेल. भारतातील शेतकरी आज इंटरनेट ऑफ थिंग्स , कृत्रिम बुद्धिमत्ता , माहिती विश्लेषण , ब्लॉकचेन , रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस सारख्या उद्यानमुख तंत्रज्ञानाचा फायदा घेता. या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राची लक्षणीय वाढ होणार आहे . कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर कीटकांची ओळख पटवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. कीटकांच्या प्रादुर्भावाची लक्षणे आणि कीटकांची छायाचित्रे तसेच त्यांच्यामुळे होणारे रोग याची माहिती याप्रमाणे टाकली जाऊ शकते . कीटकांची आणि रोगांची छायाचित्रे टाकल्यानंतर ही प्रणाली ते पडताळून बघेल रोगाची ओळख पटवेल आणि त्यानुसार उपाययोजना सुचवेल.

Use of Internet of Things in Agriculture

Leave a Comment