Tulsi Medicinal Benefits
नमस्कार मित्रांनो, आज आपण तुळस या औषधी वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत. तुळस हि लेबियाटी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक औषधी वनस्पती आहे. आशिया, युरोप व आफ्रिका खंडामध्ये बहुतेक प्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः 30 ते 120 सेमी उंचीपर्यंत वाढतात. तुळशीची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलांना मंजुळा म्हणतात. त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. सुगंधी तेल काढण्यासाठी तुळशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. राम तुळशी व कृष्ण तुळशी हे दोन प्रकार आहेत. विविध जाती पुढील प्रमाणे आहेत. जसे औषधी तुळस, कापूर तुळस, काळी तुळस, कृष्ण तुळस, रान तुळस, राम तुळस.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे. तुळस मंगलतेचे, पवित्रतेचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेक जण विशेषतः हिंदू स्त्रिया नित्यनियमाने तुळशीची पूजा करतात. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात.
तुळस पूजनाने प्रसन्नता लाभते आणि त्यामुळेच घरातील वातावरण देखील शुद्ध आणि सात्विक राहते. रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या झाडासमोर बसून दीर्घ श्वसन केल्यास आरोग्य मिळेल. तिचा रोज संपर्क यावा म्हणून आपल्याला पूर्वजांनी अनेक व्रत वैकल्यात तुळशीचा समावेश केला आहे. वैशाखातील शुद्ध प्रतिपदेला आणि संक्रांतीच्या दिवशी तुळशीला अभिषेक करतात.
Tulsi Medicinal Benefits
आयुर्वेदातील तुळशीचे महत्व
आयुर्वेद आणि निसर्गोपचार औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुळशीचा वापर होत आहे. तुळस वनस्पतीचे फक्त पानेच गुणकारी नसून या वनस्पतीची फुले ही तितकीच बहुगुणी आहेत. लघु, उष्ण, तीक्ष्ण, ख, वगैरे गुणांच्या मुळे तुळस अनेक कार्य करते. मात्र तुळशीमधला सर्वात उपयुक्त गुण म्हणजे सूक्ष्म. शरीरातील लहानातील लहान पोकळीत पोहोचू शकते . यामुळे अत्यंतिक अवस्था (emergency) असली की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस दिल्यास चांगला उपयोग होताना दिसतो. तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले हे सर्वच औषधे आहेत. शिवाय तुळशीतून निघणाऱ्या शुभस्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते.
तुळस वनस्पतीपासून मिळणारे काही आयुर्वेदिक फायदे :-
1 तुळशीच्या पानांचा रस तापाचे प्रमाण कमी करण्यास मदतगार ठरतो तसेच मलेरिया आणि डेंग्यू वर तुळशीचा रस पिल्यास आराम मिळतो.
2 तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावल्यास अति उष्णतेने डोकेदुखीची समस्या दूर होते.
3 तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो. तसेच त्वचेच्या समस्यांवर ही तुळशीच्या पानांचा रस गुणकारी आहे.
4 किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जाणाऱ्यांनी मध आणि तुळशीच्या पानांच्या रसाचे मिश्रण प्यावे . दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. अशावेळी सुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.
5 निरोगी जीवन जगण्यासाठी रोज दहा ते बारा तुळशी पाने रोज खावीत. तुळशीची पाने तणावावर मात करणारे शस्त्र म्हणून काम करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि वार्धक्य कमी करण्यासाठी तुळशीचा रस पिल्याने फायदा पोहोचतो.
6 पोटामध्ये वायू झाल्यास तुळशीचा रस तुपाबरोबर घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही त्यांनी सकाळी तुळशीचा एक चमचा रस साखरेबरोबर घेतल्यास सात दिवसात फरक जाणवतो.
7 कप दोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते . त्यावरही तुळशी रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो. गरम पाण्यात तुळशीचे पाने टाकून गुळणी करावी. दमा आणि ब्रोंकाइटिस असणाऱ्यानाही हे लाभदायक ठरते.
8 तुळशीमध्ये शुद्ध करण्याचा, स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो. मुखामध्ये कपदोष चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो. तो काढण्यासाठी तुळस उपयोगी असते. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाण्याने हे काम होताना दिसते.
9 जखम शुद्ध करण्यासाठी तुळशीचा हा गुण उपयोगी पडताना दिसतो . विशेषतः पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण लावल्यास उपयोग होतो. डास आणि कीटक चावला आहे तेथे तुळशीच्या मुळांची पेस्ट लावावी.
10 तुळशीचे बी मधुर, शीतगुणाचे , धातुवर्धक , पित्तशामक व शुक्रवर्तक आहे. त्यामुळे त्याचा उपयोग अशक्तपणा शुक्र वाढीसाठी व लघवीच्या विकारांमध्ये चांगला होतो. अशक्तपणा व शुक्रवाढीसाठी तुळशीच्या बियांची खीर दूध साखरेबरोबर एक कप प्यावी.
11 हृदयाच्या आरोग्यासाठी तुळस पानामुळे विशेषतः हृदयाचे रक्ताभिसरण होते. असे लखनऊच्या मेडिकल कॉलेजमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांवर केलेल्या संशोधनातून आढळून आलेले आहे.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌
Tulsi Medicinal Benefits
Tulsi Medicinal Benefits