Top 8 Wheat Management Techniques
1) खोडकिडा:-
खोडकिडीचा प्रादुर्भाव गहू ओमींवर असताना आढळून येतो. अळ्या रोपट्यांच्या गाभ्यात शिरून गाभा पोखरतात. परिणामी रोपट्यांचा वरील भाग वाळतो. या किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त रोपे मुळासकट उपटून त्यांचा नायनाट करावा. किडींचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास क्लोरोपायरीफॉस हेक्टरी 250 मिली पाण्यात मिसळून फवारणी किंवा 40 ग्रॅम कार्बरील 50% पा.मि.भू. अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
पेरणी: पेरणीच्या वेळेची योग्य निवड आणि अंतर राखणे रोगांच्या प्रादुर्भावास कमी करण्यास मदत करते.
माथा:– ही पिवळसर किंवा काळपट हिरवी तिळाच्या दाण्याच्या आकाराची चिमुकली कीड असून या किडीचे प्रौढ आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात. त्यामुळे पाणी पिवळसर रोगट बनतात. हे कीड विष्टेद्वारे चिकट द्रव पानावर टाकत असल्यामुळे त्यावर काळी बुरशी वाढून पाने काळी पडतात व प्रकाश संश्लेषण बंद होऊन रोप मरते. या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेबोएट 30 ईसी 500 मिली किंवा मिथिल डेमेटोन 25 ई सी 400 मिली पाचशे लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
Top 8 Wheat Management Techniques
तांबेरा:-
हा हवेद्वारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानावर विखुरलेले नारंगी रंगाचे फोड येतात. जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबेऱ्यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वाणांचा वापर करावा.
(उदाहरणार्थ एचडी 2179, पूर्णा, एकेडब्ल्यू 381 व एचआय 977, एकेडब्लू 3722 , एकेडब्लू 4627) तांब्याची लागण दिसतात mankozeb हे बुरशीनाशक 25 ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारण्या करावे.
प्रतिकारक वाणांची निवड: रोगविरोधक वाणांची निवड करून रोगांचा प्रादुर्भाव कमी केला जाऊ शकतो.
काजळी किंवा काणी:-
या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे होतो. रोगट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळे भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हींटावॅक्स किंवा कार्बेडाझिम या बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावी.
पानावरील करपा:-
गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक 25 ग्राम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पेरणीपूर्वी उपचार: बीजांवर बीजप्रवेशक औषधांचा वापर करून रोगांच्या नियंत्रणात मदत होते.
फेरोमोन ट्रॅप्सचा वापर: काही रोगाणूंना नियंत्रणात ठेवण्यासाठी फेरोमोन ट्रॅप्स वापरणे.
सत्यापन आणि निरीक्षण: पिकांवर नियमितपणे निरीक्षण करून रोगाच्या लक्षणांची तपासणी करणे आवश्यक आहे.
पाण्याचे व्यवस्थापन: पिकाच्या विकासासाठी योग्य पाण्याची व्यवस्था करणे आणि अति पाणी जमिनीतून बाहेर काढणे.
आवश्यक कीटकनाशक आणि रोगनाशक औषधांचा वापर: योग्य वेळेला आणि योग्य मात्रा मध्ये औषधांचा वापर करणे.