Techniques for producing healthy lemon plants
लिंबाच्या सदृढ व निरोगी रोप निर्मितीचे तंत्र
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लिंबाच्या सदृढ आणि निरोगी रोपाच्या निर्मितीच्या तंत्राबद्दल. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र , नागपूर येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रोपवाटिका व्यवस्थापनासाठी करून लिंबाची रोग विरहित रोपे तयार करण्याचे लक्ष निर्देशित असा हा एकमेव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
अल्प उत्पादनात , बागाच्या उत्पादनक्षम आयुर्मर्यादित लक्षणीय घट व शेवटी बागांच्या ऱ्हास होणे इत्यादीच एकमेव कारण म्हणजे रोग विरहित सदृढ पणेरी उपलब्ध न होणे हे होय . या प्रकल्प अंतर्गत बुरशी व विषाणूयुक्त रोगांपासून मुक्त
अशी तयार केलेली ही रोपटी शासकीय व खाजगी पन्हेरीत मातृ वृक्ष म्हणून वापरले जावित हा हेतू आहे . यामुळे बागेच्या होणाऱ्या ऱ्हासावर मात केली जाऊ शकेल.
रोगमुक्त रोपे तयार करण्यासाठी वापरात आणलेल्या तंत्राची माहिती पुढील प्रमाणे.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
कंटेनराईड रोपवाटिका पद्धती :-
पारंपरिक पन्हेरीत एकदा का फोयटोफ्लोरा सारख्या मातीजन्य बुरशीचा शिरकाव झाला की तिचा नायनाट करणे अशक्यप्राय होते. हे टाळण्यासाठी बंदिस्त रोपवाटिका पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. अशा पनेरीसाठी शेडनेट हाऊस , निर्जंतुक केलेले प्लास्टिक ट्रे , युवी स्टॅबिलाइज , काळ्या पॉलिथिन पिशव्या , सौरऊर्जेद्वारे पेंटिंग मिक्सर चे निर्जंतुकीकरणासाठी युवी स्टॅबिलायझर , पारदर्शक पॉलिथिन , पॉंटिंग मिक्सरचे धुरळीकरण व रोपवाटिकेसाठी लागणारे वेगळे अवजारे इत्यादींची आवश्यकता असते.
एक भाग सुपीक माती , दोन भाग निर्जनतुक केलेली वाळू यांचे मिश्रण प्राथमिक रोपवाटिकेत प्लास्टिक ट्रेमध्ये बिजारोपण करण्यासाठी टाकतात . असेच निर्जंतुक केलेले वाळू मातीचे मिश्रण द्वितीय रोपवाटिकेत प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरण्यासाठी वापरावे लागते.
२) सौर निर्जंतुकीकरण :-
उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात जेव्हा 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाते तेव्हा विशेष रित्या तयार केलेल्या सिमेंटच्या ओट्यावर वाळू मातीच्या पाँटिंग मिक्सरच्या दीड फूट जाळीचा थर करून पसरावे. या पॉटिंग मिक्सरवर पाणी शिंपडून त्यास चांगले ओले करावे . त्यानंतर त्यास शंभर मायक्रोन जाडीच्या पारदर्शक अल्ट्राव्हायोलेट लाईट द्वारा उपचारीत पॉलिथिनच्या चादरीने झाकून घ्यावे. पॉलिथिनच्या सर्व कडा ओल्या मातीने बंद कराव्यात . जेणेकरून बाष्पीभवनाद्वारे होणारी वाफ बाहेर नीसटणार नाही . त्यामुळे आतील तापमान 54 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते. परिणामतः चार ते सहा आठवड्यापर्यंत चालणारे या क्रियेस सौरऊर्जेद्वारे पेंटिंग मिक्सरने निर्जंतुकीकरण केले जाते.
३) विषारी धुरळणी :-
सौर ऊर्जेद्वारे निर्जंतुक केलेले पेंटिंग मिक्सर चे पुन्हा बासामेड नामक रोग नाशकाचे दाणे मिसळून त्यास निर्जंतुक केले जाते . या दाण्यातून मिथाईल हा विषारी वायू निघतो. त्याद्वारे फायटर फ्लोर, पिथियम, रायाझो क्तोनिया सारख्या मातीजन्य बुरशी रोगांचा नायनाट होता . अशाप्रकारे सौर ऊर्जा व बासामिडचा वापर करून निर्जंतुक केलेले पॉंटिंग मिक्चर प्लास्टिक ट्रे व पॉलिथिन पिशव्या भरण्यात येते. प्राथमिक रोपवाटिकेत कुंटाचे रोपटे तयार करण्यासाठी 60 बाय 40 बाय 12 सेंटीमीटर आकाराचे निर्जंतुक केलेले प्लास्टिक ट्रे वापरण्यात येतात. हे ट्रे जमिनीमधून कुठल्याही मातीचे निरोगांची लागण होऊ नये हा यामागे हेतू रोपवाटिकेत जमिनीवर दगडी पावडर बारीक बाजरीचा दोन ते चार इंच जाडीचा थर टाकावा. त्यामुळे जमिनीवर पाणी पडले तरी वर उडणार नाही व त्याद्वारे कुठलेही मातीजन्य रोगानू पसरू शकणार नाही . याशिवाय चुनाव मोरचूद मिश्रणही नियमितपणे फवारावे.
Techniques for producing healthy lemon plants
१) फळातून बिया काढणे :-
शिफारस केलेल्या खुटांची व चांगल्या जातीचे लिंबाची परिपक्व फळे गोळा करावीत . अशा फळातून काढलेल्या टपोऱ्या बिया निर्जंतुकीकरणानंतर पेरणीसाठी उपयोगात आणाव्यात . शिवाय खबरदारी म्हणून बियांची लवकर व जास्तीत जास्त उगवण्यासाठी जर्मिनेटरची आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मँकोझेब अधिक मेटल एक्सेल संयुक्त बुरशीनाशक आणि कार्बेडाझीम या बुरशीनाशकांद्वारे बियाण्याची प्रक्रिया करून नंतरच ट्रेमध्ये पेरणी करावी . बिया काढण्यासाठी झाडाखाली पडलेली फळे वापरू नये . कारण अशा फळातील बियातून फायटोफ्लोरा पसरण्याचा धोका असतो.
२) बिजारोपण व उगवणी :-
फायटर फ्लोरा बुरशीला मध्यम प्रमाणात प्रतिरोधक असलेल्या रंगपुर लाईस व रफ लेमन कुटांच्या बिया 1.5 cm खोलवर रोपव्यात.
बिजारोपण केलेल्या स्टरीलाइज छायदार असलेला शेडनेट खाली ठेवावे बिजारोपणानंतर वीस ते पंचवीस दिवसात फुटांच्या जातीनुसार उगवणे सुरू होते दोन्ही प्रकारच्या खोटं सुमारे 85 ते 90 उगवण होते.
द्वितीय रोपवाटिका :-
उत्कृष्ट वाढीची व योग्य उंचीची कुंटाची प्राथमिक रोपवाटिकेतील न्यू सेलर रोपटी निवडावी . पॉली बॅगमध्ये रोपण करण्यासाठी अशी रोपटी उपटताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी . खूप उंच किंवा खूप टेनिस तसेच वाकलेली मुरडलेली फोकसदृश्यमुळे असलेले रोपे प्राथमिक रोपवाटिका स्तरावरच निरस्त करावी फायटॉक्रोरा व अन्य मातीचे निरोप वाढूंचा प्रादुर्भाव करण्यासाठी रोपवाटिकेचे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक असते.
अतिशय निवडक सदृढ , रोगविरहित रोपांची पावसाळ्याची सुरुवात झाल्यावर जुलै – ऑगस्ट महिन्यात शक्यतोवर सायंकाळी किंवा रिमझिम पाऊस असताना लागवड करावी.
वायरस व वायरल सदृश्य रोगांचे निदान :-
लिंबूवर्गी फळझाडांवर 15हून अधिक वायरस व वायरस सदृश्य रोगांचा प्रादुर्भाव होतो ही संभावना टाळण्यासाठी निवड केलेल्या उत्कृष्ट मातृ वृक्षाचे नमुने गोळा करून सिस ट्रीस्टेजा वायरस , लिटस मोझक , सीटस रिंग स्पॉट , सीटस एकजोकोटीस व्हायराईड इत्यादी रोगणूविषयक जैविक सेरोलॉजिकल तपासणी द्वारे निवडलेले मातृ वृक्ष वरील रोखणापासून मुक्त असल्याची पक्की खात्री केली जाते.
१) सेरोलॉजिकल तपासणी :- मोनोक्लोनल आणि पॉलीक्लोनल अँटीबोडीज चा वापर करून डी एस मध्ये सरोलोजिकल इंडेक्सिंग केले गेली.
२) जैविक तपासणी :-
इंडिकेटर झाडांचा उपयोग करून कीड विरोधक आवरणाखाली जैविक इंडेक्शन सुद्धा करण्यात येते . अशा प्रकारे निवडलेल्या उत्कृष्ट मातृ वृक्षातील वायरस सहित झाडे पुढील प्रजोत्पादनासाठी वापरण्यात येतात.
रोप संरक्षण उपायोजना :-
१) फायटोकथोरा रोगासाठी पाहणी :- लिंबूवर्गीय रोपवाटिकेत फायटो कथोरामुळे होणारे रोगांचा गंभीरुपद्र होतो व रोपवाटीकेच्या कुठल्याही अवस्थेत संक्रमित माती , पाणी तसेच रोपवाटिकेतील अवजाराद्वारे सुद्धा या रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ शकतो. म्हणून पाठव कचरा व अन्य रोगांच्या संसर्गासंबंधी नियमित पाहणी करावीत संसर्ग झाला आहे असे आढळून येतात संसर्गीय रोपटी समूळ उपटून नष्ट करावी . हेतू आज की फायाटो कथोरा रोगापासून रोपवाटिका पूर्णतः मुक्त राहील. खबरदारीचा उपाय म्हणून रिडोमिल एमजेड 72 किंवा हार्मोनी या सेंद्रिय बुरशीनाशकाची फवारणी एक महिन्याचे अंतराने फायटोकतोराचा संसर्ग टाळण्यासाठी करावे. नर्सरीतील अवजारे सोडियम हायपोक्लोराइड द्रावणात प्रत्येक वेळी बुडवून नियमितपणे निर्जंतुक करावे. तसेच रोपवाटिकेच्या प्रवेशद्वारात कामगारांचे व अगंतुकांची पादत्राणे निर्जंतुक करण्यासाठी व त्याद्वारे होणाऱ्या संभाव्य रोग संसर्गापासून बचावासाठी चुनाव मोरचूदाने मिश्रण पसरवून ठेवावे.
२) रोपवाटिकेतील अन्य रोग:-
विदर्भातील वातावरणात रोबोटिकेतील रोगवाढीच्या काळात पानटोक जळणे तांबेरा मुळे होणारा करपा अशा अनेक रोगांना रोपे बळी पडण्याची शक्यता असते यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून तर महिन्याला कार्बनडाजिम ची फवारणी करावी . रोपवाटिकेत जमिनीवर व प्रवेशद्वारात ताम्रयुक्त बुरशीनाशकांची फवारणी नियमितपणे करावी. देशाच्या अन्य भागात पानावर सीटस स्कॅब , पावडर अल्टरनेरिया इत्यादी रोगांची समस्या दिसून येते . रोपे तसेच डोळा बांधणी केलेल्या कलमांची चांगली वाढ व्हावी म्हणून अशा रोगांचे नियंत्रण रोपवाटिकेतच करणे आवश्यक ठरते.
३) किडी :- द्वितीय नर्सरी कांडीची व्यवस्थापन आवश्यक असते त्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची नियमितपणे फवारणी करावी केलेल्या कीटकनाशकांची नियमितपणे फवारणी करावी पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डायमेबोईट 1.25 मिली रेट एक मिली याप्रमाणे आलटून पालटून तर एपिड आणि पाने खाणाऱ्या अळीसाठी लिनोवो प्लस लिटर पाणी या दराने फवारणी करावी.
रोग रहित लिंबूवर्गीय फळवाटीका तयार करताना घ्यावयाची काळजी :-
– पुणेरी ही लिंबूवर्गीय बगीच्यापासून दूर असावी.
– रोपवाटिका तयार करण्यासाठी व रोपे लावण्यासाठी प्लास्टिक ट्रे पॉलिथिन पिशव्यांचा वापर करावा.
– प्राथमिक आणि द्वितीय रोपवाटिकेत फक्त निर्जंतुक केलेल्या पॉटिंग मिक्स्चरचाच वापर करावा.
– निरोगी फळातून घेतलेल्या ताज्या स्वस्थ फळांच्याच बियांचा नेहमी वापर करावा व चांगल्या अंकुरणासाठी शेडनेट खाली प्लास्टिक निर्जंतुक ट्रेमध्ये लागवड करावी.
– बियांचे ड्रेस प्लास्टिक कंटेनर जमिनीपासून 1.5 ते 2.0 फूट उंचीवर ठेवावे. तसेच जमिनीतून रोगाची लागण होऊ नये म्हणून जमिनीवर बाजरी व दगडी पावडरचा थर द्यावा.