Sukshm Sinchan Paddhat Band Padanyachi 12 Karane
फळबागेतील सूक्ष्म सिंचन संच बंद पडण्याची कारणे व उपाय
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फळबागेतील सूक्ष्म सिंचन पद्धत बंद पडण्याची काही कारणे व त्यावरील काही उपाय. पृथ्वीवरील एकूण 70 टक्के पाणी समुद्रात आहे . एकूण पाण्यापैकी 27 टक्के पाणी खारे व 2 टक्के पाणी बर्फाचे स्वरूपात आहे . म्हणजे एक टक्का पाणी वापरासाठी उपलब्ध आहे . या टक्क्यांपैकी उपयोगात आणण्यासारखे एकूण पाणी 0.62 टक्के इतकेच आहे . यावरून शेती व दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण किती कमी आहे हे स्पष्ट दिसून येते .
उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक झाले आहे . जेणेकरून कमी पाण्यात जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येईल व पिक सुद्धा वाढवता येईल . म्हणूनच आधुनिक सूक्ष्म सिंचन ही सिंचनाची पद्धत आजच्या काळाची गरज बनली आहे . सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे पाण्याचा व्यय न होता उत्पन्नात वाढ आणि फळाची गुणवत्ता ही सुधारते.e भारताची वार्षिक पर्जन्यमान 1170 मि.मी. इतकी आहे आणि त्यापैकी जास्तीत जास्त पाणी पावसाळात येते .
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
1950 मध्ये ओलिताखाली लागवड ही 19.5 दशलक्ष हेक्टर होती . ती लागवड वाढून 1985 मध्ये 67.89 दशलक्ष हेक्टर झाली आहे . भारतामध्ये 4.84 लाख हेक्टर क्षेत्र लिंबूवर्गीय फळ झाडाखाली असून एकूण उत्पन्न 42.6 लाख टन आहे . त्यापैकी नागपुरी संत्रा व लिंबू अनुक्रमे 40% आणि 25% क्षेत्रामध्ये पसरले आहे . कमी फळ उत्पादनासाठी महत्त्वाचे कारण म्हणजे पाण्याची अजूक नियोजनाची जाण नसणे . कारण फळझाडांना कमी किंवा जास्त पाणी दिल्याने उत्पादनात घट होते . मोठ्या प्रमाणावर लिंबूवर्गीय बागा वाळण्याचे कारण म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेमध्ये कमी , कोरडे दुष्काळ आणि जमिनीतील पाण्याची पातळी कमी होणे . या भागामधील सरासरी उत्पन्न हे सात ते आठ टन प्रती हेक्टर आहे . जे तीन ते चार पटीने दुसऱ्या देशाचे लंबवर्गीय फळबागा असलेल्या शेतकऱ्यापेक्षा कमी आहे.
साधारणतः जमिनीवरून सिंचन देण्याची पद्धत लिंबूवर्गीय क्षेत्रात वापरली जाते. परंतु सध्या काही वर्षापासून विविध फायदे असलेल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब होत आहे. या पद्धतीमुळे 60% पर्यंत पाण्याची बचत होऊ शकते आणि उत्पन्न 30 टक्के पर्यंत वाढू शकतो.
फळ झाडाच्या उत्पन्नाची यश हे प्रामुख्याने फळ झाडांच्या वाढीतील विशिष्ट कालावधीमध्ये उपलब्ध असलेल्या पावसाच्या पाण्यावर किंवा पाण्याच्या अतिरिक्त मात्रा वर अवलंबून असते. विविध सूक्ष्म जलसिंचन पद्धती पिकांनुसार व जमिनीुसार वापरता येतात. महाराष्ट्रात सूक्ष्म जलसिंचन पद्धती व ठिबक सिंचन पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते व सन 2004-2005 अखेर 2 लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचन वापरण्यात आले.
संत्रा फळबाग वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी नवीन सूक्ष्म सिंचन पद्धतीचा उदाहरणार्थ ठिबक , सूक्ष्मधारा व तुषार पद्धतीचा वापर करणे हे काळाची गरज आहे . फळबागाचे क्षेत्रफळ वाढविण्या ऐवजी उत्पादनक्षमता व उत्पादकता वाढविणे अतिशय महत्त्वाचे आहे . भारताचे एकूण क्षेत्रफळापैकी ठिबक व तुषार सिंचनाखाली अनुक्रमे 27 आणि 42.5 दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळ येऊ शकतो.
सूक्ष्म सिंचनाला भारत सरकारने अतिशय प्राधान्य दिले असून केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत दहाव्या पंचवार्षिक योजनेत 1.5 दशलक्ष हेक्टर ठिबक सिंचनाखाली व 0.5 दशलक्ष हेक्टर तुषार सिंचनाखाली आणण्याचे लक्ष निर्धारित केले आहे . यावरून केंद्र सरकारचे पाणी नियोजनासाठी चाललेले प्रयत्न दिसून येते . तेव्हा आपणही सरकारला साथ देऊन या लाभदायी सूक्ष्म सिंचनाचा वापर करायला पाहिजे.
सूक्ष्म जलसिंचनाची विविध घटक व कार्य :-
ठिबक सिंचन संचामध्ये मुख्यत्वे करून खालील प्रमाणे घटक असतात.
१) मुख्य वाहिनी
२) उपमुख्य वाहिनी
३) उपनळ्या
४) तोट्या
५) वाळूची गाळण टाकी
६) जाळीची गाळणी
७) नियंत्रण झडपा
८) पाणी दाब मापके
९) खते देण्याची टाकी किंवा वेंचुरी
१०) बायपास यंत्रणा
११) बॅक फ्लश यंत्रणा
१२) विद्युत मोटर पंप सेट
या घटकाचे कार्य ठिबक सिंचनामध्ये काय असते ते खालील प्रमाणे आपण बघूयात.
इलेक्ट्रिक मोटर पंपसेट पासून मिळणारे पाणी उपमुख्य वाहिनीस पुरविण्यासाठी मुख्य वाहिनीचा उपयोग होतो . या वाहिन्या पी.व्ही.सी. किंवा एच.डी.पी.ई. पासून बनविलेले असतात . या वाहिनीचा व्यास हा पिकास लागणारे पाणी , पाणी किती अंतरावरून न्यावयाचे आहेत ते अंतर , वाहिनीतील दाब – व्यय इत्यादी. बाबींवर अवलंबून असतो. मुख्य वाहिन्या जमिनीखाली दोन फूट गाडणे आवश्यक असते . त्यामुळे त्याचे आयुष्यमान वाढते. सर्वसाधारणपणे त्याचा व्यास 75 मि.मी. किंवा 63 मि.मी. ईतका लागतो.
२) उपमुख्य वाहिनी :-
मुख्य वाहिनी मधील पाणी उपमुख्य वाहिनी द्वारे उपनद्यांना पोहोचविले जाते . या उपमुख्य वाहिन्यांची संख्या शेताच्या क्षेत्रावर तसेच उपलब्ध पाण्यावर अवलंबून असेल . उपमुख्य वाहिन्या पीव्हीसी किंवा एचडीपीई च्या असतात . यांचा व्यास मुख्य वाहिनी प्रमाणेच काढतात . सर्वसाधारणपणे यांचा व्यास 63 मि.मी. किंवा 50 मि.मी. इतका शक्य असल्यास उपमुख्यवाहिन्या जमिनीत काढाव्यात. उपमुख्य वाहिनी मध्ये पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी त्यावर एक झडप असते. तर शेवटच्या टोकाला साफ करणारी झडप , फ्लश व्हाल असते. फ्लश करणाऱ्या झडपेच्या सहाय्याने उपमुख्य वाहिनी स्वच्छ करता येते.
३) उपनळ्या :-
उपनद्या मुख्य वाहिनीस जोडलेले असतात . त्यासाठी जोड तुकड्याचा उपयोग करतात. उपनद्यांवर आवश्यकतेनुसार तोट्या बसविलेले असतात उपनद्यांचा व्यास सर्वसाधारणपणे 16 मीटर असतो पण फळ झाडांसाठी हा व्यास 12 मि मी घेतला तरी चालतो. उपनळ्या एल डी पी ई किंवा एल एल डी पी ई पासून बसविलेल्या असतात . या नळ्यांची शेवटची टोके बंद केलेली असतात.
४) तोट्या / सूक्ष्मनलिका :-
ठिबक संचाने पिकास पाणी देण्यासाठी शेवटचा घटक म्हणजे तोटी किंवा सूक्ष्मनलीका . तोट्याचे कित्येक प्रकार आहेत. त्यामध्ये मुख्य म्हणजे दाब नियमक व दाब नियमन न करणारे तोट्या येतात . त्यांचे उपप्रकार त्यांच्या ताशी प्रवाहावर केलेले आहेत. त्या चार लिटर व आठ लिटर प्रति तास प्रवाहांच्या असतात . उपनळीची लांबी शेताचे माप किंवा त्यावर असलेल्या तोट्यांची संख्या यावर अवलंबून असते . दोन तोट्याचे अंतर हे जमिनीचा प्रकार व पिकाच्या दोन ओळीतील अंतर यावर अवलंबून असते .
सूक्ष्म नलिका जरी स्वस्त असल्या तरी त्यांच्या वापरामुळे उपनळीच्या लांबीवर खूप मर्यादा येतात. जास्त ढाळ असलेल्या जमिनीसाठी दाब निर्माण करणार तोटे वापरणे आवश्यक आहे . ठिबक टेप असलेल्या उपनद्यांना तोट्यांची गरज नसते. कारण त्यावर जवळपास 30 cm वर सूक्ष्म छिद्रे असतात. अशा ठिबक टेपची किंमत कमी असून ते कमी अंतर असलेल्या पिकांसाठी वापरता येतात.
५) वाळूची गाळण टाकी:-
पीक वाढीसाठी वापरायचे पाणी विहीर अथवा कालव्यातून / नदीतून घेतलेले असेल तर अशा परिस्थितीत ही वाळूची गाळण टाकी ठिबक संचात असणे गरजेचे आहे. कारण या वाळूच्या गाळण टाकीने पाण्यात असलेल्या काडी कचरा , शेवाळ इत्यादी गाळून पाण्याची प्राथमिक स्वरूपात स्वच्छता केली जाते. व त्यामुळे तोट्या लवकर बंद पडत नाहीत. एका वेळेस किती क्षेत्रात किती पाणी द्यायचे आहे तेवढे पाणी गाळण्यसाठी लागणारी गाळण क्षमतेची वाळूची टाकी घेणे आवश्यक आहे.
६) जाळीची गाळणी :-
वाळूच्या गाळण टाकीतून पाणी प्राथमिक स्वरूपात स्वच्छ होऊन आल्यानंतर सुद्धा पाण्यात सूक्ष्म रूपात काडीकचरा , वाळूचे कण ई. असतात. त्यांना पाण्यातून बाहेर काढून पाणी संचात पाठविण्यासाठी जाळीची गाळणी संचात असते . जर पाणी ओपन कुपनलिकेतून घेतले असेल तर त्यासाठी फक्त जाळीची गाळणी लावली तरी पुरेशी होते . या गाळण्या दोन प्रकारचे असतात . एक धातूची किंवा प्लास्टिकच्या चाळणी तर दुसरी म्हणजे चकत्यांची चाळणी. चकत्यांच्या चाळण्या तुलनात्मक महाग पडतात.
७) नियंत्रक झडपा :-
संचात पाण्याचा प्रवाह व दाब नियंत्रित करण्यासाठी सुरुवातीला वाळूच्या गाळण टाकीजवळ नियंत्रक झडपा बसविलेले असतात . संचात याची व्यवस्था असणे आवश्यक असते . तसेच उपमुख्य नळीवर शेवटी फ्लश व्हाल असतो. ज्याच्या सहाय्याने उपमुख्य वाहिन्या स्वच्छ करता येतात. याशिवाय उपलब्ध पाणी कमी असल्यास शेताची विभागणी करून एकेक भाग आळीपाळीने भिजविला जातो . यासाठी नियंत्रक झडप प्रत्येक उपमुख्यनळीवर बसवावी लागते.
८) पाणी दाब मापके :-
ठिबक संचाने मोजून पाणी देण्यासाठी किती पाण्याच्या दाबास किती पाणी तोट्यांद्वारे बाहेर पडते याची माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी पाण्याच्या दाबाकडे नेहमी लक्ष ठेवावे लागते . तसेच गाळण व्यवस्थेजवळील दाबमापातील पाण्याचा दाब 10% पेक्षा कमी झाल्यास गाळण यंत्रणा स्वच्छ करणे गरजेचे आहे असे ओळखावे.
९) खत देण्याचे पंप :-
पिकास खते द्यावयाची झाल्यास संचात खत देण्यासाठी सोय असावी लागते . त्यासाठी संचात वेंचुरी नालिका , खताची टाकी किंवा खत देण्याचे पंप लागते. वेंचुरी नलिकेची किंमत कमी आहे . ही पाण्याच्या दाबातील फरकावर चालणारी साधने आहेत . जी खते पूर्णपणे पाण्यात मिसळतात अशी द्रवरूप किंवा घनरूप खते यातून सहजपणे देता येतात . ही खते एकदम न देता जास्तीत जास्त हप्त्यात द्यावेत की जेणेकरून ते वाया न जाता सतत पिकास त्याच्या गरजेनुसार उपलब्ध होतील.