Need For Improved Implements For Agriculture
शेतीसाठी सुधारित अवजारांची गरज
नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण बघणार आहोत शेतीसाठी अवजारांची गरज कशा प्रकारे फायद्याची आणि उत्पादन वाढविण्यासाठी महत्त्वाची आहेत . शेतीचे यांत्रिकीकरण म्हणजे शेतीची विविध कामे करण्यासाठी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे योग्य वापर करून उत्पादन वाढविणे होय . यामध्ये सर्व यांत्रिकी सुविधांची सुधारणा करणे , त्यांचा उपयोग आणि व्यवस्थापन करणे , पीक उत्पादन , पाणी व्यवस्थापन , वस्तूंची ने – आण , साठवण आणि प्रक्रिया या सर्व कामांसाठी यंत्राचा वापर करणे या गोष्टींचा समावेश होतो.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
शेतीचे यांत्रिकीकरण म्हणजे फक्त ट्रॅक्टर किंवा कम्बाईन हार्वेस्टर सारखी मोठी यंत्रे शेतामध्ये वापरणे नव्हे तर ही गरजेनुसार बदलांचा आघात न होऊ देता शेती तंत्रामध्ये बदल करण्याची प्रक्रिया आहे . तसेच इतर सर्व गुंतवणुकीची अनुकूलता निर्माण करण्यासाठी पुरेसा वेळ देणारी प्रक्रिया आहे . म्हणजेच शेतकऱ्याला शेतातून हाकलून त्याची जागा यंत्रे घेणार नाहीत तर त्याला मदत करून कमी कष्ट जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानासारखा नोकर त्याच्या किमतीला रुजू होणार आहे . अशा या यांत्रिकी सुविधांमध्ये सुधारित अवजारे , जनावरांनी ओढली जाणारी अवजारे , इलेक्ट्रिक मोटार , इंजिन , पावर टिलर , ट्रॅक्टर , कापणी मळणी यंत्र , प्रक्रिया आणि वाहतुकीची साधने या सर्वांचा समावेश होतो .
यांत्रिकीकरणाची तीन मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत.
- १) शेती कामातील कष्ट कमी करणे.
- २) शेतमजुराची उत्पादकता वाढविणे.
- ३) वेळेची बचत करताना शेती कामाची गुणवत्ता वाढविणे.
शेतीमध्ये काम करणे म्हणजे कष्टदायक आणि कमी मोबदला देणारे आहे . त्यामुळेच नवी पिढी शेतीकडे पाठ फिरवून शहराचा रस्ता धरू लागली आहे. मनुष्य त्याच्या शारीरिक बळाचा वापर करून फार चांगले जीवन जगू शकत नाही . एक प्रौढ माणूस साधारणतः 150 वॅट ताकद निर्माण करतो . म्हणजे सतत काम करताना 0.15 की. वॉट तास ऊर्जा निर्माण करतो . त्याचवेळी एक चांगला ट्रॅक्टर एक लिटर डिझेलमध्ये 3 की.वॉट तास ऊर्जा निर्माण करू शकतो . म्हणजे शक्ती स्त्रोत म्हणून माणसाचा विचार केल्यास त्याची तुलना ताशी 0.10 लिटर डिझेलशी होऊ शकते . जर डिझेलचा दर रुपये 80 रू प्रति लिटर धरला तर माणूस फक्त रू 4 /- प्रति तास पगार देण्याच्या योग्यतेचा ठरतो . सुदैवाने यांत्रिकीकरण शेतकऱ्याला कमी मोबदला आणि काबाड कश्टातून मुक्त करण्यासाठी , त्याच्या शक्ती पेक्षा कित्येक पटीने जास्त कार्य करण्यास मदत करते.
शेतकरी जेव्हा यंत्राचा वापर करतात त्यावेळी शेतीची उत्पादकता वाढते . याचे जिवंत उदाहरण म्हणजे पंजाब , हरियाणा मधील गहू-भात शेती होय . जरी सुधारित बियाणे , खते , कीटकनाशके , पाणी आणि इतर शेती आदानाचा उत्पादन वाढीमध्ये सहभाग असला तरी यांत्रिकीकरण हा एक मुख्य घटक ठरला आहे . त्यातून शेतीचे यांत्रिकीकरण प्रति मनुष्य-तास उत्पादकता वाढविण्यास कारणीभूत आहे . म्हणूनच अमेरिकेसारखा देश कमी शेतकरी असताना सुद्धा शेती उत्पादनांची निर्यात जगभरात करू शकतो.
शेतीची काही कामे , पेरणी आणि कापणी करण्यासाठी एक सर्वोत्तम वेळ ठरलेली असते . जेव्हा आपण या वेळेला जवळपास कामे करतो तेव्हा पीक उत्पादन जास्तीत जास्त मिळते . ज्या शेतकऱ्याकडे जास्त मजूर किंवा जास्त क्षमतेची यंत्रे उपलब्ध असतात तो अशी निर्णायक कामे सर्वोत्कृष्ट वेळेच्या जवळपास पूर्ण करू शकतो . परंतु आजकाल मजुरांची उपलब्धता कमी होत आहे . त्यामुळेच यांत्रिकीकरणाला पर्याय नाही.
यांत्रिकीकरणामुळे शेती कामाची गुणवत्ता सुद्धा वाढते . उदाहरणार्थ पूर्वी वापरल्या जाणाऱ्या लाकडी नांगरापेक्षा फाळाच्या नांगराचे खोल आणि परिपूर्ण नांगरणी करता येते.
यांत्रिकीकरणाची सद्यस्थिती :-
शेतीच्या यांत्रिकीकरणातील घटकांचे शक्ती स्त्रोतावर आधारित वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल :-
१) सुधारित मानवचलित अवजारे :-
जी शेती कामे मनुष्य स्वतःच्या हाताने आजवर करत आलाय , जसे खुरपणी , कापणी , शेंडे खुडणे , बिया टोकने इत्यादी कामे करण्यासाठी उपयुक्त अशी अवजारे विविध संशोधन संस्थांनी विकसित केले आहेत. ही अवजारे शरीरावरचा ताण कमी करून कामाचा वेग वाढवितात.
उदा हात कोळपे , टोकण यंत्रे , फवारणी यंत्रे , खत विस्कटण्यासाठी यंत्रे , विळे, खुरपी , नर्सरी साठी सूऱ्या , कात्र्या इत्यादी उपकरणे बाजारात उपलब्ध आहे.
२) सुधारित पशुचलित अवजारे :-
जगामध्ये सर्वात जास्त जनावरे भारतात आहेत . त्यामुळेच जवळजवळ 80% शेतकरी जनावरांनी ओढण्याची अवजारे वापरतात . सुधारित अवजारे वापरल्याने कार्यक्षमतेमध्ये वाढ होते.
पशुचलित अवजारांमध्ये मशागती-पासून मळणी आणि प्रक्रियेसाठी लागणारी बहुतेक सर्व अवजारे उपलब्ध आहेत . उदाहरणार्थ पलटी फळाचे नांगर , तव्याचे कुळव पात्याचा कुळव , पात्यांचा कुळव , कल्टीवेटर , सपाटीकरण यंत्रे , सारा यंत्र , सरी यंत्र, पेरणी यंत्र , कोळपणी यंत्र , चिखलणी यंत्र सुधारित बैलगाडी इत्यादी. पशुचलित अवजारे आता आपल्या गावातील सुतार , लोहार सुद्धा बनवू लागले आहेत. त्याचबरोबर काही खाजगी कारखाने आणि संस्था सुद्धा सुधारित अवजारांची विक्री करतात..
३) ट्रॅक्टर , पावर टिलर आणि त्यांच्या सहाय्याने चालणारी अवजारे :-
ट्रॅक्टर हा यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक मानला गेला आहे . भारतात 1991 साली सुरू झालेले ट्रॅक्टर वार्षिक उत्पादन 9000 ट्रॅक्टर वरून 2.5 लाख ट्रॅक्टर वर पोहोचले आहे . सध्या भारतात 28 ते 30 लाख ट्रॅक्टर कार्यरत आहेत.
ट्रॅक्टर सोबत अनेक अवजारे आणि यंत्रे वापरता येतात . उदाहरणार्थ , फाळाचा नांगर , तव्याचा नांगर वेगवेगळ्या प्रकारचे कुळव , रोटावेटर , कल्टीवेटर , सपाटीकरण यंत्र , पेरणी यंत्र , फवारणी यंत्र , कापणी यंत्र , मळणी यंत्र इतकेच काय तर पाण्याचे पंप आणि विद्युत जनित्र सुद्धा ट्रॅक्टरने चालवता येतात.
ट्रॅक्टर हे बहुउपयोगी वाहन असून शक्ती स्त्रोत म्हणून शेतीसाठी तो वरदानच ठरला आहे . ट्रॅक्टरचा कामाचा उरक इतका आहे की आपली सर्व शेती कामे करून शेतकरी त्याचा वापर ऊस वाहतूक आणि भाडेपट्टीवर देण्यासाठी देखील करतात.
४) इतर स्वयंचलित यंत्र :-
ही यंत्रे काही विशिष्ट कामे करण्यासाठी तयार केलेले असतात . त्यामुळे जास्त शेती असणारे शेतकऱ्यांना किंवा भाड्याने देण्यासाठी ही यंत्रे उपयोगी ठरतात.
उदा., पीक कापणी यंत्र , मळणी यंत्र , कम्बाईन हार्वेस्टर , भात लावणी यंत्र , इत्यादी.
शेतकऱ्यांच्या श्रमाची प्रतिष्ठा वाढवून त्याची वित्तीय आवक वाढविण्यासाठी आवश्यक त्याच यंत्राचा आणि सुधारित साधनांचा वापर करावा . अशा प्रकारे वरील विविध आधुनिक कृषी अवजारांचा आपल्या शेतीमध्ये योग्यरित्या वापर करून शेतकरी बांधव कीफायतशिर शेती करू शकतात . जेणेकरून शेती उत्पन्न आणि उत्पादकता वाढेल. एकूणच ग्रामीण भागाचा विकास आणि समृद्धीमध्ये वाढ होईल .
या लेखामध्ये आपण जमीन मशागतीची अवजारांची माहिती घेऊन.
मशागतीची अवजारे :-
उन्हाळा सुरू झाला की शेतकरी जमीन मशात करण्यास सुरुवात करतात पीक उत्पादनासाठी बियाणे लागवडीपूर्वी जमीन पेरणी योग्य बनविण्यासाठी तिची मशागत करणे आवश्यक असते नांगरणीची गरज काय याचे उत्तर जागोजागी बदलते सर्वसाधारणपणे पूर्वीची पीक काढल्यानंतर क** झालेली जमीन फोडून माती भुसभुशीत करण्याचे काम नांगर करतो.
नांगरणीची तयारी :-
नांगरणी करण्यापूर्वी पुढील गोष्टी ध्यानात ठेवा.
- १) ट्रॅक्टरच्या ओढ शक्ती प्रमाणे जुळणाऱ्या नांगर निवडावा.
- २) ट्रॅक्टरच्या शाखा मधील अंतर योग्य असावे.
- ३)सर्व समायोजना व्यवस्थित करावा .
- ४)योग्य नांगरणीची पद्धत वापरावी.
- ५)मातीच्या प्रकाराप्रमाणे नांगरणीची खोली ठेवावी.
त्यासाठी फळाच्या नांगराचा वापर करावा . जमीन चिकट , कडक , खडकाळ किंवा धसकटे , झाडांच्या मुळांनी व्यापलेली असेल तर तव्याच्या नांगराचा वापर करणे फायद्याचे ठरते . अर्धशुष्क क्षेत्रात जिथे तापमान जास्त असून दुष्काळाची सावट असते तिथे माती पलटून टाकण्यापेक्षा जमीन फोडणे महत्त्वाचे ठरते . त्यामुळे पावसाचे पाणी मूरते आणि वाऱ्याने जमिनीची होणारी धुपही कमी होते . अशा ठिकाणी पटाशीच्या नांगराचा वापर करावा. नवीन शेती तयार करणे व ज्या प्रदेशात जमीन खारवट आणि चोपट झाली असेल त्या ठिकाणी क्षार वाहून नेण्यासाठी जमीन खोलवर फोडणे गरजेचे असते . म्हणून सब – स्वायलरचा वापर करावा . ज्या पिकासाठी जमिनीचा पोत सर्वोत्तम असणे गरजेचे आहे त्यासाठी नियमित वहीवाटीखालच्या जमिनीत रोटावेटरचा वापर केल्यास नांगर आणि कुळव या दोघांचे काम एकदम होऊन जाते..
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌