कडुनिंबापासून कीटकनाशक बनवण्याची पद्धतMethod of making insecticide from neem best

Method of making insecticide from neem

नमस्कार मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत कडूनिंबापासून कशाप्रकारे कीटकनाशक बनवले जाऊ शकते. कडूनिंब एकाप्रतिम झाड आहे ज्याला डॉक्टरची उपमा दिली जाते. औषध गुणधर्म त्याच्या पानांपासून ते वाळलेले सालापर्यंत लपलेले असतात. निंबोळी आणि पाण्याचा देखील औषधी वापर करता येतो. कडुनिंबापासून शेतकरी बांधव अगदी कमी किमतीत सहज कडूनिंबाची कीटकनाशक बनवू शकतात. या घरगुती कीटकनाशकाचे वापराने शेती रासायनिक कीटकनाशकांच्या गंभीर परिणाम पासून मुक्त होईल.

कडूनिंबापासून कीटकनाशक बनवण्याची पद्धत:-

सर्वप्रथम दहा लिटर पाणी घ्यावे. यामध्ये कडुलिंबाची पाच किलो हिरवे किंवा कोरडे पाने आणि वाटून बारीक केलेली निंबोळी दहा लिटर ताक आणि दोन लिटर गोमूत्र एक किलो वाटलेले लसूण मिसळा. त्यांना काडीने चांगले ढवळा यानंतर ते एका मोठ्या भांड्यात पाच दिवस ठेवा आणि हे देखील लक्षात ठेवा की पाच दिवस दर रोज दिवसातून दोन ते तीन वेळा लाकडाने द्रावण चांगले मिसळत राहा. जेव्हा त्याचा रंग दुधासारखा होतो तेव्हा या सोल्युशन मध्ये 200 मिलीग्राम साबण आणि 80 मिलीग्राम हीपोल घाला. अशाप्रकारे आपले नैसर्गिक कीटकनाशक तयार होते. इतर कीटकनाशकांप्रमाणे फवारणी केल्यास आपल्याला आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळतात आणि पिकांवरील कीटक नष्ट होतात.

Method of making insecticide from neem

रासायनिक कीटकनाशक का वापरू नये:-
शेतकरी अधिक उत्पन्न काढण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांची संकरित बियाणी, रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, तणनाशके अधिक प्रमाणात वापरू लागला आहे त्यामुळे उत्पादन तर पराकोटीचा वाढला, परंतु त्याची भयानक दुष्परिणाम टप्प्याटप्प्याने जाणवू लागले आहेत. विशेषतः मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागले आहेत.

त्याचबरोबर जमिनीची सुपीकता जाऊन जमिनीतील मित्र किडींचा नाश होऊन शत्रू किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. जमिनीतील पाणी संतुलित पद्धतीने राखून ठेवण्याची क्षमताही कमी झाली आहे. केवळ नवीन साधने वापरल्याने अन्नधान्यांचे उत्पादन वाढलेले आहे असे नाही. अन्नधान्य पिकविण्याचे क्षेत्रफळही वाढले आहे. रासायनिक कीटकनाशकांचे वापरामुळे जमीन नापीक/निर्जीव होते. तसेच याचे विषारी गुणधर्म हे पिकात देखील उतरतात व परिणामी ते माणसाच्या आहारात येतात आणि यामुळे गंभीर आजाराही उद्भवतात. त्याला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीकडे वळण्याची काळाची गरज आहे.

Method of making insecticide from neem

Leave a Comment