शिकेकाई एक औषधी वनस्पती : Medicinal Benefits Of Shikakai Best 7

Medicinal Benefits Of Shikakai

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिकाकाई या औषधी वनस्पती बद्दल. शिकेकाई ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्वत्र ओलसर जंगलात (दख्खन, कोकण व आंध्र प्रदेश , आसाम व बिहार) तसेच चीन, मलेशिया व म्यानमार या देशात आढळते. बाजारात शिकेकाई या नावाने तिच्या शेंगा मिळतात. बाभूळ, खैर व हिवर इत्यादींची शिकेकाई समवंशी असल्याने त्यांचे अनेक शारीरिक लक्षणत सारखेपण आढळतो. या वनस्पतींच्या शिया या प्रजातीतील एकूण 700 जातींपैकी भारतात फक्त सुरुवातीचे 25 आढळतात. शिकेकाईचे खोड जाडजुड असून फांद्यांवर लहान पांढरट ठिपके, छिद्रे वल व टोकास वाकडे लहान काटे असतात. पाने एकाआड एक संयुक्त व पिसासारखे असून मध्यशिरेवर बारीक वाकडे काटे व देठाच्या मध्यभागी खालच्या बाजूस ग्रंथी असतात.
दलांच्या 4- 8 जोड्या व दलकांचे 10-20 जोड्या असतात. फुले गोलसर झुपक्यात डस्तबकासारख्या पुष्पबंध येतात. ती लहान व पिवळी असून मार्च ते मे महिन्यांमध्ये येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे लेग्यूमिनोजी कुलात व मिमोजोईड अथवा शिरिष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शुष्क फळ चपटे, जाड 7.5 – 12.5. 2-2.8 से मी, लालसर पिंगट सुरकुतलेले व काहीसे गाठाळ असते. बिया 6 – 10 काळ्या व गुळगुळीत असून फळे तडकून त्या बाहेर पडतात.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

लागवड
शिकेकाई या झाडाची लागवड शेतीला सजीव कुंपण म्हणून केली जाते.

सजीव कुंपणाच्या लागवडीचे दोन प्रकार पडतात.

1) समतल लागवड
2) वरंबा पद्धती

समतल लागवड :-
या पद्धतीमध्ये कमी उताराच्या किंवा सपाट शेतात खड्डे किंवा सऱ्या काढून लागवड करतात.

वरंबा पद्धती :-
या पद्धतीमध्ये सर्वसाधारण उताराच्या शेतात आडव्या पद्धतीने शेताच्या धूऱ्याच्या बाजूने नाली खोदून निघालेल्या मातीचे दोन ते अडीच फूट उंच बांध घालून बांधावर लागवड करावी. नाली मध्ये प्रत्येक दहा मीटरवर 70 सेमी चा भाग खोदकाम न करता तसाच राहू द्यावा. त्यामुळे पावसाचे पाणी नाली मध्ये जमा होईल व तेथेच मूलस्थानी जमिनीत मुरेल. सर्वप्रथम या शेताला कुंपण घालायचे आहे. असा शेतात शेताच्या सीमेची चुना टाकून आखणी करावी. शेताच्या भोवती ओळीत एक मीटर अंतरावर दीड : दीड : दीड फूट अंतरावर खड्डे तयार करावे. खड्डे उन्हाळ्यात चांगले तापू द्यावेत. एक घमेले कुजलेले शेणखत, पालापाचोळा, शेतातील वरची माती याद्वारा खड्डे भरून घ्यावेत. दोन पाऊस पडल्यानंतर खट्ट्यांमध्ये रोपे लावावे किंवा बिया टोकाव्यात. कलमे लावावीत. रोपांची लागवड झाल्यावर किंवा बिया कलमे लागवड केल्यावर पुरेसे पाणी द्यावे. खड्ड्यात रोपे कीव बिया लावताना खट्ट्याच्या विरुद्ध व्यासावर दोन कोपऱ्यात  दोन झाडे लावावीत.

Medicinal Benefits Of Shikakai

उपयोग
चेहऱ्यावरील डाग कमी होण्यासाठी :-
चेहऱ्यावर मुरुमांचे डाग राहतात. भरपूर उपाय केल्यानंतरही बऱ्याचदा मुरुमांचे डाग कमी होत नाहीत. पण यासाठी तुम्ही एकदा शिकेकाईचा वापर करून पहावा. दोन चमचे शिकेकाई पावडर, एक चमचा दूध, बदाम पावडर, हळद आणि दोन चमचे मध मिक्स करा. आता हे मिश्रण बॉडी स्क्रब प्रमाणे वापरा. यामुळे त्वचा एक्सपोलिएट होते. त्वचेवरील मृत पेशींची समस्या कमी होईल. यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येईल.
शिकाकाई ची पूड पाण्यात उकळून नाना करिता वापरतात. केसातील दारुणा व उवा यांच त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते. त्वचा कोरडी पडत नाही. रेशीम व गरम कपडे आणि डाग पडलेली चांदीची भांडी धुण्यास ती पूड चांगली असते.
खोडाची साल हे मासे पकडण्यासाठी जाळी व दोर रंगवण्यास आणि त्यांचा टिकाउपण वाढविण्यास वापरतात.
हळद व शिकेकाईची पाने यांपासून हिरवा रंग मिळतो.
कोवळ्या पानांची चटणी अथवा पाने काळ्या मिरी बरोबर खाण्यास काविळीवर चांगली. पानांचा रस आंबट व सौम्य रेचक आणि हिवतापावर गुणकारी  असून शेंगांचा काढा पित्तनाशक , कफोतसराक ,  वंतिकारक व रेचक असतो.
शिकेकाईची पूड घालून केलेले मलम त्वचारोगांवर लावतात.

खरूज वरील उपाय :- 

खरूज सारख्या त्वचा रोगांवर शिकेकाई रामबाण उपाय आहे . गरम पानी आणि हळद एकत्र घ्या . आणि पेस्ट तयार करा . यानंतर शिकेकाई ची पाऊडर ही त्यात मिक्स करा .  हळद , शिकेकाई नीट एकजीव करा . आता या मिश्रणाचा अॅंटी सेपटीक बॉडी वॉश च्या स्वरूपात उपयोग करा . यामुळे खरूजची समस्या दूर होण्यास मदत मिळेल .

केसांसाठी फायदे :-

वाढत्या वया नुसार आपल्या केसांमध्येही बदल होऊ लागतात . पण आपण योग्य देखभाल केळी तर कए स काळेशार आणि मजबूत राहू शकतात . केसांसाठी हर्बल प्रॉडक्ट चा वापर करावा . केसांसाठी शिकेकाई हा रामबाण उपाय आहे . शिकेकाई ची पाऊडर पाण्यात भिजत ठेवा आणि या पाण्याने आपले केस धुवून घ्या . शिकेकाई मुळे केसतील कोंडा कमी होण्यास देखील मदत होते .

Medicinal Benefits Of Shikakai

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Leave a Comment