कांदा पिकावरील रोगांचे व्यवस्थापन : Management Of Disease On Onion Crops Best 0

Management Of Disease On Onion Crops

कांदा पिकावरील रोगांचे व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांदा पिकावरील रोगांच्या नियोजन आणि व्यवस्थापनाबद्दल. कांदा पिकावर ढगाळ आणि ओलसर वातावरणात विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो . त्यांचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात मोठी घट येते. सुरुवातीस कांदा पिकाचे रोपवाटिकेत येणाऱ्या मर रोगामुळे खूप नुकसान होते.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

रोपवाटिकेतील मर :-

हा रोग फ्यूझेरियम , रायझोक्टोनिया , पीथियम आणि फायटोप्योरा या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. रोपवाटिकेत जास्त ओलावा असल्यास किंवा पाणी साचून राहिल्यास आणि दमट वातावरणात मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. कांदा बियाणे पेरणीनंतर रोपांची जमिनीवर येण्या अगोदर किंवा उगवण झाल्यावर दहा ते पंधरा दिवसांनी मर होते. रोपांचा जमिनीलगतचा भाग सडून रोपे कोलमडून पडतात.
मर रोगग्रस्त रोपवाटिकेतील रोपांची मुख्य शेतात लागवड केल्यानंतर शेतात देखील मर रोगामुळे कांदा पिकाचे नुकसान होते.

व्यवस्थापन :-

रोपवाटिकेच्या जमिनीस एक महिना अगोदर पाणी देऊन 150 ते 250 गेजच्या पारदर्शक पॉलिथिनने झाकून घ्यावे , यामुळे जमिनीतील रोगकारक बुरशी नष्ट होईल. त्यामुळे रोपवाटिकेतील मर रोगापासून रोपांची संरक्षण होते.
पेरणीपूर्वी कार्बेडाझिम 25% मॅंकोझेब 50 टक्के या मिश्र बुरशीनाशकाची तीन ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 6 gram प्रति किलो बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करावी. रोपवाटिकेच्या वरील थरातील मातीमध्ये पाच ग्राम थायरम प्रति वर्ग मीटर या प्रमाणात मिसळावे. रोपवाटिकेमध्ये पेरणीनंतर 20 आणि 30 दिवसांनी कॅप्टन या बुरशीनाशकाचे दोन ग्रॅम प्रति लिटर द्रावणाचे ड्रेचींग करावे.

कांदा लावणीनंतर कांदा पिकावर जांभळा , काळा आणि तपकिरी करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. याबद्दल माहिती घेऊया..

1) जांभळा करपा :-

हा बुरशीजन्य रोग असून रोगाच्या प्रादुर्भावामुळे पातीवर पांढुरके खोलगट चट्टे पडतात. कालांतराने ठिपक्याच्या मधला भाग काळपट जांभळा होऊन पात शेंड्याकडून वाळू लागते. पानावर गडद तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे निमुळते लांबट , डोळ्याच्या आकाराचे ठिपके दिसतात. हे ठिपके शेंड्याकडून बुंध्यापर्यंत वाढत जातात. या रोगाचे ठिपके प्रामुख्याने बीजोत्पादनाच्या कांद्याच्या फुल दांड्यावर मोठ्या प्रमाणात दिसतात. ठिपके एकमेकांत मिसळून फुलदंडा कोलमडतो. वातावरणात 90% आद्रता आणि 21 ते 30 सेल्सियस तापमान असल्यास करपा रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. या रोगाची तीव्रता खरीप हंगामात अधिक असते.

2) काळा करपा :-

हा या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याच्या पातीवर राखाडी रंगाचे ओलसर टिपके दिसतात. हे ठीपके नंतर पूर्ण पानांवर पसरून त्यांच्या मध्यभागी काळे , दाणेदार , ठिपके चक्राकार आकारात दिसून येतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पात आखडते , रोपांची मान लांबट होऊन पात वेडी वाकडी होते आणि कालांतराने वाळते. ढगाळ आणि दमट वातावरणात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. फुल किड्यांनी खरचटलेल्या जखमेवर बुरशीची वाढ होऊन करपा रोगाचा पप्रादुर्भाव होतो. फुलकिडे आणि करपा यांच्या करिता एकाच वेळी उपाययोजना केल्यास या रोगाचे चांगले व्यवस्थापन होते.

3) तपकिरी करपा :-

हा रोग स्टेमफायलियम व्हेसीकॅरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. पातीच्या मध्यभागी आतील बाजूस पिवळसर तपकिरी रंगाचे लांबट ठिपके दिसतात. पानांच्या बाहेरचा भाग हिरवा राहतो.
कालांतराने हे ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात. पूर्ण पान भाजल्यासारखे दिसते. ठिपक्यांच्या सभोवती गुलाबी रंगाचे क्लब दिसते. पात सूकते.
फुल दांड्यावर रोगाचा प्रादुर्भाव असल्यास फुलाचे धांडे मऊ होतात व कोलमडून खाली पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव बीज उत्पादन क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात होतो. अधिक आर्द्रता आणि कमी तापमान या रोगाच्या प्रखारास मदत करते.

कांदा पिकावरील रोगांचे व्यवस्थापन

4) तळकुजव्या :-

हा रोग फ्युजारियम ऑक्सीस्पोरम या बुरशीमुळे होतो. जमिनीतील अधिक ओलावा , कांदे काढणेवेळी अधीक पाऊस ई. कारणांमुळे या रोगाची लागण होते. या रोगामुळे सुरुवातीस पात पिवळी पडते. रोपांची वाढ थांबते व पात हळूहळू टोकाकडून खाली सुकते. कांद्याची पात पूर्णपणे वाळते. कांदा मऊ पडतो व सडण्याची क्रिया सुरू होते. झाडाची मुळे कुजतात. कांद्याच्या तळाकडील भागावर पांढऱ्या बुरशीची वाढ होते . या रोगाचा प्रादुर्भाव शेतात सुरू होऊन साठवणीत त्याचा प्रसार होतो. बीज उत्पादन क्षेत्रात हा रोग आल्यास पात पिवळी पडून फुलांचे दांडे पिवळे पडून सुकतात.

5) काजळी :-

हा रोग कोलीटोट्रायकम सरसिनान्स बुरशीमुळे होतो. कांदे काढण्याच्या वेळी पाऊस झाल्यास या रोगाची सुरुवात होते. आणि साठवणी त त्याचा प्रसार होतो . कांद्याच्या वरील आवरणावर लहान लहान गर्द हिरवे किंवा काळे डाग दिसतात. हा रोग पांढऱ्या रंगाच्या कांद्यावर दिसून येतो.

6) विष्णूजन्य रोग :

कांदा बीज उत्पादन क्षेत्रात फुलकिडीच्या प्रादुर्भाव मुळे हा रोप पसरतो. फुल दांड्यावर हिऱ्याच्या आकाराची पिवळसर पांढरे डाग दिसतात. नंतर हे डाग वाढत जाऊन फुलदांडे खाली पडतात . त्यामुळे बीजधारणा चांगल्या प्रकारे होत नाही. कीड आणि रोगांचे अस्तित्व निसर्गात असतेच. मात्र पोषक वातावरण मिळाल्यास प्रादुर्भावाची तीव्रता वाढते . कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी राहावा आणि पीक संरक्षणा वरचा तसेच एकूणच पीक उत्पादनावरचा खर्च कमीत कमी होण्यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी पिकाची फेरपालट करावी. तसेच बटाटा पिकानंतर कांदा पीक घेऊ नये. रोपवाटीकेची जागा दरवर्षी बदलावी. दोन किलो ट्रायकोडर्मा व्हेरीडी हे जैविक बुरशीनाशकाचे एक क्विंटल शेणखतात गुणन करून कांदा लावणी पूर्वी एक हेक्टर शेतात मिसळावे.

कांदा रोप लागवडीपूर्वी कांदा रोप दोन मिली कार्बासल्फान – एक ग्रॅम कार्बेटाझीम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात दोन तास बुडवून नंतर लागवड करावी. जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्याकरिता खरीप हंगामात कांदा लागवड गादीवाफ्यावर करावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास येताच किंवा कांदा लागवडीनंतर 30 दिवसांनी एकमेकांना पूरक अशा कीड व रोगनाशकांची एकत्रित रित्या दहा ते बारा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. एकाच एक बुरशीनाशक सतत वापरू नये.

  • कांद्यावरील करपा रोगाच्या व्यवस्थापना करिता डायफेनकोनेजोल 25 E C 10 मिली (एकरी 200 मिली) किंवा
  • टेबुकोनेझोल 25.9 E C 12.5 ते 15 मिली (एकरी अडीचशे ते तीनशे मिली) किंवा टेबुकोनेझोल 25% दाणेदार पंधरा ग्रॅम किंवा अझोवन्सीस्त्रॉबीन 18.2 टक्के – डायफेनकोनेझोल 11.4 टक्के प्रवाही दहा मिली किंवा आझोकसीस्त्रॉबीन ११ टक्के टेबुकोनेझोल 18.3 टक्के प्रवाही दहा मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • बीजोत्पादनाकरिता कांदा लागवड केली असल्यास पीक फुलावर आल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी.
  • कांदा पोहचण्याच्या सुमारास (लागवडीनंतर 45 ते 75 दिवस) फवारणी करणे गरजेचे आहे.
  • कांद्याची पात उबट सुईसारखी असल्याने कीडनाशकांची फवारणी करताना त्यामध्ये चिकट द्रव उदाहरणार्थ इंडट्रॉन , सेंडोविट इत्यादी 10 मिली प्रतिदहा लिटर द्रावणात मिसळावे.
  • कीडनाशकांची फवारणी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करावी.
  • एकाच गटातील कीडनाशकांची फवारणी लागोपाठ करून आहे.
  • कांदे काढणीचे वीस आणि दहा दिवस अगोदर कार्बनडाझिम दहा ग्रॅम किंवा कॅप्टन 20 ग्रॅम प्रति दहा लिटर मिसळून फवारणी करावी . कांदे काढल्यानंतर चांगल्या प्रकारे सुकवून साठवन करावी .

Management Of Disease On Onion Crops

Management Of Disease On Onion Crops

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Leave a Comment