Karalyache Aushadhi Gunadharm
कारल्याचे प्रक्रिया युक्त पदार्थ आणि त्याचे औषधी गुणधर्म
नमस्कार मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत कारल्यापासून कशाप्रकारे प्रक्रिया युक्त पदार्थ बनवू शकतो आणि त्याचे औषधी गुणधर्म काय असू शकतात. मानवी आहारामध्ये कारल्याच्या भाजीला फार महत्वाचे स्थान आहे . कारण कारल्यामध्ये चुना , पोटॅशियम , फॉस्फरस ही खनिजे व अ आणि क ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. कारल्याच्या भाजी करण्यासाठी व तळून खाण्यासाठी तसेच लोणची करण्यासाठी कारल्याचा वापर खूप प्रमाणात करतात. कारल्याचा कडूपणा हा त्यातील मोमारडीन या द्रव्यामुळे असतो . कडूपणामुळे आपल्या शरीरातील कृमी कमी करता येतात . कारल्याची फळे व पाने औषधी साठी वापरले जातात. कारल्याच्या भाजीचा उपयोग मधुमेहाचा विकार असणाऱ्या व्यक्तींनी नेहमी सेवन केल्यास साखरेचे प्रमाण कमी होऊन मधुमेह आटोक्यात येतो व तसेच वजन कमी होते .
कारल्याच्या रस हा खोकला , पित्त , सांधेदुखी , त्वचारोग , कुष्ठरोग , बद्धकोष्ठता , मधुमेह इत्यादी विकारांवर ते उपयोगी पडते. कारले हिरवट पांढरसर , काळसर हिरव्या रंगाची आणि पिकल्यानंतर आतून लाल केसरी होतात . कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात. तर रंगभेदामुळे कारल्याची पांढरी , हिरवी असेही दोन प्रकार आढळतात.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
आयुर्वेदानुसार कारली पित्तशामक , वातानुलोमक , कृ मित्र व मूत्रल आहेत. कारल्याची पानेही ज्वरनाशक, कृमीनाशक व मूत्रल आहेत. कारल्यामध्ये कॅल्शियम , लोह , फॉस्फरस , अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात तर ब जीवनसत्व थोड्या प्रमाणात असते. या सर्व औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तीवर्धक , पुष्टीकारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.
कारल्याची विविध पदार्थ :-
योग्य रंग आल्यानंतर ही फळे वाळवून विगर हंगामामध्ये वापरले जातात . त्याचप्रमाणे कारल्याचे स्टयू किंवा लोणचेही करतात . कारल्याच्या कडूपणा कमी करण्यासाठी ती मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवतात. शिजण्यापूर्वी साल खरवडून घेतली जाते. कारल्यातील पाणी काढून टाकल्यानंतर चौकोनी तुकडे किंवा गोलाकार रिंग स्वरूपामध्ये साठवले जातात . त्याचा वापर भाज्यांमध्ये तर तपकिरी रंगाच्या कारल्याचा उपयोग चहा तयार करण्यासाठी होतो . वाढवलेल्या रिंग तुकड्यांना देशी आणि निर्यातीच्या बाजारात चांगली मागणी आहे . वाढवल्यानंतर कारली अधिक काळ टिकू शकतात . त्याचा फायदा साठवण , वाहतूक आणि पॅकेजिंग मध्ये होतो.
कारले वाळवणे :-
सूर्यप्रकाशामध्ये कारल्याचे तुकडे वाळवून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करता येते . त्यासाठी स्वच्छ करून कारल्याची काप करून ते उन्हात वाळवावेत . त्यातील पोषक घटक त्यात राहत असल्याने चांगली किंमत मिळते.
कारल्याचा चहा :-
कारल्याच्या चहाला गोयाह चहा या नावाने ओळखले जाते . आरोग्यावर्धक चहा म्हणून याला मागणी आहे . यकृत , पचन यांच्या समस्या , एन्फ्यूंझा रोखण्यासाठी , घशाचा दाह यामध्ये उपयुक्त असून रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करतो.
Karalyache Aushadhi Gunadharm
चहा तयार करण्याची पद्धत :-
सर्वप्रथम वाहत्या पाण्यामध्ये कारली स्वच्छ धुऊन घ्यावी . त्यानंतर मऊ स्पंजच्या सहाय्याने वरील पृष्ठभाग घासून साफ करावा. लांबीच्या बाजूने कारल्याचे दोन भाग करून त्यातील गर र बिया चमच्याने काढून टाकावे. त्यानंतर कारल्याचे पातळ काप करून घ्यावे . हे काप जितके पातळ असतील तितक्या लवकर ते वाळतात आणि आपल्याला बारीक करण्यास सोपे जाते. ट्रेमध्ये हे काप एका थरामध्ये ठेवून त्यावर जाळी लावावी म्हणजे कीटक आणि धुळीपासून संरक्षण करता येते . हे ट्रे सूर्यप्रकाशामध्ये वाळवण्यासाठी ठेवावे. काही तासानंतर उलट्या बाजूने वाळवून घ्यावेत यासाठी वातावरणानुसार एक किंवा दोन दिवस लागू शकतात.
कॉफी ग्राइंडर किंवा फूड प्रोसेसरच्या साह्याने वाळवल्या कापांची भूकटी करून घ्यावी . ही बुकटी हवाबंद डब्यामध्ये भरून थंड आणि कोरड्या जागेमध्ये साठवून ठेवावी. एक चमचा कारल्याची भुकटी एक कप गरम पाण्यामध्ये टाकावी . काही मिनिटे ढवळल्यानंतर त्यात आपल्याला आवश्यक गोडी येईपर्यंत एक किंवा दोन चमचे मध टाकावा.
पाण्यामध्ये अधिक विद्राव्य कारले पावडर बनवण्याची पद्धत :-
कारल्यातील प्रोटीन्स पॉलीसेक्राइड आणि फिनोलिक , फ्लावोनॉइड, सॅपोनीन सारखे घटक मिळवण्यासाठी कारले फ्रिज ड्राइंग किंवा हिट पंप ड्रॉईंग पद्धतीने वाळून बारीक करावे . या पद्धतीमध्ये अत्यंत बारीक भुकटी मिळवता येते.
कारल्याचे औषधी उपयोग :-
१) कारले रक्त आणि लघवी मधील साखर कमी करते वजन वाढलेल्या आणि मधुमेह आहे अशा लोकांनी आहारात कारले नियमीत ठेवावे . कारल्याचा थेट रस कपभर किंवा ग्लासभर घेऊ नये . घेतल्यास तर जास्तीत जास्त चार ते सहा चमचे एवढाच घ्यावा . तोही कपभर पाण्यात मिसळून घ्यावा.
२) चरबी वाढल्यामुळे होणारे आजार आणि विषबाधा यावर नियमित कारले सेवन केले तर आपल्याला त्यावर नियंत्रण मिळवता येते .
३) अंगाला पिसू सारखे कीटक चावल्याने अंगाची आग होत असेल तर कारल्याच्या पानांचा रस अंगावर चोळावा .
४) कार्य उत्तम रक्त शुद्धी करते त्यामुळे त्वचारोग असणाऱ्या लोकांसाठी ती एक नवसंजीवनी ठरू शकते.
५) पाळीच्या विकारात कारले उत्तम असून वेळेवर पाळी येत नसेल किंवा पाळी अजनक बंद झाले असेल तर कारल्याची नियमित सेवन करावे.
६) दमा , सर्दी , खोकला अशा श्वसन मार्गाच्या तक्रारी असतील तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढून हे विकार दूर होतात.
७) जंत – कृमी झाले असतील तर कार्ल्याच्या पानांचा रस कप भर नियमितपणे आठ दिवस घ्यावा . यामुळे सर्व कृमी शौचा वाटे पडून जातात.
८) कारल्यांच्या पानांचा तीन चमचे रस एक ग्लास भर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो . यासोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुऊन वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मुळव्याधीचे कोंब नाहीशी होतात.
९) खरूज , खाज , नायटे , चट्टे अशा त्वचा विकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर लिंबू रस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा . नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्त शुद्ध होते व पर्यायाने त्वचा विकार कमी होतात.
१०) मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्याची बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ – संध्याकाळ पाच – पाच ग्रॅम नियमितपणे प्यावे . यामुळे साखर नियंत्रणात राहते.
११) दारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्यांच्या पानांच्या रस रोज सकाळ संध्याकाळ कपभर घ्यावा.
१२) कावीळ या विकारांमध्ये ताज्या कारल्यांचा रस सकाळ संध्याकाळ प्यावा यामुळे कावीळ दूर होते .
१३) यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस अत्यंत उपयुक्त असतो.
१४) कारल्याच्या पानांचा कल्क, हळद , तीळ , तेलात उकळून हे तेल त्वचेला लावल्यास जुने त्वचा विकार तसेच सोरायसिस हा विकार दूर होतो.
१५) स्त्रियांमध्ये बीजांडकोशाला सूज आल्यास कारले बी , मेथी , गुळवेल , जांभूळ यांचे चूर्ण करून प्रत्येकी पाच ग्रॅम सकाळ संध्याकाळ घ्यावे.
१६) लघवीच त्रास होत असेल तर कारल्याच्या पानांचा एक कपभर रस चिमूटभर हिंग घालून घ्यावा.
१७) जुनाट ताप झालेला असेल तर अशावेळी कारल्याची पाने वाटून त्याचा रस काढावा व हा रस सकाळी व संध्याकाळी पिण्यास द्यावा.
१८) रात आंधळेपणाचा त्रास होत असेल तसेच डोळ्यांना क्षणिता आली असेल तर रोज कोवळ्या कारल्यांचा रस किंवा चूर्ण सकाळी संध्याकाळी एक एक चमचा प्यावे.
१९) दमा असलेल्यांनी मसाला न टाकलेली कारल्याची भाजी खाल्ल्यास फायदेशीर आहे . पोटात गॅस व अपचन झाल्यास कारल्याचा रस घ्यावा पक्षघात झालेल्या रुग्णांना कच्चे कारले फायद्याचे ठरते.
२०) उलट्या किंवा जुलाब होत असल्यास कारल्याच्या रसात थोडे पाणी मिसळून त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे
लगेचच फरक पडतो . यकृताच्या रोगांसाठी कारले रामबाण औषध आहे . जलोदर किंवा यकृत वाढल्यास अर्धा कप पाण्यात दोन मोठे चमचे कारल्याचा रस मिसळावा व रोज बरे होईपर्यंत तीन-चार वेळा सेवन करावे.
२१) कारल्याचा रस हा अतिशय कडू असल्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात पिणे आपल्याला शक्य होत नाही . अशावेळी खडीसाखर व मध घालून द्यावा . परंतु मधुमेह रुग्णांनी खडीसाखर व मधाचा वापर करू नये . कडू कारल्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते . त्यामुळे कारले आवडत जरी नसले तरी काही प्रमाणात त्याचा आहारात समावेश करावा.
Karalyache Aushadhi Gunadharm