कपाशी बियाण्याची निवड : Kapashi Biyane Nivad Best 9 Points

Kapashi Biyane Nivad

कपाशी बियाण्याची निवड

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कपाशी बियाण्याचे काळजीपूर्वक निवड कशी करावी.

कपाशी पिकाचा उल्लेख नेहमी पांढरे सोने असा केला जातो . क्रेश क्रॉप अर्थात नगदी पीक असा केला जातो . परंतु आज वरती वस्तू स्थिती अशी राहिली आहे की सर्वात जास्त आत्महत्या कपाशी उत्पादक विदर्भात झालेले आहेत . याची महत्वाचे कारण कपाशीला मिळणारा बाजार भाव आणि तिचा उत्पादन खर्च यांची तोंड मिळवनी अत्यंत अवघड असे. शिवाय कपाशी ला दुसरा कुठला समर्थ पर्याय दिसत नाही . त्यामुळे देशातल्या प्रामुख्याने विदर्भ , मराठवाडा , खानदेशच्या शेतकऱ्यांचे खरीपातील मुख्य पीक कपाशी होते . पुढेही कपाशीच राहणार .

बीटी बियाणे गेल्या काही वर्षात आल्याने फवारण्यांचे ड्रम आणि त्याचा खर्च कमी झाला हे खरे आहे . शिवाय कपाशीचा उताराही वाढला . संकरित बियाण्यांचे तुलनेत बीटी कपाशीचे उतारे निश्चितच वाढले यात वाद नाही. अर्थात त्याच वेळी वेचणीस मजूर मिळत नाहीत . वेचणी जी पूर्वी सरासरी दोन रुपये प्रति किलो या मजुरी दराने केली जायची , ती वेचानीच्या मजुरीचा दरही परिस्थितीनुसार तिप्पट च्या पुढे झाला आहे हेही खरे.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

खरीप २०२४ या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड करतील अशी अपेक्षा आहे . कारण अमेरिकेसह अन्य देशातील कपाशीचे उत्तरे घसरलेले आहेत. क्षेत्रफळ घटलेले आहे . अमेरिकेत तर कपाशीचे क्षेत्र घटून तिकडे बायोडिझेल साठी योग्य असणाऱ्या पिकांवर (जसे की मका) अधिक भर आहे. कारण इंधन ही त्यांची सर्वात महत्त्वाची गरज आहे . चीन , पाकिस्तान , ऑस्ट्रेलिया , ब्राझील या ही देशातून कपाशीची लागवड असते . परंतु क्षेत्रफळाच्या दृष्टीने कपाशी खालील सर्वाधिक क्षेत्र भारत देशात आहे . त्यातही ते महाराष्ट्रात आहे . देशातील एकूण कपाशी क्षेत्राचे सुमारे 30% म्हणून अधिक क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे .

उर्वरित क्षेत्र आंध्र प्रदेश , मध्य प्रदेश , कर्नाटकचे काही जिल्हे राजस्थान , पंजाबचे काही जिल्ह्यातून आहे . पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे सुयोग्य अशा कपाशी बियाणेची निवड करणे . ती निवड शेतकऱ्यांनी डोळसपणे , अभ्यास पूर्णपणे केली पाहिजे . कारण हे क्षेत्रात कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या , बडे विक्रेते हे परस्परांचे उखळ पांढरे करून घेण्यासाठी नाना कृत्या लढवीत असतात. कृत्रिम शॉर्टेज तयार करणे , सांगोवांगीच्या प्रचार तंत्रातून विशिष्ट वाणचीच हवा निर्माण करणे , जाहिरातीचा भडिमार करणे इत्यादी एकच राळ कपाशी हंगामात बाजारपेठेत उठत असते. आणि गरीब बिचारा शेतकरी त्याला बळी पडतो . प्रत्यक्षात वस्तू स्थिती अशी आहे की आज जीईसी ( म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग मॉडिफाइड अप्रुव्हल कमिटी ) या संस्थेने शेकडो बीटी प्रजातींना मंजुरी दिलेली आहे . ती विभागवार जनरल वाईस दिलेली आहे.

म्हणून त्याच त्या वाणा पाठीमागे लागण्याचे खरोखरच काही कारण नाही . एकाच वानांचे सर्व पॅकेट्स लावण्यापेक्षा विविध वानांची निवड डोळसपणे करावी. बीटी तंत्रज्ञानातही आज शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध आहेत. निवडीस त्यांना वाव आहे . एकाच एका कंपनीचे बीटी तंत्रज्ञानामागे धावण्यापेक्षा पर्यायी असलेल्या फ्युजनबीटी व अन्य तंत्रज्ञानाच्या वाण्यांचाही वापर शेतकऱ्यांनी करावा . म्हणजे नवे तंत्रज्ञान ही त्या जुन्या शेतकऱ्यांना येईल.

कपाशी लागवडी बाबत कास्तकारी बाबत अनेक कंपन्यांनी छापील साहित्य काढलेले आहे . अशा सर्व ज्ञानसाधनांचा शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे . अंधानूकरण टाळले पाहिजे . आपला गाव परिसर येथे गेल्या हंगामात कोणकोणत्या वानांनी निर्विवादपणे चांगले कामगिरी केली याची पाहणी करून चार सुजाण लोकांची सल्ला मसलत करून बियाण्याची निवड करावी . एकच कंपनी किंवा एकच वाण यावर अवलंबून राहू नये . बाजार भावाची परिस्थिती खूप अनुकूल आहे . आता बियाणे निवडीत शेतकऱ्यांनी सुज्ञपणा दाखवला पाहिजे.

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी :-

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे .

१) परवानाधारक बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे.

२) सीलबंद वेस्टनातील , खूणचिठी (लेबल) असलेले बियाणे खरेदी करावे.

३) खरेदीर केलेल्या बियाण्याबाबत संपूर्ण तपशील असलेली ( उदाहरणार्थ पीक , वाण , लेबल नंबर , प्लॉट नंबर , वजन , तपासणीचा दिनांक , वैध मुदत , बियाणे किंमत , खरेदीदाराचे , उत्पादकाचे , विक्रेत्याचे नाव तसेच विक्रेत्याची सही इत्यादी ) रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी.

४) खरेदीची पावती , वेस्टन व त्यावरील लेबल व पिशवीतील थोडेसे बियाणे हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे.

५) बियाण्याच्या वैध मुदतीची खात्री करून वैध मुदतीच्या आतील बियाणे खरेदी करावे.

६) छापील किमतीपेक्षा जादा दराने बियाणे खरेदी करू नये अशी बाब निदर्शनास आल्यास वैधमापन शास्त्र विभागाचे निदर्शनास आणून द्यावे.

७) बियाणे दर्जा / उगवण क्षमता / भौतिक शुद्धतेबाबत शंका असल्यास कृषी खात्याचे नजिकच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी.

८) जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद व तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे.

९) सदोष बियाण्यामुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्याकरिता जिल्हा ग्राहक मंचाकडे नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज सादर करावा.

खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी :-

१) रासायनिक खते खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे.

२) विक्रेत्याकडून खरेदी केलेल्या रासायनिक खताची रोखीची अथवा उधारीची पावती मागून घ्यावी.

३) खरेदी पावतीवर खताचे नाव , ग्रेड , किंमत , उत्पादकाचे नाव याचा उल्लेख असणे अत्यंत आवश्यक आहे . याची खात्री करूनच बिलावर सही करावी.

४) खत खरेदी करित असताना खताचे पोत्याच्या वजनाची खात्री करून घ्या.

५) संशयास्पद , बनवत खत विक्री तसेच खताच्या कोणत्याही तक्रारी करता , त्वरित नजीकच्या कृषी कार्यालयाची संपर्क साधावा.

६) राज्य / जिल्हा तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा .

७) कमाल किरकोळ विक्री किमतीच्या अत्यंत कमी अथवा जादा दराने विक्री होत असल्यास नजीकच्या कृषी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा .

कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी :-

१) परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.

२) कीटकनाशके सीलबंद पॅकिंग मध्येच असल्याची खात्री करून घ्या .

३) कीटकनाशके खरेदीची रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी .

४) खरेदी बिलावर कीटकनाशकाचे नाव , उत्पादकाचे नाव , ब्याच क्रमांक , वापराचा अंतिम दिनांक असल्याची खात्री करूनच बिलावर स्वाक्षरी करावी .

५) विक्री किमतीचे अत्यंत कमी अथवा ज्यादा दराने विक्री होत असल्यास तसेच संशयास्पद किंवा बनावट कीटकनाशकांची विक्री निदर्शनास येतात त्वरित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा .

६) कीटकनाशके अधिनियम 1968 च्या परिशिष्टामध्ये समाविष्ट नसलेल्या बिगर नोंदणीकृत पीक वाढ संजीवकांबाबत शेतकऱ्यांनी ती ( झईम्स , एंजाइम्स , बायोझाईम्स ऑक्सिन्स , बायोस्टीम्युलेट , हार्मोन्स , प्लांट एक्सट्रॅक्ट्स , सिविड एक्सट्रॅक्ट , प्रोटीन स्टिकर्स , हरबल प्रोडक्ट , प्रोटीन हायड्रोलिक क्रॉप इंहन्सर क्विक स्प्रेडिंग सबस्टन्सेस इत्यादी ) खरेदी करताना त्यांच्या गुणवत्तेबाबत जागरूकता बाळगावी .

Kapashi Biyane Nivad

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

कपाशी बियाण्याची निवड

Leave a Comment