Janukiye Sampadit Van
जनुकीय संपादित वाण : सुरक्षितता आणि शाश्वत ही
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जनुकी संपलीत वाण आणि त्याबद्दलची सुरक्षित शाश्वती . जनुकीय संपादन म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे पूर्वार्धात आपण पहिले . या भागात शेती क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरणारे आहे हे तर पाहूयाच , परंतु त्याच बरोबर जीएमओ पेक्षा हे तंत्र कसे भिन्न आहे तेही बघूया .जनुकीय संपादन या अध्ययवत तंत्रज्ञानामुळे सजीवातील अनेक असाध्य रोगावर मात केली जाऊ शकते याच संशोधकांच्या मनात काही शंका नाही त्यामुळेच जनुकीय संपादन प्रक्रियेवर जगभरात विविध क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहेत त्याचप्रमाणे हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
आरोग्यदायी आणि टिकाऊ वान होतील विकसित :-
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिनेछोटामध्ये हाय ओलिक ऍसिड सोयाबीनची वाण विकसित करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात येत आहे . ओलीक ऍसिड हे खाद्यतेलात आढळणारा एक महत्त्वाचा घटक असतो . जो हृदयासाठी उपयुक्त मानला जातो . साधारणपणे सोयाबीनमध्ये याचे प्रमाण 30 ते 35% असते परंतु जीनोम एडिटिंगच्या आधारे याचे प्रमाण 82 ते 85% पर्यंत वाढविण्यात कृषी संशोधकांना यश आले . या संशोधनामुळे सोयाबीन तेलामध्ये ट्रान्स्फेट नसतील आणि हे खाद्यतेल हृदयासाठी अतिशय फायदेशीर असेल . अशाच प्रकारे जनुकीय संपादन प्रक्रियेचा वापर करून मशरूम मध्ये सुद्धा अवश्य असा बदल घडवून आणला गेला आहे. मशरूम हे स्वास्थ्यवर्धक आणि औषधे खाद्यपदार्थ आहे आणि याचा मोठ्या प्रमाणात विशेषता शाकाहारी जेवणात उपयोग केला जातो .
परंतु मशरूम मध्ये एक पॉलीफिनल ऑक्सिडेज नावाचे रसायन असते . त्यामुळे मशरूम कापल्यानंतर ते काळे पडतात . आणि त्याची चव सुद्धा बदलते परंतु नुकतेच हे रसायन उत्पन्न करणारे सहा जणूके शोधून जिनवा एडिटिंग द्वारे ते विकसित केले गेले आहे . त्याचा वापर करून मशरूमची एक नवीन वाण स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका येथे तयार करण्यात आली आहे . मशरूमचे हे विकसित वाण कापणी केल्यानंतर ही आपला पांढरा शुभ्र रंग टिकवून ठेवते . लवकरच या जातीच्या मशरूमची शेती उद्योग करणाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येईल व ग्राहकांना याचा आस्वाद घेता येईल .
अशा प्रकारे जवळपास सर्व पिकांमध्ये या प्रकारचे विविध प्रयोग सुरू केले गेले आहेत . त्यामुळे त्या पिकाचे उत्पन्नच नव्हे तर रोगप्रतिकारशक्ती , दुष्काळ प्रतिरोधक , पो , टिकाऊ पण , रंग , आकार इत्यादी गुणधर्म बदलविले जाणार आहेत.
जनुकीय संपादित वाण : सुरक्षितता आणि शाश्वतही
Janukiye Sampadit Van
जी एम ओ पेक्षा हे तंत्र आहे भिन्न :-
या लेखाद्वारे आपण अशी माहिती देत आहोत की हे तंत्रज्ञान अतिशय सुरक्षित , शाश्वत आणि कार्यक्षम आहे . हे सांगण्यामागचे कारण असे की प्रयोगशाळेत जीएमओ तंत्रज्ञान वापरून तयार केलेली पिकाची वाढ म्हणजेच जनुकीय बदल केलेले जीव याबद्दल कृषी संशोधक , सरकार , शेतकरी आणि जनतेमध्ये अनेक प्रकारचे मतभेद आहेत . तसेच जीएमओ वाणांना नैतिक दृष्टिकोनातून विरोध होतो . कारण या तंत्रज्ञानात एका सजीवांमधील जनुकीकडून तो दुसऱ्या सजीवात टाकला जातो आणि त्यामुळे जीएम च्या समर्थनार्थ अथवा विरोधी असे मतभेद दिसून येतात .
परंतु हे मतभेद जीनोम एडिटिंगच्या बाबतीत उद्भवणार नाहीत . कारण या तंत्रज्ञानामध्ये जरी पिकाची नवीन वान प्रयोगशाळेत तयार केली गेली तरी या प्रक्रियेत दुसऱ्या सजीवांमधून जनुके सोडली जात नाही . उलट ज्या सजीवांमध्ये बदल घडवून आणायचा आहे त्यात सजीवांमध्ये अचूक अंतरिक जनुकीय बदल केला जातो . तसेच जनुकीय संपादन हे तंत्रज्ञान जीएम व प्रमाणे नियंत्रित केले जाणार किंवा जीएमओ म्हणूनही ग्राह्य धरले जाणार नाही.
जनुकीय संपादित वाण : सुरक्षितता आणि शाश्वतही
जनुकीय संपादनास जगभरातून मिळते समर्थन :-
नुकत्याच आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या माहितीवरून असे कळते की अमेरिका , युरोप , चीन या देशांतील उच्चस्तरीय कृषी संस्थांनी जनुकी संपादन या तंत्रज्ञानाला समर्थन दिले आहे . ज्याप्रमाणे नैसर्गिकरीत्या नवीन वाण तयार केली गेली जातात त्याचप्रमाणे जनुकिया संपादन प्रक्रियेने तयार केलेली वाण सुद्धा नैसर्गिक सुरक्षित व शाश्वत मानली जातील . यामुळे आपणास लवकरच जनुकीय संपादन प्रक्रियेने विकसित केलेली फळे भाज्या आणि धान्य बाजारात दिसतील व त्याचा आस्वाद घेता येईल . विशेषता याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा होईल . या गतीने जनुकीय संपादनावर संशोधन चालू आहे त्यावरून असे वाटते की हे तंत्रज्ञान नक्कीच दुसऱ्या हरितक्रांतीमध्ये मोलाचा वाटा उचलल्या यात शंका नाही .
शेतकऱ्यांनी आपला शेतमालाचा व्यवहार रोखीने करावा त्याबद्दल काही माहिती घेऊया…..
नाशिक जिल्ह्यातील शिवडीपाठोपाठ सारोळे खुर्द या गावातील द्राक्ष उत्पादकांनी स्वतःचा माल रोखीनेच विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व गावकऱ्यांकडून काटेकोर पालन व्हावे यासाठी ग्रामसभेत ठराव देखील मंजूर करून घेतला आहे . वापसी किंवा अडत व्यापाऱ्याला वसूल न करू देणे , भाव पाडून मागणाऱ्यांची व्यवहार न करणे आणि चेक किंवा आरटीजीएसच्या व्यवहारात कटती न करू देणे या ठरावातील महत्त्वाचे बाबी असून याद्वारे विक्री सौद्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीवर आळा घालण्याचा प्रयत्न या गावाने केला आहे . खेळा खरेदीतील द्राक्ष उत्पादकांचे अनुभव अत्यंत वाईट आहेत द्राक्षाचा कमी दर्जा हे अथवा बाजारात मागणीचा नाही अशी कारणे सांगून भाव पाडून मागितला जातो अनेक व्यापारी द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडवून पळून जातात . पुढे त्यांचा काहीही थांग पत्ता लागत नाही .
याबाबत मागील काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी दाखल होऊन त्यावर यंत्रणलां याला नियंत्रण घालता आलेले नाही. काही व्यापाऱ्यांकडून उशिराने पैसे मिळतात , त्यातही अनेक प्रकारच्या कपातील लावले जातात . तर काही व्यापारी सौद्यात घाटा आला असे सांगून ठरलेला भावसुद्धा देत नाही . हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी शेवडी , सारोळे खुर्द गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराची स्वागत करायला पाहिजे .
शेतमाला सातत्याने मिळणाऱ्या अत्यंत कमी भाव , बाजार समितीतील अनेक गैरप्रकार , खेडा खरेदीतील फसवणूक याबाबत चर्चा खूप झाली आहे . या व्यवस्थेत सुधारण्यासाठी नियम , कायदेही अनेक आहेत. परंतु शासन प्रशासनासह व्यवस्थेतील लाभार्थ्यांना त्यात सुधारणा घडवून आणायची नाही आणि शेतकऱ्यांच्या लुटीचे सत्र चालूच ठेवायचे आहे . अशावेळी शेतकऱ्यांनीच पुढे येऊन व्यवस्थेला धडा शिकवायला हवा , परंतु हे एकट्या दुखट्याचे काम नाही , त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे .
जनुकीय संपादित वाण : सुरक्षितता आणि शाश्वतही
Janukiye Sampadit Van