शेतामधील जैविक खतांचे महत्त्व व प्रभावी वापर : Jaivik Khatanche Mahatv Ani Vapar Best 4 points

Jaivik Khatanche Mahatv Ani Vapar

शेतामधील जैविक खतांचे महत्त्व व प्रभावी वापर

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जैविक खतं चे महत्व व त्याबद्दलचे प्रभावी वापर . जैविक खते म्हणजे काय ? प्रयोग शाळेत उपयुक्त कार्यक्षम जिवाणूंची स्वातंत्र्यरित्या वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जिवाणू खत , जिवाणू संवर्धन च बॅक्टेरियल कल्चर किंवा बॅक्टेरियल ईनोक्यूलंट म्हणतात. नत्र , स्फुरद , पालाश व इतर सूक्ष्म मूल्यद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर करता येतो . त्यांना जैविक खते असे म्हणतात . शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

जैविक खतांचे फायदे :-

जैविक खतामुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन त्यात बचत होऊ शकते . जैविक खते पर्यावरण पूरक आहेत . जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण शक्ती वाढते . जैविक खते सूक्ष्म अन्नद्रव्य बरोबरच जिभ्रेलिक ऍसिड , सायटोकाइनिन इंडॉल , ऍसिटिक ऍसिड यासारखी संप्रेरके व विटामिन बी झाडांना मिळून देतात. जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतीजैविके सोडले गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचे देखील नियंत्रण होते . जैविक खते वापरल्याने जमिनीचा पोत सुधारतो . उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते . तसेच उत्पादन खर्च कमी होतो.

जैविक खतांचे प्रकार :-

१) नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू -रायझोबियम, ऍसिटोबॅक्टर , अजोटोबॅक्‍टर अझोस्पिरीलम , निळे हिरवे शेवाळ , अझोला.
२) स्पुरद विरघळविणारे जीवाणू.
३) पालाश विरघळविणारे जिवाण.
४) सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जिवाणू.
५) सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जिवाणू.
६) नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू :-

राईझोबियम :- या जिवाणूंचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते . हे जिवाणू कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन गाठी बनवतात. मुळावर वाढलेले जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. एकाच प्रकारचे रायझोबियम जिवाणू खत व सर्व शेंगवर्गी पिकांना उपयोगी पडत नाहीत . त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत . वेगवेगळ्या गटातील विशिष्ट पिकांना त्याच गटाचे रायझोबियम जिवाणू खत वापरावे.

चवळी गट :- तूर , भुईमूग , बाग, चवळी , मूग , उडीद इत्यादी.
हरभरा गट -हरभरा वटाणा गट :; वाटाणा मसूर .
घेवडा गट – .
सोयाबीन गट :-सोयाबीन अल्फा.
अल्फा गट – लसूण घास .
वरसिम गट – वरसिम
प्रमाण -बीज प्रक्रियेसाठी 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे.
ऍसिटोबॅक्टर :- हे जिवाणू मुख्यतः ऊस व इतर शर्करायुक्त पिकांसाठी जैविक खत म्हणून वापरण्यात येते . हे जिवाणू उसाच्या मुळे व इतर भागातून वाढून नत्र स्थिरीकरण करतात . हे जिवाणू अंतरप्रवाही असल्याने स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये सर्वाधिक वापर होऊ शकतो . प्रमाण – बेणे प्रक्रियेसाठी 2.0 लिटर , फवारणीसाठी 10 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये.

Jaivik Khatanche Mahatv Ani Vapar

१) अझोटोबॅक्टर :-

हे जिवाणू पिकाच्या मुळावर गाठी न बनवता असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. तसेच हे जिवाणू बिजांकुरण व पीक वाढीसाठी उपयुक्त अशा काही रसायनांचा स्त्राव तयार करतात . काही रासायनिक तत्व बुरशीनाशक तसेच कृमी नाशक म्हणूनही कार्य करतात. या जिवाणूंचा उपयोग एकदल व तृणधान्य पिके उदाहरणार्थ ज्वारी , मका , कापूस , बाजरी , मिरची , सूर्यफूल , वांगी , डाळिंब इत्यादी पिकांमध्ये होतो .
प्रमाण बीजे प्रक्रियेसाठी 250 ग्रॅम प्रत्येकी 10 किलो बियाणे , एकरी चार किलो शेणखतातून, एकरी दोन किलो ड्रीप द्वारे फळझाडांसाठी 50 ग्रॅम प्रति झाड.

अझोस्पिरिलम : हे जिवाणू तृणधान्य व भाजीपाला पिकाच्या मुळ मध्ये आणि मुळ वर राहून नत्र स्थिरीकरण करतात. ज्वारी व मका या पिकांमध्ये या जिवाणूंचा प्रभावी उपयोग दिसून येतो . निळे हिरवे शेवाळ – हे एक विशिष्ट प्रकारची शेवाळ असून हवेतील नत्र भात पिकाला उपलब्ध करून देते . भाताच्या पुनरलागणीनंतर दहा दिवसांनी एकरी चार किलो प्रमाणे संपूर्ण शेतात सारख्या प्रमाणात पसरावे. अझोला ही पान वनस्पती शेवाळा बरोबर सहजीवी पद्धतीने हवेतील नत्र स्थिरीकरण करते . याचा उपयोग भात खाचरात हिरवळीचे खत म्हणून करतात.

२) स्फुरद विरघळविणारे जिवाणू :-

स्फुरद हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असे एक मूलभूत अन्नद्रव्य आहे . निसर्गात स्फुरद मुक्त स्वरूपात आढळून येत नाही . परंतु खनिजे , प्राण्यांचे अवशेष , खडक इत्यादी मध्ये आढळतो . हे अन्न द्रव्ये जमिनीत विरघळण्यास कठीण असून शिफारशी प्रमाणे दिलेल्या स्फुरदयुक्त खतांचा उपयोग पूर्णपणे होऊ शकत नाही . स्फुरद विरघळविणारे जिवाणू न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपलब्ध अशा रासायनिक स्वरूपात रूपांतर करतात . प्रमाण – बीज प्रक्रियेसाठी , 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे , एकरी चार किलो शेण खतातून , एकरी दोन लिटर ड्रीप द्वारे , फळझाडांसाठी 50 g प्रती झाड.

३) पालाश विरघळविणारे व वहन करणारे जिवाणू :-

वनस्पतींच्या पानांची जाडी व खोड फांद्यांच्या सालीची वाढ व बळकटीकरण करण्यास पालाश हे मुख्य अन्न द्रव्य मानले जाते . तसेच पालाश पिकांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो . महाराष्ट्रातील जमिनीमध्ये पालाश यां अन्न द्रव्यांची मुबलकता असूनही स्थिर स्वरूपात असल्याने पिकांना उपलब्ध होत नाही . हे जिवाणू स्थिर स्वरूपातील पालाशातून जैवरासायनिक क्रियांद्वारे पालाश मुक्त करतात व पिकाला उपलब्ध करून देतात . पालाश या मूल्य द्रव्य चे वहन होत नाही .
हे जिवाणू या पालाशची वहन क्रियाही सक्रिय करतात. प्रमाण – बीज प्रक्रियेसाठी 250 ग्रॅम प्रती 100 किलो बियाणे , एकरी चार किलो शेण खतातून , एकरी दोन लिटर ड्रीपद्वारे , झाडांसाठी 50 ग्रॅम प्रती झाड.

४) सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जिवाणू :-

पिकांची काढणी झाल्यानंतर उरलेली काडी , पाने , पाचट , पालापाचोळा यांसारखे पिकांचे अवशेष हे पोषणद्रव्यांचे उत्तम स्त्रोत असतात . त्यातील काहींचे विघटन होण्यास अधिक कालावधी लागतो . या विघटन प्रक्रियेमध्ये ठराविक जीवाणूंची योगदान असते . असे जिवाणू निसर्गात आढळून येतात . प्रमाण – एकरी चार किलो शेणखतातून , चार किलो प्रति टन काडी कचरा.

५) सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जिवाणू :-

जमिनीतील उपलब्ध अशा अविद्र्व्य स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य उदाहरणार्थ लोह , गंधक इत्यादीचे उपलब्ध स्वरूपात रूपांतरण करण्याचे कार्य हे जिवाणू करतात . प्रमाण एकरी दोन लिटर , ड्रीपद्वारे किंवा शेणखतातून.

जैविक कीटकनाशक :-

ट्रायकोडर्मा :- ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी आहे . या बुरशीचा उपयोग जैविक कीडनाशक म्हणून केला जातो. ट्रायकोडर्माचा उपयोग बीज प्रक्रिया मुळावर अंतरक्षीकरण तसेच जमिनीतून मातीमध्ये मिसळून केला जातो. प्रमाण – बीज प्रक्रियेसाठी 5g प्रति किलो बियाणे , हेक्टरी पाच किलो प्रमाणे शेणखतात मिसळून द्यावे.

जैविक खते वापरताना घ्यावयाची काळजी :-

जिवाणू संवर्धनाची पाकिटे सावलीत थंड ठिकाणी ठेवावे. तसेच सूर्यप्रकाश व उष्णता यांपासून संरक्षण करावे . जिवाणू खते हे जैविक घटक असल्यामुळे त्याचा वापर रासायनिक खत किंवा कीडनाशकासह करू नये .

बियाण्याला किंवा बेण्याला बुरशीनाशक अथवा कीडनाशकांची बीज प्रक्रिया करायची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून नंतर जिवाणूंची प्रक्रिया करावी . कडधान्य वर्गीय पिकांसाठी गटानुसार योग्य ते रायझोबियम खत निवडावे . जैविक खत खरेदी करण्यापूर्वी त्यावरील उत्पादन तिथी व वापराचे अंतिम तिथि वापरण्याच्या पद्धती या गोष्टी वाचून अंतिम तारखेपूर्वी संवर्धनाचा वापर करावा.

जिवाणू खते वापरण्याच्या पद्धती :-

१) बीज प्रक्रिया :-

250 ग्रॅम जिवाणू व ते दहा किलो बियाण्यास पुरेसे होतात . बियाण्याच्या प्रमाणावर बीज प्रक्रियेसाठी पुरेसे पाणी घेऊन त्यात वरील ऍझोटोबॅक्टर किंवा ऍझोस्पिरिअलम किंवा स्फुरद विरघळणारे जिवाणू आणि ट्रायकोडर्मा बुरशी संवर्धनाकरिता , जिवाण संवर्धने प्रत्येकी 500 ग्रॅम प्रत्येकी पाच लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे . या द्रावणात रोपांची मुळे पाच मिनिटे बुडवून ठेवावी. त्यानंतर त्वरित रोपांची लागवड करावी पिकांना पाणी द्यावे.

२) जिवाणू खते शेणखतात मिसळून जमिनीत पेरणे :- 1 ते 2.5 किलो जिवाणू खते 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावे . शक्यतो हे मिश्रण झाडांच्या किंवा पिकांच्या मुळाशी टाकावे. पिकास हलके पाणी द्यावे .

३) उसाच्या बिण्यावर प्रक्रिया :-
ऍसिटोबॅटर जिवाणू खत प्रत्येकी दोन किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे . या द्रावणात उसाच्या कांड्या दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवावे . त्यानंतर उसाची लागवड करावी व पाणी द्यावे.

४) भात पिकासाठी निळे हिरवे शेवाळे वापरण्याची पद्धती :-
भात पिकांच्या रोपांची लागवड पूर्ण करून घ्यावी . त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पाणी स्वच्छ झाल्यानंतर निळे हिरवे शेवाळ हेक्टरी 20 किलो प्रमाणात वापरावे . माती मिश्रित निळे हिरवे शेवाळ शेतात विस्कटून द्यावे . त्यानंतर बांधातील पाणी ढवळू नये.

५) व्हीं. ए. मायकोरायझा चा वापर :-
वाफेवरील सरीमध्ये व्हीए मायकोरायझा जीवाणू खत एकरी दोन ते तीन किलो या प्रमाणात टाकावे . त्यानंतर बी पेरावे पेरलेले बी मातीने झाकून टाकावे . पाणी द्यावे.

शेतामधील जैविक खतांचे महत्त्व व प्रभावी वापर

Jaivik Khatanche Mahatv Ani Vapar

Leave a Comment