Importance Of Fertigation
फर्टिगेशन आणि विद्राव्य खतांचे महत्त्व
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पर्टीगेशन आणि विद्रावक खत यांच्या महत्त्व बद्दल . विद्राव्य खतांचा ठिबक सिंचना मधून वापर करण्याच्या तंत्रास फर्टिगेशन तंत्र म्हणतात . ठिबक व तुषार पद्धतीने सिंचन करण्याबरोबरच पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थेत लागणाऱ्या विद्राव्य खतांचा पुरवठा हा दररोज किंवा दिवसाआड थेट पिकांच्या मुळांच्या कक्षेत केला जातो . या संकल्पनेला फर्टिगेशन असे संबोधले जाते .
फर्टिगेशनच्या वापरासाठी शंभर टक्के विद्राव्य खते उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे . सध्या बाजारात उपलब्ध असणारी काही पारंपारिक रासायनिक खते पाण्यात पूर्णपणे विद्राव्य तर नाहीतच . शिवाय त्यामध्ये क्लोराइड्स व सोडियम खते ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचनातून देता येत नाहीत . पारंपारिक खते पूर्णपणे विद्रव्य नसल्यामुळे पिकांना ती पुरेपूर उपलब्ध होऊ शकत नाहीत .
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
पीक वाढीचे संपूर्ण काळात सर्व खते एक , दोन किंवा तीन मात्रांमध्ये विभागून हाताने फेकून किंवा पाभरीतून दिली जातात . त्यामुळे बहुतांश अन्नद्रव्य निचऱ्याद्वारे , बाष्पीभवनाद्वारे व जमिनीतील स्थिरीकरणामुळे वाया जातात . शिवाय ही खते कार्यक्षम मुळंच्या खाली जाऊन पिकांना उपयुक्त राहणार नाहीत . या सर्व कारणांमुळे पारंपरिक खतांची पिकासाठी उपयुक्तता 50 ते 60 टक्क्यांपेक्षा कमी असते.
विद्राव्य खते कशी असतात :-
विद्राव्य खते संपूर्णपणे पाण्यात विद्राव्य असतात .विद्राव्य खते आम्लधर्मी असतात. विद्राव्य खते क्लोराइड्स व सोडियम सारख्या हानिकारक मूल्य द्रव्यांपासून मुक्त असतात .
विद्राव्य खते फवारणीतून तसेच ठिबकणे देण्यास योग्य असतात . विद्राव्य खते पाण्यात मिसळल्यावर शाखा तयार होणारी नसतात .
विद्राव्य खतांमधील अन्नद्रव्य विकास सहज व त्वरित उपलब्ध होणारी असतात .
विद्राव्य खते पिकाच्या अवस्थेनुसार देण्यासाठी योग्य असतात.
विद्राव्य खते वापरून मिळणारे फायदे :-
- विद्रावर खते 100% पाण्यात विद्राव्य असल्यामुळे अन्नद्रव्य पिकास लगेच उपलब्ध होतात .
- विद्राव्य खते वापरामुळे डाळिंबाचे निर्यात क्षम उत्पादन मिळते .
- पिकांना पाणी आणि अन्नदव्य यांचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते .
- विद्राव्य खाते पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार दररोज अथवा दिवसाआड देता येतात .
- विद्राव्य खते थेट पिकांच्या मुळाच्या कक्षेत दिले जातात व ती मुळाना त्वरित उपलब्ध होतात .
- विद्राव्य खते सौम्य द्रावणातून दिले जात असल्यामुळे मुळावर अनिष्ट परिणाम होत नाही .
- विद्राव्य खते देण्याची पद्धत अतिशय सोपी व सोयीची असल्यामुळे वेळ, मजूर , खर्च , ऊर्जा , यंत्रसामग्री यामध्ये बचत होते .
- विद्राव्य खते रोज कमी मात्रांमध्ये दिली जात असल्यामुळे अन्नद्रव्य नीचरावाटे स्त्रीकरण द्वारा वाया जात नाही .
- विद्राव्य खते आम्लधर्मीय असल्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रण करण्यास मदत होते . शिवाय ठिबक संचात क्षार साचत नाहीत . ड्रीपर्स चौक होत नाहीत .
- काही विद्राव्य खतांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असल्यामुळे जमिनीतून घ्यावयाची फारशी आवश्यकता भासत नाही .
- विद्राव्य खते वापरामुळे खतांच्या मात्रेमध्ये 25% बचत होते .
- विद्राव्य खते सोडियम क्लोराइड सारखे हानिकारक मूल्य द्रव्यापासून मुक्त असल्यामुळे जमिनीच्या पोतेचा ऱ्हास होत नाही . तसेच उत्पादनाची गुणवत्ता अप्रतिम राहते .
- विद्राव्य खते फवारणीसाठी वापरता येऊ शकतात .
- हलक्या जमिनीतही फर्टिकेशन द्वारे अधिक उत्पादन मिळविणे शक्य होते .
विद्राव्य खते द्यावयाची साधने :-
ठिबक सिंचन पद्धती मधून वेंचुरी किंवा फर्टीलायझर टॅंक किंवा इंजेक्टर पंपाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करता येतो .
वेंचुरी :-
हे पाण्याच्या दाबामधील फरकावर चालणारे साधन आहे . वेंचुरी द्वारे विद्राव्य खते पाण्याच्या प्रवाहाबरोबर झाडांच्या कक्षेत दिली जातात . वेंचुरीच्या शोषणाचा दर 30 ते 1500 लिटर प्रति तास असतो. मुख्य वाहिनीवरील द्वारे कमी जास्त करता येतो . वेंचुरी 0.75 ,1.0 , 1.5 , 2.0 इंच अशा साईज मध्ये उपलब्ध आहेत .
वेंचुरी ही डमरूच्या आकाराची मध्यभागी कमी होत जाणाऱ्या व्यासाची असल्यामुळे पाण्याच्या वाहनाचा वेग वाढतो व वेंचुरीच्या मध्यभागी उपलब्ध दाब कमी होऊन खताच्या टाकीमधील खताचे शोषण करून पुढे मुख्य नळी मधून संचामध्ये असलेले खत उपनद्यांमधून सिंचनाच्या वेळी ड्रीपर्स मार्फत जमिनीवर दिले जाते .
खत टाकी मधील पाण्यात मिसळावे व नंतर त्या टाकीत वेंचुरी नलिकेतून निघालेली नळी सोडण्यात यावी ठिबक सिंचन संच सुरू केल्यानंतर दाखवलेल्या दोन्ही नियंत्रक झडपास सुरू केल्या की मग टाकीतील खत वेंचुरीतून शोषले जाते व ते संचाच्या पाईप मधील पाण्याच्या प्रवाहात मिसळून ओपन नलिकेवरील असलेल्या ड्रीपर्स मधून अथवा झाडांच्या / पिकांच्या मुळाचे कक्षेत सोडले जाते.
फर्टीलायझर टॅंक :-
खताच्या टाकीद्वारे पाण्यात विरघळणारी खते ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या मुळाचे कार्यक्षम क्षेत्रात देता येतात . टाकीचा व्यास 30 ते 50 सेंटीमीटर व क्षमता 30 ते 160 लिटर असते . या टाकीस पाणी आत येण्याचे व बाहेर जाण्याचे अशा प्रकारचे दोन कनेक्शन्स असतात . आत येण्याचे तोंड टाकीच्या तळाशी उघडले जाते तर बाहेरचे तोंड खताच्या टाकीच्या जाळीस वरच्या बाजूस असते . मुख्य वाहिनीवर दोन जोड्यांमध्ये एक झडप बसवलेली असते . त्यामुळे पाणी आत येण्याच्या वेगावर नियंत्रण ठेवता येते .
आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या पाईपच्या तोंडाजवळील पाण्याच्या दाबातील फरकामुळे खत मिश्रित पाणी मुख्य नळीत ओढले जाते . टाकीतील खत मिश्रित पाण्याचे द्रावण टाकीच्या आतील तोंडाद्वारे येणाऱ्या पाणी प्रवाहामुळे टाकीच्या बाहेरच्या तोंडाद्वारे मुख्य वाहिनीत सोडले जाते आणि टाकीतील पाण्यात विरघळलेल्या खताची तीव्रता हळूहळू कमी होऊन शेवटी मूळ पाणी शिल्लक राहते.
फर्टीलायझर इंजेक्टर पंप :-
या प्रकारामध्ये खतांचे द्रावण टाकीत किंवा बादलीत तयार केले जाते व इंजेक्टर पंपाच्या सहाय्याने शोधून सिंचनात मिसळून पिकांना दिले जाते . सध्या या पंपाचे तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत . त्याचा खते शोषून घेण्याचा दर ताशी 40 , 50 , 120 लिटर एवढा आहे . फर्टीलायझर इंजेक्टर पंपाद्वारे खते पिकास पाहिजे त्या तीव्रतेने तंतोतंत दिली जातात . यामध्ये इंधन विद्युत ऊर्जा किंवा पाण्याचा दाब वापरून खत मुख्य नळी मध्ये सोडण्यात येते . पंप किमतीने जास्त असतात . त्यामुळे शक्यतो हरितगृहामध्ये खते देताना अशा प्रकारचे इंजेक्टर पंप वापरण्यात येतात . तसेच ठिबक सिंचना खालील क्षेत्र जास्त असल्यावर ही असे पंप तयार करण्यासाठी गंजविरहित साहित्य म्हणजे प्लास्टिक फायबर यांचा उपयोग केला जातो किंवा खत मिश्रित पाण्याच्या सहवासात येणाऱ्या भागावर अशा साहित्याचे आवरण तयार करण्यात येते.
फर्टिगेशन करताना घ्यावयाची काळजी .
विद्राव्य खते ही ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची असल्यामुळे ठिबक सिंचन संचाची काळजीपूर्वक देखभाल करणे हे महत्त्वाचे ठरते . ठिबक सिंचन संचाची मांडणी ही आराखड्यानुसार असावी .
फर्टिगेशन करताना घ्यावयाची दक्षता :-
- ठिबक तोट्या / ड्रीपर्स जमिनीवर योग्य रीतीने ठेवावेत .
- ठिबक तोट्या / ड्रीपर्स यामध्ये माती किंवा पालापाचोळ जाणार नाही याची काळजी घ्यावी .
- ठिबक सूक्ष्म सिंचन संचामध्ये खत , शेवाळे , गंधक , लोह किंवा इतर क्षार साचून देऊ नये . त्यामुळे उत्सर्जक / ठिबक तोट्या बंद पडतात . शेवाळ असल्यास क्लोरीन प्रक्रिया व रासायनिक अशुद्धता असल्यास आम्ल प्रक्रिया करावी .
- घनरूप खते पाण्याबरोबर देताना ती पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असणे आवश्यक आहे .
- पाण्यातील मीठ किंवा इतर रसायनांबरोबर खतांची रासायनिक प्रक्रिया झाल्यास कॅल्शियम व सल्फेट पासून जिप्सम तयार होतो आणि संच ( ठिबक तोट्या / उत्सर्जक , सूक्ष्मनळ्या) बंद पडतो . अशावेळी संचाला आम्ल प्रक्रिया करून संच साफ करावा.
- ज्या संचा मधून फर्टिकेशन करावयाचे आहे तो संच वापरण्यास सुलभा असावा . तसेच योग्य डिझाईन केलेला व प्रमाणित दाब उपलब्ध करणारा संच असेल तरच सर्व साधने वापरता येतात .
- जिवाणूमुळे मॅग्नीज ऑक्साईड जे तांबड्या / काळ्या रंगाचे असते ते तयार होते . तसेच पाण्यात असणाऱ्या क्षारांची कॅल्शियम मॅग्नेशियम बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन तोट्यांमध्ये पांढऱ्या रंगाचा साका तयार होतो .
फर्टिगेशन कार्यक्षमता :-
फर्टीगेशन कार्यक्षमता खालील बाबींवर अवलंबून असते .
ठिबक सिंचन संचाची डिझाईन नुसार उभारणी .
ठिबक सिंचन पद्धती मधून पाणी वापरावे .
वेळापत्रक :-
- जमिनीचा प्रकार .
- जमिनीचा सामू .
- जमिनीतील विद्राव्य क्षार .
- जमिनीतील तापमान .
- मुळांच्या कार्यक्षत्रांमधील खतांची तीव्रता .
- फर्टिगेशन कालावधी .
- फर्टिगेशनची साधने .
- सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता.
Importance Of Fertigation
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌
फर्टिगेशन आणि विद्राव्य खतांचे महत्त्व