How To Protect Food Grains
रासायनिक पदार्थांद्वारे अन्नधान्याची संरक्षण कसे करता येईल
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचे विषयावर जो आहे रासायनिक पदार्थांवर आपण आपल्या पिकवलेल्या अन्नधान्याचे कशा प्रकारे संरक्षण करावे.
अन्नधान्यांमध्ये जैविक रासायनिक प्रक्रिया सतत चालू असतात . त्यामुळे त्यांची साठवण योग्य साधनसामग्री मध्ये करणे आवश्यक आहे. भारतामध्ये साठवलेल्या अन्नधान्याचे नुकसान प्रामुख्याने किडी , सूक्ष्म जीवाणू , उंदीर व घुशी मोठ्या प्रमाणात करतात. यांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खेडोपाडी , शेतावरती आणि अन्य धान्याच्या वखारीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. खेडोपाडी अन्नधान्य साठवण्याची साधने शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली नसतात त्यामुळे किडींचा बंदोबस्त जास्त प्रमाणात होत नाही . त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करणे किंवा औषधांची वाफ सोडणे हाच महत्त्वाचा उपाय असतो .
अन्नधान्यास कीड लागू नये म्हणून औषधाची फवारणी किंवा गुरळणी करण्यापूर्वी खालील बाबींचा विचार करण्यात अत्यंत आवश्यक आहे.
१) अन्नधान्य कोणत्या प्रकारचे साठवलेले आहे.
२) अन्नधान्य साठवण्यासाठी वापरलेले साधन कोणते आहे आणि त्यामध्ये किती दिवस ते साठवले जाणार आहे
३) अन्नधान्यस संभाव्य कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होणार आहे
४) साठविलेले अन्नधान्य कशासाठी ( खाण्यासाठी , बियाण्यासाठी किंवा , पशुखाद्यासाठी) वापरायचे आहे .
५) साठवलेले अन्नधान्य केव्हा वापरले जाणार आहे.
६) रासायनिक औषध कोणते वापरायचे आहे व त्याची हाताळण्याची माहिती असणे आवश्यक आहे .
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
भारतामध्ये अन्नधान्य साठवण्यासाठी प्रामुख्याने ज्यूटची बॅग/गोणी , प्लास्टिकची गोणी , मातीची मडके , रांजण , पत्र्याची कोठे , पिंप , सुसा बिन , स्टायलो स्टोरेज चा वापर करतात . या साधनांमधील अन्नधान्य नंतर मोठ्या प्रमाणावर हे अन्नधान्य गोडाऊन / वेअर हाहूस किंवा वखारी मध्ये साठवले जाते .
How To Protect Food Grains
वरील साधनांमध्ये अन्नधान्य साठवितांना खालील विविध रासायनिक पदार्थांचा वापर संरक्षक म्हणून केला जातो.
१) कडुलिंबाचा पाला :-
अन्नधान्य चांगले वाळवून नंतर त्यामध्ये कडुलिंबाचा ओला पाला एक टक्का व निंबोळी पावडर ५% मिसळून ते अन्न धान्य विविध साधनांमध्ये साठवले जाते . कडू लिंबाच्या पानांमध्ये अझाडीरेक्टिन घटक असल्यामुळे तो किडींना परावर्तित करण्याचे कार्य करतो. त्यामुळे त्या धान्यास कीड लागत नाही . धान्य वापरावयाच्या वेळी कडुलिंबाचा पाला व निंबोळी पावडर धान्यापासून वेगळे करावे व नंतरच धान्य वापरावे.
२) राख / भुकटी :-
अन्नधान्य साठवताना त्याच्या वजनाच्या 0.5 ते 1.0 प्रतिशत राख किंवा वेखंड औषधी वनस्पतीची भुक्ती मिसळावी . ज्यावेळेस अन्नधान्य खाण्यास वापरावायचे असेल तेव्हा ते स्वच्छ करूनच वापरावे . या साधनाचा वापर प्रामुख्याने खेडेपाडी अन्नधान्य मडक्यांमध्ये किंवा कणगीमध्ये साठवताना करतात.
सध्याच्या आधुनिक तांत्रिक युगामध्ये अन्नधान्य साठवितांना एफ. ए. डी. किंवा डब्ल्यू. एच. ओ. या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केलेल्या रासायनिक पदार्थांचे वापर केला जातो व साठवणुकीच्या कालावधीत अन्नधान्याची होणारी नासाडी थांबवली जाते . काही ठराविक रासायनिक पदार्थांची माहिती येथे देण्यात येत आहे.
३) बोरिक पावडर :-
तांदळाची व डाळींचे साठवण करताना प्रामुख्याने दहा ग्राम बोरिक पावडर प्रति किलोस वापरली जाते . त्यानंतर तो तांदूळ ॲल्युमिनियमच्या डब्यात किंवा पत्राच्या कोठीत साठवतात . हा तांदूळ व डाळी खाण्यास वापरण्यापूर्वी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घेतला जातो.
४) डेल्टामेथरीन:-
धन्य जर बियाणे म्हणूनच वापरावायचे असेल तर 4 मिली डेल्टामेथ्रीन 500 मिलि पाण्यात मिसळून 100 किलो बियाण्यास चोळावे किंवा डेल्टामेथ्रीन 2.5% तीव्रतेची पाण्यात विरघळण्याची भूक्ती 40 मिलीग्राम प्रति किलो बियाण्यात मिसळावे . अशाप्रकारे बीजप्रक्रिया केलेले धान्य खाण्यासाठी वापरू नये.
५) ॲल्युमिनियम फॉस्फईड (56%) :-
या धुरिजण्य कीटकनाशकाच्या तीन ग्रॅम वजनाच्या तीन गोळ्या प्रति टन कोठारातील बियाण्यास/ धान्यास अथवा दहा ग्रॅम पाऊच / टन धान्य/ बियाण्यासाठी अथवा १५० ग्रॅम पावडर /100 घनामिटर जागेसाठी पाच – सात दिवस संपर्क ठेवल्यास किडी चा नाश होतो . ज्या बियाणे / धान्याचे अथवा कोठारातील जागेचे धुरीकरण करावयाचे आहे ते हवाबंद असावे , तसेच धूरीकरणानंतर प्लास्टिक कागद अथवा ताडपत्री हळुवार काढावी. व अशा धान्य / बियाण्याचा वापर 48 तासांनी करावा . हे धुरीजन्य कीटकनाशक सुरक्षित असून त्याच्या वारंवार वापराचा बियाण्याच्या उगवण शक्तीवर दुष्परिणाम होत नाही . सदरहू धूरीनाशक बाजारामध्ये सेल्फॉस , क्विकफॉस किंवा रालॅक्स फ्यूमीटॉक्सिन व फॉसटोक्सिंन या नावाने प्रचलित आहेत.
६) इथलीन डायक्लोराइड : कार्बन-टेट्राक्लोराइड (3:1) :-या धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात साठवलेल्या बियाण्याची धुरीकरणसाठी केला जातो . बियाणे साठवणुक कोठारात तीनशे ते चारशे ग्रॅम घनमीटर जागेसाठी अथवा १५० ग्रॅम घनमीटर जागेसाठी कोठाराचे धूरीकरण करण्यासाठी वापर करावा . धूरीकर्णानंतर प्लास्टिक कागद अथवा ताडपत्री हळुवार काढावी व अशा बियाण्याचा वापर 24 तासांनी करावा. बियाण्यास 48 ते 72 तासांपर्यंत धूरीकरण करावे . तसेच रिकामे कोठारासाठी धूरीकरण सात दिवसांपर्यंत करावे.
७) मिथिल ब्रोमाइड (98 टक्के) :-
याचा वापर हवा बंद स्थितीत तृणधान्ये व कडधान्यातील किडींपासून संरक्षणासाठी करतात . याचे वापरावयाचे प्रमाण 24 ग्राम प्रतिघन मीटर जागेसाठी असून सहा ते आठ तासासाठी धूरीकरण करतात. तसेच प्रतीक्षा कालावधी 24 तासाचा असतो.
इशारा : धुरिजन्य कीटकनाशकाचा वापर शासनमान्य अधिकृत परवानाधारक धूरीकरण यंत्रणेमार्फतच करावा अन्यथा जीवास धोका उद्भवू शकतो.
८) फॉस्फिन :- अन्नधान्य खाण्यासाठी किंवा पशुखाद्यासाठी वापरायचे असेल तर ते साठवितांना प्रामुख्याने फॉस्फिन या रासयनिक पदार्थांचा वापर धुरी /फ्यूमिगेशन करून केला जातो . हा रासायनिक पदार्थ वायू स्वरूपात धान्यांमध्ये सोडला जातो.
९) क्लोराईड वायू :- या रासायनिक पदार्थास बाजारामध्ये ग्रेनगार्ड या नावाने ओळखले जाते. यामध्ये प्रामुख्याने 9% इथिलिन डायक्लोराइड , 3% कार्बन टेट्रक्लोराइड आणि 88% इथिलीन टेक्लोराईड यांचे मिश्रण असते. या मिश्रणाची तीन मिली ची एक ट्यूब 50 किलो धान्याचे फ्युमिगेशन साठी वापरावी व ते धान्य 48 तास बंदिस्त अवस्थेत ठेवावे . सर्व प्रकारच्या अन्नधान्याचे साठवणुकीत या रासायनिक संरक्षकाचा वापर करता येतो.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
अन्नधान्याच्या साठवणुकीत वायू धुरी देण्यासाठी प्रामुख्याने तीन प्रकार पाडले जातात.
१) साठवणुकीस धुरी देणे
२) सिटेड स्टॉक फ्यूमिगेशन
३) सर्क्युलेटरी सिस्टीम
१) साठवणूकिस धुरी देणे:-
या पद्धतीत अन्नधान्य साठवणुकीच्या साधनातील सर्व मोकळी जागा रासायनिक पदार्थांचे वायूने व्यापून टाकली जाते . यासाठी बंदिस्त साधनांची आवश्यकता असते . उदाहरणार्थ पत्र्याची कोटी , सायलो पिंप इत्यादी. धान्य साठवणुकीचे साधन पूर्णतः हवा बंद करता आले पाहिजे . या पद्धतीमध्ये अन्नधान्याचे चांगल्या पद्धतीने संरक्षण केले जाते . ही प्रक्रिया तज्ञ मार्गदर्शनाखाली करावी.
२) सिटेड स्टॅक फ्यूमिगेशन :-
अन्नधान्याची पोती / गोण्या भरून त्याची धप्पि गोडाऊन / वेअर हाऊस मध्ये लावली जाते. त्यावरती ताडपत्री प्लास्टिकचा कागद किंवा 150 ते 200 मिली जाडीचा सेंडसचनेचे आवरण टाकून ते पूर्णपणे झाकले जाते. या झाकलेल्या अन्नधान्याच्या पोत्यांच्या थप्पी मध्ये संरक्षक वायूचा झोप सोडून तेथील वातावरण निर्जंतुक केले जाते. यामध्ये वायू गळती होण्याचे प्रमाण अधिक असते . त्यामुळे संरक्षकाचे प्रमाण थोडे अधिक वापरावे लागते.
३) सर्क्युलेटरी सिस्टम :-
नव्याने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला फायटो – एक्स्लो फ्यूमिगेशन या नावाने ओळखले जाते . यामध्ये अन्नधान्य साठवणुकीच्या साधनांमध्ये पाईप सोडून त्याद्वारे धुरी केली जाते . यामध्ये सर्व बाजूने पाईप फिरविण्यात येतो. सायलो स्टोरेज , सीप होल्डस आणि मोठ्या कंटेनर मध्ये ही अवस्था करता येते . या पद्धतीमध्ये मिथील ब्रोमाइट या संरक्षकाचा सुद्धा वापर करता येतो.
अन्नधान्य साठवण्यासाठी मोठमोठी वेअरहाउस , गोदामांचा वापर केला जातो. तेथील अन्नधान्याची साठवण अधिक कालावधीसाठी चांगल्या स्थितीत करण्यासाठी धूरी देण्याशिवाय भूकटी किंवा द्रव पदार्थ फवारणी अथवा धुरळणी करून संरक्षण केले जाते . धूरळणी ही सुद्धा विविध प्रकारे केली जाते व त्यासाठी सुद्धा विविध रासायनिक संरक्षक पदार्थ वापरले जातात . या पद्धतीमध्ये स्प्रे पंप , मिस्ट ब्लॉअर किंवा फोग जनरेटर चा वापर केला जातो.
रासायनिक पदार्थांद्वारे अन्नधान्याची संरक्षण कसे करता येईल