How To Export Best Agricultural Products
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपण पिकवलेल्या शेतीमालाला कशाप्रकारे निर्यात करता येईल. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले आहेत. त्यामध्ये शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचा आणि निर्यातक्षम भाजीपाला पिकविण्याकडे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल दिसतो. आताच्या काळामध्ये बरेचसे शेतकरी आपला भाजीपाला विदेशात निर्यात करण्याची तयारी करत असतो. परंतु विदेशात भाजीपाला निर्यात करण्यासाठी बऱ्याचशा कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यातील काही कागदपत्रांची ओळख आपल्या या पोस्टमध्ये आपण करू.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
महाराष्ट्रात अशाप्रकारे अंजीर ची लागवड करावी:-
भाजीपाला निर्यात करण्यासाठी सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांना आयात निर्यात परवाना काढणे आवश्यक असतो.
हा परवाना काढण्यासाठी खालीलपैकी आवश्यक कागदपत्रे लागतात.
संस्था नोंदणी प्रमाणपत्र. भारताचे आयकर विभागाकडून मिळणारा कायम खाते क्रमांक व त्याची झेरॉक्स प्रतपत्र बी नुसार बँकेच्या लेटरहेडवर प्रमाणपत्र.
दोन पासपोर्ट साईज फोटो.
बँकेचे प्रपत्र त्यावरील आपल्या पासपोर्ट साईज फोटोवर बँक अधिकाऱ्यांची साक्षांकन आवश्यक असते.
How To Export Best Agricultural Products
सहसंचालक विदेश व्यापार यांची नावे इंग्रजी अक्षरात लिहिलेले 1000 रुपयांचा पुणे किंवा मुंबई येथील राष्ट्रीयकृत बँकेत देय असलेला डिमांड ड्राफ्ट तसेच प्रपत्रानुसार घोषणापत्र ही आवश्यक असते.
A4 आकारातील पाकीट व 30 रुपयांचे पोस्टल स्टॅम्प.
अर्ज बाबतची माहिती व प्रपत्र यांचे नमुने सरकारी वेबसाईटवर उपलब्ध असतात. प्रपत्रातील तपशील वार माहिती भरून अर्जदाराने सहसंचालक विदेश व्यापार यांच्या पुणे किंवा मुंबई कार्यालयात स्वतःच्या हस्ते किंवा नोंदणीकृत टपाल सेवेने सर्व कागदपत्रांचा अर्ज सादर करावा.त्यानंतर हा आयात निर्यात परवाना मिळाल्यानंतर निर्यात वृद्धी परिषदेकडे नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे असते यासाठी कृषीमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी अपेडा, नवी दिल्ली यांच्या विभागीय कार्यालय किंवा अपडाच्या वेबसाईटवर नोंदणी करता येते.
शेतीमाल सुरक्षिततेबाबत हमी देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
ग्लोबल गॅप सर्टिफिकेट,
आरोग्य विषयक प्रमाणपत्र,
पॅक हाऊस प्रमाणपत्र,
ऍगमार्क प्रमाणपत्र,
सॅनिटरी प्रमाणपत्र
इत्यादी प्रकारचे कागदपत्र आवश्यक असतात.
आयातदार कसा शोधावा
या सगळ्या प्रक्रियेनंतर आपल्याला भाजीपाला व तत्सम कृषी उत्पादने निर्यात करता येतात. परंतु ते घेण्यासाठी बाहेरील देशातील आयातदार शोधावा लागतो. त्यासाठी अपेडासारख्या संस्थांचे वेबसाईटवर जाऊन माहिती उपलब्ध करता येते. त्यानंतर आयातदाराची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आयातदाराशी संपर्क साधून आपल्या भाजीपाला मालाची माहिती द्यावी लागते. संबंधित आयातदाराची बाजारातील प्रत तपासणी फार आवश्यक असते. हे प्रत तपासणीचे काम एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या शासकीय संस्थेकडून केले जाते.
निर्यातीसाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी विमानात किंवा जहाजात जागा आरक्षित करण्यासाठी आणि कस्टम क्लीअरिंगसाठी सी एच ए (कस्टम हाऊस एजंट) ची नियुक्ती करणे फायद्याचे असते. हे एजंट मुंबई व पुण्यात उपलब्ध असतात . जर शेतकऱ्यांनी वरीलपैकी कागदपत्रांची पूर्तता केली आणि व्यवस्थित तांत्रिकदृष्ट्या माहिती मिळवली तर आपण निर्यात क्षेत्रामध्ये अग्रगण्य स्थान मिळवून आपली आर्थिक परिस्थिती उंच करू शकतो.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌