Fruits And Vegetables Dehydrating Methods
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फळे भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पद्धती. फळे व भाज्यामध्ये असणारी नैसर्गिक आद्रता कमी करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. ते वापरताना आपणास तापमान व प्रक्रिया ही वेळ या बाबींचे विशेष नियंत्रण करावे लागते. अन्यथा अपेक्षित असलेले गुणवत्तेचे निर्जलीकरण मिळू शकत नाही. प्रक्रियेचे तापमान व वेळ या बाबी फळे व पालेभाज्या यांचा प्रकार यावर अवलंबून असते. निर्जलीकरण केलेल्या मालाची गुणवत्ता मानके म्हणजे त्यांचा रंग, चव आणि पोषक मूल्य ही योग्य पद्धतीने नियंत्रित केलेली असावी. ताजा भाजीपाला व फळे यांचे नुसार हे घटक एकसारखेच असावेत ही बाजारपेठेची अपेक्षा असते.
निर्जलीकरण तंत्र काय आहे:-
आपण या तंत्राद्वारे खालील फळे व भाज्यांवर प्रक्रिया करू शकतो.
भाजीपाला :-
मेथी, कोथिंबीर, पुदिना, गाजर, भेंडी, वांगी, शेवगा, बीट, कोबी, फ्लॉवर, गवार, लसूण, मशरूम, कांदा, टोमॅटो आदी.
फळे :-
केळी, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, बेदाणे, सफरचंद, अंजीर, चिकू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, अंजीर आदी
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
रंग :
हिरव्या पालेभाज्यांच्या निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये नैसर्गिक रंग नियंत्रित करणे हे कौशल्याचे काम आहे. हा रंग नियंत्रित करण्यासाठी प्रक्रियेचे तापमान आणि वेळ नियंत्रित करणे गरजेचे आहे. प्रक्रिया तापमानावर योग्य असे नियंत्रण वेळेवर न करता आल्यास तयार होणाऱ्या उत्पादनाचा रंग काळसर तांबूस तसेच जळकट होतो. त्यामुळे मालाचे बाजारपेठेतील गुणवत्ता मूल्य कमी होऊन मागणी व दर यावर परिणाम होऊ शकतो.
Fruits And Vegetables Dehydrating Methods
गंध :-
हा देखील फार महत्त्वाचा मानक आहे. गंध नियंत्रित करण्यासाठी प्रक्रियेचे तापमान अत्यंत महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यास म्हणजेच नियंत्रित तापमानापेक्षा जास्त तापमानास प्रक्रिया केल्यास पाण्याच्या बाष्पीभवनाने यातील सुगंधी संयुगे व सुगंधी तेल यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तयार होणाऱ्या उत्पादनाला अपेक्षेपेक्षा नैसर्गिक गंधाचे प्रमाण कमी होऊ शकते. अशा उत्पादनाची बाजारपेठेतील मागणी कमी होऊ शकते.
चव :-
हिरव्या पालेभाज्या व फळे यांच्यातील चव ही प्रक्रियेचे तापमान तसेच वेळेवर देखील अवलंबून आहे. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले असता तयार होणाऱ्या उत्पादनाला नैसर्गिक चव असते. ती बाजारपेठेतील गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून अपेक्षित असते. जर तयार झालेल्या उत्पादनाला नैसर्गिक रंग, गंध, चव असेल तर बाजारपेठेतील या उत्पादनाची गुणवत्ता उच्चतम दर्जाची मानली जाते. अशा उत्पादनाला मागणी वाढते व दरही चांगले मिळतात.
पोषक मूल्य :-
या प्रक्रियेमध्ये निर्जलीकरण केलेल्या उत्पादनाला पोषक मूल्य असणे देखील महत्त्वाचे ठरते. यामध्ये वेगवेगळ्या तापमानास प्रक्रिया करून उत्पादनाची पोषक मूल्ये जपावी लागतात. त्यामुळे प्रक्रिया नियंत्रित तापमानाला करावी लागते. ज्या उत्पादनाची पोषक मूल्य नैसर्गिक शेती मालासारखी असतात त्यांना बाजारपेठेत योग्य तर मिळतो.
छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी निर्जलीकरण प्रचलित पद्धती :-
सावलीत सुकवणे :-
ही पद्धत पारंपरिक म्हणून मानली जाते. यात भाजीपाला सावलीत सुकविला जातो. या प्रक्रियेची पूर्वतयारी पुढील प्रमाणे करावी लागते. हिरवा भाजीपाला प्रथम निवडला जातो. यातून नको असलेला भाग काढून टाकला जातो. हा निवडलेला भाजीपाला योग्य अशा आकारात कापून घेतला जातो.
त्यानंतर हा कापून घेतलेला भाजीपाला मिठाचे द्रावणात धुऊन घेतला जातो. त्यानंतर हळदीच्या पाण्यामध्ये साधारणपणे 20 मिनिटे बुडवून ठेवला जातो. या प्रक्रियेमुळे यावर असलेले जिवाणू नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे तयार होणाऱ्या उत्पादनाची टिकवण क्षमता वाढवली जाते. हा धुतलेला भाजीपाला परफोरेटेड ट्रेमध्ये घेऊन यातील पाण्याचा निचरा केला जातो. या पाण्याचा निचरा झालेला भाजीपाला ट्रेमध्ये अथवा पातळ कापडावर एक इंच जाडीच्या थराने पसरून ठेवला जातो. त्यानंतर सावलीत सुकविण्यासाठी म्हणजेच डीहायड्रेशन प्रोसेस साठी नैसर्गिक पद्धतीने ठेवला जातो. वातावरणातील धुलीकण तसेच अनावश्यक पदार्थ यात मिसळू नयेत यासाठी यावर पातळ कपडा अंथरला जातो.
व्यावसायिक पद्धती :-
सोलर ड्रॉइंग :-
नैसर्गिकरीत्या निर्जलीकरण पद्धती ऐवजी सौरऊर्जेवर आधारित म्हणजेच सोलर ड्रॉइंग पद्धत वापरली जाते . कारण या पद्धतीत आरोग्य सुरक्षिततेच्या अवस्था नियंत्रित करण्यासाठी फार मदत होते. तसेच निर्जलीकरण प्रक्रियेसाठी महत्त्वाचे असलेले निकष अर्थात प्रक्रियेचे तापमान व वेळ यांचे नियंत्रण करण्यासाठी उत्कृष्ट सुविधा असते. यात इलेक्ट्रिकल एअर ब्लोअर वापरले जातात. त्याद्वारे प्रक्रियेचे तापमान नियंत्रण करता येऊ शकते. ही पद्धत बॅच ड्रायर म्हणून देखील प्रचलित आहे. या पद्धतीत प्रक्रियेचे तापमान साधारणपणे 45 अंश सेल्सिअस पर्यंत नियंत्रित केले जाते. तयार झालेले उत्पादन फुड ग्रेड सीलबंद पिशवीत हवाबंद पद्धतीने पॅक करून बाजारपेठेत मागणीनुसार पाठविले जाते. अशा उत्पादनाची टिकवण क्षमता साधारण आठ ते दहा महिन्यांपर्यंत असते. या पद्धतीत प्रक्रियेची पूर्वतयारी फार महत्त्वाची असते.
अशा अनेक प्रकारे आपल्याला फळ भाज्यांचे निर्जलीकरण करता येऊ शकते .
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌