हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती best Fodder production through hydroponic technology1

Fodder production through hydroponic technology

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती:-
शेतकरी मित्रांनो नमस्कार , आपल्याकडे पशुपालन हा सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त जोडधंदा आहे . दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून शेतकरी आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवत असतात . मात्र गेल्या काही कालावधीपासून चाऱ्याची फार मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण होताना दिसत आहे . त्यातच हिरवा चारा पशुधनासाठी खूपच आवश्यक असतो परंतु जमिनीची उपलब्धता आणि पाण्याच्या कमतरतेमुळे मुबलक प्रमाणात पौष्टिक आणि हिरवा चारा तयार करणे कठीण झाले आहे . उत्कृष्ट दर्जाच्या चाऱ्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर फार मोठा फरक पडताना दिसून येत आहे .

Fodder production through hydroponic technology

हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे :-
1) इतर सर्व साऱ्यांच्या तुलनेत या चाऱ्यामध्ये जास्त पोषक असतात
2) हायड्रोपोनिक चाऱ्याची वाढ आठ ते दहा दिवसात होत असते .
3) कमी पाण्यावर सुद्धा हा चारा आपण वर्षभर तयार करू शकतो .
4) जनावरांच्या शरीरात प्रथिने , खनिजे , जीवनसत्वाच्या उपलब्धतेत वाढ होते .
5) दुधाचे प्रमाणात तसेच Fat मध्ये वाढ होते .
6) प्रथीने , जीवनसत्वे , अँटीऑक्सिडन्स , फॉलिक ऍसिड , ओमेगा-3 , स्निग्ध पदार्थ हरितद्रव्यात मोठ्या प्रमाणात असतात . या चाऱ्यामुळे पशुखाद्य वरील खर्च सरासरी 25 ते 40% कमी करता येऊ शकतो .
8) या चारच्या निर्मितीसाठी कुठले प्रकारच्या रसायन किंवा कीटकनाशकांची गरज नसते .
9) कमी पाण्यात , कमी जागेत , कमी कालावधीत आणि स्वस्तात या चाऱ्याचे उत्पादन शक्य आहे साधारण फक्त तीन ते चार लिटर पाण्यामध्ये एक किलो चारा पिकवला जाऊ शकतो .

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मितीची पद्धत :-
हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये गहू बाजरी व मका या तृणधान्यांची वाढ करून चारा निर्मिती करावे . यासाठी वापरले जाणारे बियाणे चांगले व उत्तम प्रतीचे असावे . सर्वप्रथम बियाणे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यावे. त्यानंतर ते बियाणे मोड येण्यासाठी 12 ते 24 तास कोमट पाण्यात भिजत ठेवावे . यानंतर पाणी काढून ते बियाणे ओल्या बारदानात पुढील 48 तासांसाठी ठेवावे . यामुळे बियाण्यास मोड येण्यास सुरुवात होते .

वातावरणानुसार बारदानावर सकाळी व संध्याकाळी पाणी शिंपडावे . जेणेकरून ते ओलसर राहील कोंब फुटण्यास सुरुवात झालेल्या बियाण्यांवर पाच टक्के मिठाचे द्रावण शिंपडावे . यामुळे ओलसर वातावरणात बुरशीची वाढ होणार नाही . बुरशीच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकांचा वापर करता येईल . त्यानंतर 2 फूट × 1.5 फूट × 2 इंच या आकाराचे ट्रे घेऊन ते पाण्यात स्वच्छ धुऊन वाळवून घ्या . त्यानंतर मोड आलेले तृणधान्य प्रति ट्रे एक किलो याप्रमाणे पसरून घ्या . त्यानंतर हे सर्व ट्रे शेडमध्ये लाकडाचे किंवा बांबूच्या ताटयांवर ठेवावे .

त्यानंतर शेडमध्ये आद्रता टिकून राहण्यासाठी फॉगर्स किंवा मायक्रो स्प्रिंकलर चा वापर करता येतो . फॉगर्सचा वापर करताना दिवसातून 7 वेळेस 2 तासांच्या अंतराने प्रत्येक वेळेस 5 मिनिटे याप्रमाणे पाणी द्यावे . तर शेतकरी मित्रांनो , अशा प्रकारे 11 ते 12 दिवसात 20 ते 25 सेमी उंचीचा हिरवा पौष्टिक चारा तयार होतो . त्यातून जवळपास दहा ते बारा किलो प्रति ट्रेन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते तसेच दुखत्या जनावरांना प्रति दिवस 15 ते 20 किलो चारा लागतो व भाकड जनावरांना 6 किलो चारा लागतो . अशा प्रकारे आपल्याकडे असलेल्या एकूण जनावरांच्या संख्येनुसार ट्रे चे नियोजन करावे..

Fodder production through hydroponic technology

Leave a Comment