दशपर्णी अर्क : महत्त्व आणि उपयोगDasaparni Extract Uses and Importance best 0

Dasaparni Extract Uses and Importance

नमस्कार मित्रांनो , आज आपण जाणून घेणार आहोत कशाप्रकारे दशपर्णी अर्काचे महत्त्व आणि उपयोग आपल्या शेतासाठी फायद्याचे आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया दशपर्णी अर्काचे महत्त्व. अर्काच्या नावात दर्शविल्याप्रमाणे यामध्ये विविध वनस्पतींच्या पानांचा समावेश केला जातो. म्हणूनच याला दशपर्णी अर्क असे संबोधतात. यामध्ये वापर करण्यात येणाऱ्या सर्व वनस्पती शेतात, बांधावर सहज उपलब्ध असल्यामुळे उत्पादन खर्च अगदी नगण्य आहे. प्रत्येक वनस्पतीच्या पानांमध्ये विविध कीडनाशक घटक असल्यामुळे दशपर्णी अर्क विविध प्रकारचे किडींच्या व 34 प्रकारच्या बुरशींच्या नियंत्रणासाठी उपयोगात येते. तसेच किडींमध्ये कीडनाशका विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होऊ देत नाही. दशपर्णी अर्क एक सेंद्रिय अर्क असल्यामुळे ते जैविक पद्धतीने विघटन पावते व त्याच्या कुठलाही दुष्परिणाम करणारा अवशेष जास्त दिवस जमिनीमध्ये आणि पिकामध्ये शिल्लक राहत नाही. याशिवाय मित्र कीटकांना यापासून काही धोका संभवत नाही.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

दशपर्णी अर्क बनवण्याची पद्धत:-

एक प्लास्टिकचा 200 लिटर क्षमता असलेला ड्रम घ्यावा. आणि त्यात पहिल्या दिवशी अर्धा किलो मिरची, अर्धा किलो लसूण, अर्धा किलो आले, आणि 200 ग्रॅम हळद पावडर हे १७० लिटर पाण्यामध्ये मिश्र करावे.
दुसऱ्या दिवशी पाच किलो कडुलिंबाचा पाला, दोन किलो घाणेरी पाला, दोन किलो निरगुडीचा पाला, दोन किलो पपईचा पाला, दोन किलो गुळवेल चा पाला, दोन किलो रुई पाला, दोन किलो लाल कनेर पाला, दोन किलो एरंड पाला, दोन किलो सीताफळ चा पाला, दोन किलो डाळिंबाचा पाला आणि दोन किलो आघाड्याचा पाला आदल्या दिवशीच्या 170 लिटर मिश्रणामध्ये टाकावे.
वरील प्रमाणे दहा प्रकारच्या पानांचे मिश्रण एक महिनाभर आंबवावे. मिश्रण दिवसातून तीन वेळा काठीने ढवळणे आवश्यक आहे.

मिश्रणावर पूर्णपणे आंबवल्यानंतर पांढरा थर तयार होतो. यावेळी मिश्रण तयार झाले असे समजावे. साधारणता एक महिन्यात मिश्रण तयार होते. यावेळी सदर मिश्रण गाळून घ्यावे. हा अर्क साधारणपणे सहा महिन्या पर्यंत फवारणीसाठी वापरता येतो. अर्क सावलीत स्वच्छ व कोरड्या जागी ठेवावा.

Dasaparni Extract Uses and Importance

दशपर्णी अर्काचे उपयोग:-
दशपर्णी अर्कास शेती खूप महत्त्वाचे स्थान आहे. दशपर्णी सगळ्या प्रकारचे किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे. दशपर्णी मधील ग्लिसरीन मुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते. ग्लिसरीन मुळे शेतीचा सामू चांगला होण्यास मदत होते आणि पिकांची जोमाने वाढ होते. तसेच हे नायट्रेट आणि फॉस्फरस प्रमाण वाढवण्याचे काम करते.

दशपर्णी मधून विविध प्रकारची मिनरल्स पिकांना मिळतात. ज्यांच्यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत मिळते. नायट्रेट, सल्फर उदा , लोहा फॉस्फरस इत्यादी डाळिंब बागांमध्ये कॉलिटी वाढवण्यासाठी आणि डाळिंबाला दाट रंग व चकाकी येण्याकरता दशपर्णीचा उपयोग होतो.

दशपर्णीच्या वापरामुळे माईट कीड, अळी, तेल्या, करपा, मर, प्लेग, फ्लावर ड्रॉपिंग इत्यादी रोगावरती नियंत्रित करीता येते. ऊस, भेंडी, कांदा, शेवगा, वांगी, मका, आलं, हळद, भात व अनेक पालेभाज्या यासाठी सेंद्रिय दशपर्णी अर्काचा वापर करावा. पिकांना दर्जेदार बनवण्याची आणि भरघोस उत्पन्न देण्याचे काम हे दशपर्णी अर्क करते.

दशपर्णी अर्काचा वापर:-दशपर्णीचा वापर फळबागांसाठी त्याचे प्रमाण 100 लिटर पाण्यातून दोन ते अडीच लिटर घ्यावे व पालेभाज्यांसाठी प्रति लिटर दोन ते अडीच मिली घ्यावे. आणि दशपर्णीचे दोन ते तीन फवारण्या दर चार ते पाच दिवसांच्या अंतराने कराव्यात..

Dasaparni Extract Uses and Importance

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Leave a Comment