Cultivation Of Tapioca
साबुदाणा लागवड
टॅपिओका ( Tapioca ) हे कंदवर्गीय पीक असून त्याच्या कंदावर प्रक्रिया करून स्टार्च , तसेच साबुदाणा तयार केला जातो. कांदा पासून चिप्स सुद्धा केल्या जातात. मूळ पिके ब्राझील , थायलंड मधील असून सुमारे 50 ते 60 वर्षांपूर्वी आपणाकडे केरळ या राज्यात त्याचे सर्वप्रथम लागवड झाली. तरीसुद्धा खाण्यासाठी म्हणून तामिळनाडू राज्याने याच्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. सध्या संपूर्ण भारतासाठी स्टार्च आणि साबुदाणा हा तमिळनाडू राज्यातून फार मोठ्या प्रमाणावर येतो.
आंध्रप्रदेश तसेच महाराष्ट्र मध्ये स्टार्च आणि साबुदाणा याचा खप फारच मोठ्या प्रमाणावर आहे . महाराष्ट्र मध्ये या पिकाचे उत्पादन तामिळनाडूपेक्षा चांगले होऊ शकते हे प्रयोगांती सिद्ध झालेले आहे . म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली स्टार्च आणि साबुदाण्याची गरज ही जर टापीओका साबुदाणा कंद आपण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पिकवू शकलो तर येथेच प्रक्रिया युनिट स्थापन करून भागवू शकू , यात तीळ मात्र शंका नाही. महाराष्ट्राचे हवामान व पाणी या दोन्ही गोष्टी या पिकासाठी पूरक असून गरज आहे ती फक्त योग्य माहिती घेऊन एकरी जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल व त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहणे.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे जास्त उत्पादनासाठी जेवढी पोकळी जमीन तेवढे जास्तीत जास्त उत्पादन मिळेल . म्हणजेच पोकळीची जमीन या पिकासाठी चांगली . एकदम आवळणाऱ्या जमिनीमध्ये पिकांची झाडे मोठे होतात . परंतु कंद बारीक राहतात . पर्यायाने उत्पादन घटते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा निचरा. पाण्याचा निचरा होऊ शकेल अशी जमीन या पिकासाठी निवडण्यात अत्यंत महत्त्वाचे आहे . जर पाणी साठवून राहिले , तर कंद सोडून जातात . म्हणून निष्रावणारी जमीन अत्यंत आवश्यक आहे.
जी जमिनीची आहे परंतु ज्यामध्ये नत्रांचे प्रमाण जास्त आहे म्हणजे काळी जमिनीमध्ये जर लागवडी वेळी योग्य पोटॅश व सुपर फॉस्फेट ची मात्रा देऊन वर जाणारी वाढ थांबवली . तर अशा जमिनीमध्ये चांगलेच उत्पादन येते. अशा जमिनीस पाण्याच्या पाळ्या थोड्या लांबवणे आवश्यक असते. रेताड गाळाची जमीन , लाल रंग असणारी जमीन तसेच तेलंगी जमिनीमध्ये पीक चांगलेच उत्पन्न देते . मुरमाड जमीन ही या पिकास योग्य असू शकते . फक्त पाण्याचे निचरा होतो , अशी निवडणे आवश्यक आहे.
पूर्व मशागत :-
जमिनीची जेवढी पोकळी अधिक , तेवढे उत्पन्न जास्त. म्हणून जमिनीची खोलवर ट्रॅक्टर नांगरट करणे आवश्यक असते. जमीन चांगली तापू द्यावी. त्यानंतर त्यामध्ये शेणखत किंवा राख , मळी हे उपलब्ध असेल ते टाकून जर रासायनिक खते वापरत असाल तर एकरी सुपर फॉस्फेट 100 किलो व पोटॅश एकरी 100 किलो कोरड्या मातीत टाकणे. तसेच ज्या जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्ये पोटॅश चे प्रमाण वाढवून ते 150 किलो करावे . सेंद्रिय खतांमध्ये वरील फॉस्फेट व पोटॅशचे प्रमाण येऊ शकेल अशी मात्र देणे . माती परीक्षण केलेले असल्यास त्याप्रमाणे ही खताची मात्रा कमी जास्त मात्र देता येते. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास त्याची मात्रा देणे योग्य ठरते. लागवडीसाठी खालील पद्धतीप्रमाणे जमीन तयार करता येते.
अ ) सरी वरंबा :- ही जमीन सपाट आहे व पाणी पिऊ शकते , अशा जमिनीसाठी ही पद्धत योग्य ठरते.
ब ) गादी वाफे :- गादी वाफे तयार करून त्यामध्ये 3 × 3 फूट अंतर ठेवून लागण करता येते.
क ) सारे पद्धत :- उताराच्या जमिनी व पाणी देण्यास अवघड असणाऱ्या जमिनीमध्ये गव्हास सारे सोडतो , त्या पद्धतीने सारे सोडून 3 × 3 फुट अंतरावर लागवड करता येते . सारे सुद्धा आपणास पाणी देण्यास उपयोगी पडतील , अशा मापाचे काढावे. जमिनीच्या चढउतारानुसार पाणी सर्व लोकांना मिळेल , अशा पद्धतीने साऱ्या असावे. पाणी देण्यासाठी योग्य असे पाठ त्यामध्ये घालून घ्यावेत . जमिनीची पूर्व मशागत करतेवेळी जमिनीत पोकळी राहण्यासाठी काही कृत्रिम उपाय करता येत असल्यास ते करण्यास काही अडचण नाही. काही शेतकरी जमीन नांगरटी नंतर पालापाचोळा टाकून कृत्रिम पोकळी निर्माण करतात ते चांगले असते.
Cultivation Of Tapioca
लागवड :-
लागवड करण्यापूर्वी जमिनीस पुरेसे पाणी देऊन म्हणजेच ओलावून नंतर लागवड केली जाते . शक्यतो पाणी दिल्यानंतर दोन तासांनी लागवड सुरू करावी . लागवडीपूर्वी बियाणे शेतावर तयार ठेवावे . बियाण्याच्या बाबतीत पुढील काळजी घ्यावी.
बियाणे :-
साबुदाण्याची बियाणे म्हणून आपणास त्या पिकाचे खोड उपयुक्त असते . सर्वसाधारणपणे सशक्त बियाण्याचे स्टम्पस निवडावेत. बियाणे हे कमीत कमी दहा महिने पूर्ण झालेल्या पिकाचे घ्यावे . त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव नसावा . बियाण्याचे स्टंप साधारणपणे तीन ते सहा फूट लांबीचे असतात . मुळवे पीक काढल्यापासून आठ दिवसांपासून दोन महिन्यांपर्यंत बियाणे उपयुक्त ठरते . मूळ पीक काढल्यानंतर बियाणे सावलीत ठेवणे आवश्यक असते . शक्यतोवर त्यावर पालापाचोळा टाकून झाकावे.
बियाण्यांच्या कांड्या :-
बियाण्यांच्या कांड्या कापताना स्टम्प्सच्या शेंड्या कडील कोवळा भाग म्हणजे शेंड्याकडून जिथे फांद्या फुटलेल्या असतात , येथून 1.5 फूट व बुंध्याकडील तीन ते चार इंच भाग कापून बाद करावा. राहिलेल्या भागाच्या चार ते सहा इंचापर्यंत तुकडे हेकसा ब्लेडने किंवा कटरे करावेत .
हेकसा ब्लेडने व कट्टर ने काप चांगले निघत असून बियाणे घसळत किंवा चिंबळत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पाहणी मध्ये असे आढळून आले आहे की हेक्सा किंवा कटर ने कापलेल्या काड्यांना प्रत्येक झाडास १४ ते १८ कंद हे लागले गेले आहेत. कोयता , कुराड बियाणे कापण्यासाठी अजिबात वापरू नये. ठेवलेल्या कांड्या वापरू नयेत. कारण त्या अपेक्षित उत्पादन देत नाहीत. खंड्या कापल्यानंतर त्या दोन तासात जमिनीमध्ये लावल्या गेल्या पाहिजेत . म्हणजेच लागवड चालू करतेवेळी कांड्या कापायला घ्यावेत. अगोदर कापून निघतो तो भाग लागवडीसाठी उपयोगी असतो. त्यामुळे कांड्या काढल्यापासून त्या दोन तासाच्या आत लावल्या गेल्या पाहिजेत .
कांड्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक भाग सुपर फॉस्फेट , एक भाग गाळची माती , दोन भाग पाणी यांची स्लरी करावी . त्यामध्ये थोडेसे बावीस्टीन टाकून त्यातून कांड्या बुडवून घ्याव्यात . कांड्या काढत असताना त्याची साल किंवा डोळे बाद होऊ देऊ नयेत . अशी कांडी आढळल्यास लागवडीचे वेळी बाद करावी . घसरली किंवा चिंबळली असलेली कांडी लागवडीसाठी घेऊ नये.
हंगाम :-
डिसेंबर पासून मार्चपर्यंतचा हंगाम हा लागवडीसाठी योग्य असून या काळामध्ये केलेल्या लागवडीस एकरी उत्पादन वाढलेले आढळते . त्याचे कारण असे की , या पिकांच्या कंदाची खरी वाढ ही लागवडीपासून पाच ते सहा महिन्यापासून अतिशय जोमाने होते . त्यावेळी पावसाळा असल्यास जमीन पोकळ राहते . त्यामुळे कंदाची पोसण्याची प्रक्रिया ही चांगली होते . तसेच वर्षभर कधीही लागवड केली तरी पीक येऊ शकते , परंतु वरील हंगामात केलेल्या लागवडीस जास्त उत्पादन मिळू शकते . म्हणून लागवड डिसेंबर ते मार्च अखेर करावे.
लागवड पद्धत :-
पूर्वमशागत करून ओल्या मातीमध्ये आकाशाकडे डोळे करून जमिनीत कांडीचा एक ते 1.5 इंच भाग खोचून सरळ उभी करावी दोन कांड्या तील अंतर 3 × 3 फूट असावे. डोळे आकाशाकडे होण अत्यंत गरजेचे असते . उलटे डोळे केल्यास कंद लागत नाही . याची खबरदारी घ्यावी . तसेच खूप खोल कांड्या खोसल्या गेल्यास कंद सरळ उभे जाऊन त्याची जाडी अतिशय कमी होऊन उत्पादनात घट होते . एक ते 1.5 इंच खोचलेल्या कांडिस कंद आडवे जातात व चांगले पोसून एकरी उत्पादनात पर्यायाने वाढ होते . कांड्या खोचत असताना जमिनीत जाणाऱ्या काड्यांच्या खालील भागाची साल बाद किंवा उलटे होऊ नये , म्हणून ओल्या केलेल्या जमिनीत लागण करावी . जमीन ओलसर करावी . जमीन ओलसर केल्याशिवाय लागण करू नये.
पाणी नियोजन :-
लागणीस दिलेल्या पाण्यानंतर तीन ते चार दिवसांनी आंबवणे आणि सात-आठ दिवसांनी तिसरे पाणी दिल्यानंतर जमिनीच्या प्रतवारीनुसार पाण्याची नियोजन केले जाते . काळ्या व पाणी धरणारे जमिनीतील चौथे पाणी तीन यापासून दहाव्या दिवशी पाचवे पाणी चौथ्या पासून बारावी दिवसांनी असे प्रत्येकी पाणी दोन दिवसानंतर वाढवी ते 21 दिवसांपर्यंत दोन्ही पाण्यातील अंतर ठेवावे. नंतर 21 दिवसांनी नियमित पाणी दिले जाते .
मध्यम व लालसर जमिनीमध्ये 15 ते 21 दिवसांच्या अंतराने पाणी देत राहावे. हिवाळ्यात पहिले धूके पडल्यास जमिनीत ओल नसेल तर घाईने पिकास पाणी द्यावे. त्यामुळे पिकाची अकारण भराभर होणारी पानगळ थांबेल . पाणी पिकांमध्ये साठवून देऊ नये. हलके पाणी दिले तरी चालते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास जास्त फायदेशीर . हे पीक एकदा का लागून निघाले की पाण्याचा ताण सहन करू शकते . त्यामुळे कमी पाणी असणाऱ्या ठिकाणीही हे पीक घेता येऊ शकते.
साबुदाणा लागवड
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌