कच्च्या पपईचे आरोग्यदायी फायदे
Best 9 Health Benefits Of Raw Papaya
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कच्च्या पपई पासून आपल्या आरोग्याला कशाप्रकारे फायदा आहे.. पपई हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त फळ आहे हे आपण जाणतोच , पण त्याचबरोबर न पिकलेली किंवा कच्ची पपई देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभकारी आहे. यामध्ये असलेले जीवनसत्वे आपल्याला अनेक रोगानपासून संरक्षण देतात. कच्च्या पपईचे सेवन आपण चटणीच्या रूपात , भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून किंवा सलाड मध्ये वापरून करू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची पपई वरदान ठरते . याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढविण्याचे काम कच्ची पपई करीत असते . कच्च्या पपईमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
अनेक अभ्यासाच्या माध्यमातून हे सिद्ध झाले आहे की कच्च्या पपईचे सेवन नियमित करणाऱ्यांना कोलन किंवा प्रोस्टेटचे कर्करोग होण्याची संभावना कमी असते. पपई मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स , फायटो केमिकल्स आणि फ्ला lवे नाईट्स शरीरामध्ये कर्करोगाच्या कोशिका तयार होण्याला आळा घालतात. कच्ची पपई वजन घटविण्याच्या कामीही सहाय्यक आहे . ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी दररोज भोजनासोबत कच्च्या पपईची सेवन करावे .
याच्या सेवनाने शरीरामध्ये साठलेल्या अतिरिक्त चरबीचा निचरा होतो . कच्च्या पपईचे सेवन करण्यासाठी कच्ची पपई किसून घेऊन तो किस दह्यामध्ये घालून खाल्ला जाऊ शकतो . कच्च्या पपईचे सेवन सॅलड सोबतही केले जाऊ शकते.जर युरीन इन्फेक्शन ची समस्या असेल तर त्यासाठी कच्ची पपई लाभदायक आहे . कच्च्या पपईने इन्फेक्शन रोखले जाऊन ते निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांनाहीआळा बसतो . जर सांधेदुखी सतावट असेल तर ती कमी करण्यासाठी कच्ची पपई लाभकारी आहे . यासाठी दोन लिटर पाणी उकळून घ्यावे .
कच्ची पपई धुवून घेऊन ती चिरावी आणि त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यानंतर पपईची चिरून ती पाण्यामध्ये पाच सात मिनिटे उकळवून घ्यावी . त्यानंतर यामध्ये दोन चमचे ग्रीन टी घालून हे पाणी आणखी थोडा वेळ उकळू द्यावे. त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी थोडे नीऊ द्यावे . निवल्या नंतर हे पाणी गाळून घेऊन एका घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावे . दिवसभर थोडे थोडे करून हे पाणी पीत राहावे.
कच्च्या पपईच्या सेवनाने लिव्हर देखील निरोगी राहते. तसेच ज्या महिला आपल्या नवजात अर्भकांना स्तनपान करवीत असतील त्यांच्यासाठी देखील कच्च्या पपईचे सेवन चांगले आहे. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळतात . तसेच शरीरामध्ये कमी तयार होणाऱ्या एंजाइम्सची तूट भरून काढून आईचे दूध वाढविण्यास कच्ची पपई सहाय्यक आहे.
आरोग्य नामा ऑनलाईन टीम
मलेरिया , डेंग्यू यासारखे आजार सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत . डेंग्यू सारखे आजारात तर प्लेटलेट्स कमी झाल्याने रुग्णाचा जीव धोक्यात येतो . या आजारांवर डॉक्टरांचे उपाय सुरू असतानाच काही घरगुती उपाय केल्यास चांगला फरक दिसून येतो . डेंग्यू , मलेरिया , हार्ट अटॅक , डायबिटीस , डेंग्यू आणि कॅन्सर यासारखे आजारात पपईच्या पानांचा रस लाभदायी ठरतो . पपईच्या पानांमध्ये डेंगूचा प्रभाव कमी करण्याची क्षमता असते . यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते . इन्फेक्शन पासून बचाव होतो
Best 9 Health Benefits Of Raw Papaya
पपईच्या पानांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात :-
१) प्लेटलेट वाढतात :-
पपईच्या पानांचा रस प्याल्याने शरीरातील प्लेटलेट्स आणि आरसीबी काउंट वाढतो . ब्लड सर्क्युलेशनही वाढते. डेंग्यूच्या रुग्णांना पपईच्या पानांचा रस घ्यावा.
२) कॅन्सर :-
पपईच्या पानांच्या रसामध्ये अँटी ट्यूमर गुणधर्म भरपूर असल्याने कॅन्सरचे काही प्रकार , विविध प्रकारचे एलर्जीपासून बचाव होता.
३) रोगप्रतिकारक शक्ती :-
पपईच्या पानांच्या रसात अँटिऑक्सिडंट भरपूर असल्याने याचा ज्यूस प्यायल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि किडनी , लिव्हर आणि पोटाचे समस्या दूर करण्यासाठी मदत होते.
४) बद्धकोष्ठता मूळव्याध :-
पपई लक्सेटिव्ह असल्याने बद्धकोष्ठता दूर होते . पानांचा रस प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होतात . शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होते . पपईमध्ये विटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो . रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृदयविकाराचा धोका संभवतो. वजन घटण्यास मदत होते . एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नेहमी समावेश करा पपईतील डायट्री फायबर्समुळे वेळीअवेळी लागणारे भुकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
याशिवाय कच्ची पपईचे आणखी कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या
रोगप्रतिकारक शक्ती वाढते – आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे . तसेच शरीरातील विटामिन सी च्या गरजेपेक्षा दोनशे टक्के अधिक विटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.
मधुमेहसाठी गुणकारी – पपई चवीला गोड असली तरी त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपई च्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. त्यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे . तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते – पपई मध्ये विटामिन ए मुबलक प्रमाणात आढळते . डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी विटामिन ए अत्यंत गरजेचे आहे . वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता असते . या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहाराचा समावेश करावा.
सांधेदुखी पासून आराम मिळतो – पपईमध्ये विटामिन सी प्रमाणेच वेदना शामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील विटामिन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.
पचन सुधारते :- आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे काहीसे कठीण आहे . त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्यता असते . अशावेळी पपई खाल्ल्याने , अरबट चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाइम पचन कार्य सुधारते.
मासिक पाळीचा त्रास कमी होतो – अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपलब्ध आहे.
कर्करोगापासून बचाव होतो – पपई मधील अँटॉक्सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडिकल्स पासून तुमचा बचाव करते . तसेच पपईतील विटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.
ताण तणाव कमी होतो -; दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपई चे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच विटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.
हृदयाचे आरोग्य: हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांची भरपूरता असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
अँटी-इन्फ्लेमेटरी गुण: कच्च्या पपईमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने ती विविध प्रकारच्या सूज कमी करण्यास मदत करते.
कच्च्या पपईचे सेवन विविध पद्धतींनी करता येते, जसे की सलाड, स्मूदी, किंवा चटणीमध्ये.
पपई आपल्या तब्येतीसाठी चांगला मानला जातो. तुम्ही कच्ची किंवा पिकलेली अशा दोन्ही प्रकारचे पपई खाऊ शकता. पपई खाल्ल्याने शरीराशी संबंधित बरेच गंभीर आजार बरे होतात. महिलांनीही कच्च्या पपईचा आहारात समावेश करावा. यामुळे मासिक पाळीच्या त्रासात आराम मिळतो.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌