सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनाचे होणारे फायदे 9Benefits Of Organic Vegetable Production best

 Benefits Of Organic Vegetable Production

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनाचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो. भाजीपाला हा नाशवंत असल्यामुळे जास्त काळ साठविता येत नाही म्हणून त्याचा वापर त्वरित करावा लागतो. कीडनाशके वापरल्यानंतर आठ ते दहा दिवस भाजीपाल्याची विक्रीसाठी काढणी करू नये अशा सूचना दिल्या असल्या तरी त्या कितपत पाळल्या जातात हे सांगता येत नाही. सेंद्रिय खतांचा आणि जैविक तथा वनस्पती जन्य रोग किडनाशक औषधांचा वापर करून केलेल्या शेती पद्धतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. भाजीपाला लागवडी मध्ये रासायनिक खतांचा , कीडनाशकांचा आणि रोगनाशक औषधांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या अति वापरामुळे निसर्गातील मूलभूत साधन संपत्तीच्या घटकांवर तसेच उत्पादित मालाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे रोगनाशके व कीडनाशके यांचे पिकांवरील अतिवापरामुळे मानवी जीवनावर त्यांचे विपरीत परिणाम होतात.

सेंद्रिय शेती पद्धतीत खालील बाबींवर विशेष लक्ष दिले जाते.

कृषी आणि तत्सम उत्पादनावर आधारित उद्योगांमधून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांच्या अधिकाधिक व कार्यक्षम पद्धतीने त्यापासून सेंद्रिय खत तयार करून वापर करणे.
शेतातील काडीकचरा, तन, जनावरांचे मलमूत्र, वनस्पती औषध इत्यादी कुजवून किंवा त्यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत, निर्माण करून रासायनिक खतांऐवजी किंवा त्यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा अधिक वापर करणे.
डाळ वर्गीय पिकांचा वापर करून हिरवळीच्या खताचा वापर ही सेंद्रिय खत म्हणून वापर करणे.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

Benefits Of Organic Vegetable Production

सेंद्रिय खतामुळे पिकांना लागणारे पोषक अन्नद्रव्य सोबतच जमिनीचा कस व जलधारण शक्ती वाढते. जमीन भुसबुशीत राहून हवा ही खेळती राहते. शिवाय या सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यासही मदत होते.

जिवाणू संवर्धके:-

एकदल पिकांना अझाटोबॅक्टर जिवाणूखत आणि कडधान्य पिकांसाठी रायझोबियम जिवाणू खत बियाणे लावतात. हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन साठवतात व नंतर तो पिकांना उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकांची बियाण्यावर प्रक्रिया करून किंवा वनस्पतींच्या मुळाशी ते शेणखतामध्ये मिसळून देतात. हे जिवाणू जमिनीतील स्थिर झालेल्या विद्राव्य स्फुरदाचे विघटन करून तो विरघळवून पिकास उपलब्ध करून देतात.

Benefits Of Organic Vegetable Production

मित्र कीटकांचा किंवा जिवाणूंचा वापर:-

परोपजीवी किंवा परभक्षी किडी या किडी पिकांचे नुकसान करणाऱ्या किडींवर आपली उपजीविका करतात. या जैविक घटका ंचा वापर करून काही भयानकिडींचा बंदोबस्त करता येतो.

उदाहरणार्थ क्रायसोपा आणि लेडी बर्ड बीटल ही कीड मावा, तुडतुडे, फुल किडे, पांढरी माशी, पतंग वर्गीय कीटकांची अंडी आणि अळ्यांचा नाश करतात. हिरव्या आळी साठी याचा व्यापारी तत्वावर वापर होत आहे. घाटे अळी विषाणू एचएनपीव्ही तर काळ्या आईच्या नियंत्रणास एसएनपीव्ही वापरतात. ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर पिकांच्या मुळावरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी केला जात आहे. याशिवाय निंबोळी अर्काचा वापर कीड रोग नियंत्रणासाठी करतात. सध्या जिवाणू औषध बेसिलस थूरि जीएनसीस या जिवाणूंचा फवारा बोंड अळी, भेंडी व टोमॅटो वरील फळे पोकळणाऱ्या आळ्या साठी होतो. शेतात कमी काडीकचरा, तन ठेवल्यामुळे किडींची संख्या कमी करण्यास मदत होते. शक्य त्या पिकांमध्ये शिफारस केलेल्या रोग कीड प्रतिबंधक जातींचा वापर केल्यास कीड व रोग नियंत्रण ठेवता येते.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Leave a Comment