कॅल्शियम गोळ्या न खाता शेवगा सेवन करावा : Best 7 Benefits Of Drumsticks

Benefits Of Drumsticks

कॅल्शियम गोळ्या न खाता शेवगा सेवन करावा

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेवगाच्या शेंगा कशाप्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. शेवगा, सांधेदुखी व कॅल्शियम आणि भारतीय शेती. भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्सपोर्ट झाले तर त्यासाठी समुद्रातील शिंपूयांचे कॅल्शियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्या गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत. तर जनावरांचे कॅल्शियम कमी झाल्याने त्यांचे आरोग्याचे समस्या ही वाढलेल्या आहेत. दुधाची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे लहान मुलांची दात किडून जाताना दिसत आहेत.

आज बाजारात शेतकरी 25 ते 35 रुपये किलोने शेवगा विकत आहे. तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर ते पुढे शेवग्याची पीक घेणे थांबवतील. मग हाच शेवगा इसराइल मधून भारतात दीडशे ते दोनशे रुपये किलोने येईल व तेव्हा तो रांगा लावून आपल्याला घ्यावा लागेल. महिलांनी त्यांचे सुगरणीचे गुण उपयोगात आणून शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना द्यावे तसेच त्याचे सूप तयार करून द्यावे. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे. शेवग्याची शेंग , भाजी , सूप शेवग्याचे सरबत करून ते फ्रीजमध्ये थंड करून सरबत करून द्यावे. शेवग्याची चटणी, शेवगा सूप , शेवग्याचे पराठे, पापड अशा नाना गोष्टी करता येतील. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

Benefits Of Drumsticks

महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व स्वतःच्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करावे. ज्या शेतकऱ्याकडे जनावरे आहेत त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची रोज 250 ते 500 ग्रॅम भूकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचवावी. स्वतःसाठी सुद्धा ते सकस दूध वापरावे व इतरांना देखील तसे सांगून पाच रुपये ज्यादा दराने विकावे. शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी ही शेतकऱ्यांची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे.

निसर्ग उपचारात शेवग्याचे फार मोठे महत्त्व आहे. त्यापासून गाजराच्या दहा पट अ जीवनसत्त्व मिळते.
– दुधाच्या 17 पट कॅल्शियम मिळते.
– केळ्यांच्या 15 पट पोटॅशियम मिळते.
– पालकाच्या 25 पट लोह व दह्याच्या 9 पट प्रोटीन मिळते.

अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पाडून घेऊ नये व शेतकऱ्यांनी पण हे पीक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्त्व म्हणून त्याचा विचार करावा. यासाठी मोफत मार्गदर्शन हवे असल्यास याबद्दल बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन मिळू शकते. शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शीजऊन घेऊन त्याचा गर काढून तो वाळवता देखील येतो. हे ऑरगॅनिक कॅल्शियम पचनास चांगले असते. जास्त पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्शियम मिळते. मात्र ते सावलीत वाळवून ठेवावे लागते.

एक्सपोर्ट चे कारण : पाश्चात्य देशात जंक फूड मुळे हाडांचे विकार वयाच्या पंधराव्यापासूनच दिसत आहेत.
हाडांचे झिजणे , कॅल्शियमच्या कमतरता रोखण्यासाठी तेथे शेवग्याचा वापर चालू झाला आहे.

Benefits Of Drumsticks

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Leave a Comment