Benefits of bacterial slurry
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे आपल्या पिकांसाठी जिवाणू स्लरी फायदेशीर आहेत. सध्या कोणत्याही पिकांचा विचार केला तरी त्या पिकांना स्लरी ही नवीन पद्धत खूप फायदेशीर ठरत आहे. परंतु शेतकरी अजूनही स्लरीचा पाहिजे तितका उपयोग करत नाहीत. स्लरीचा उपयोगितेचा विचार केला तर स्लरी शेतात वापरल्याने जमिनीमधील सूक्ष्म जीवाणू कार्यान्वित होतात. जिवाणूमुळे जमिनीमधील अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होते. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर आपण जेव्हा जमिनीमध्ये युरिया टाकतो तेव्हा तो अमोनिकल स्वरूपात असतो व तो पीक घेऊ शकत नाही. त्या अमोनिकल स्वरूपाची रूपांतर नायट्रेट मध्ये करण्याचे काम नायट्रो सोमोनास बॅक्टेरिया करतात. या लेखात आपण स्लरीचा एक प्रकार म्हणजे जिवाणू स्लरीचे फायदे आणि कशी बनवायची हे जाणून घेऊ.
जिवाणू स्लरी म्हणजे काय व तिचे फायदे:-
नत्रयुक्त जिवाणू स्लरीमुळे हवेतील अन्न शोषले जाऊन ते पिकांना फायदेशीर ठरते. जिवाणूस्लरीमुळे अति द्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते. सेंद्रिय पदार्थांची जलद विघटन क्षमता वाढते. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. पिकांची जोरदार वाढ होऊन व रोगप्रतिकारक क्षमता वाढते. जमिनीचा पोत सुधारतो. रासायनिक खतांवरील खर्चात कपात होते. हे जिवाणू नैसर्गिक आहेत म्हणून त्याचा जमिनीवर व पिकांवर जास्त मात्रेने दुष्परिणाम होत नाहीत.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
Benefits of bacterial slurry
ताजे शेण 20 किलो, गावरान गाईचे गोमूत्र दहा लिटर, काळा गूळ दोन किलो, अझाटोबॅक्टर 500 ग्रॅम, पोटॅश मोबिलीझर 500 ग्रॅम, इतर जैविक बुरशीनाशक एक किलो आणि 200 ते 250 लिटर पाणी , सिमेंटचे टाकीत टाकून चांगल्या प्रकारे मिसळावे. वरील सर्व स्लरी द्रावण पाच ते सहा दिवस ठेवावे. दररोज सकाळी दोन मिनिटे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. त्यानंतर सातव्या दिवशी वापस सावरून जमिनीतून पिकाला आळवणी करावी.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌