कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर : Application of Artificial Intelligence in Agriculture Best 9

Application of Artificial Intelligence in Agriculture

कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला दिसून येत आहे. जगभरात शेती , आहार आणि आरोग्य बाबत जागृती होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पोषण युक्त अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी योग्य वेळी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असते त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची मदत महत्त्वाची ठरत आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शेतकऱ्याचे नुकसान कमी करण्यासाठी ते उत्पादन वाढविण्यासाठी स्मार्ट प्रणाली विकसित करण्यापर्यंत संशोधन देश-विदेशात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत .

एखादी गोष्ट किंवा वस्तू स्मार्ट होण्यासाठी तिच्यामध्ये नुसती शक्तिशाली प्रणाली अथवा टेक्नॉलॉजी असणे पुरेसे नसते तर ती वस्तू एखाद्या संगणकाला जोडली जाण्याची क्षमता त्या वस्तूमध्ये असणे आवश्यक असते. आपल्याला प्रश्न पडला असेल की असे कस काय शक्य आहे तर हो असे अनेक उदाहरणे आपल्या जीवनात दिसून येतात जसे की स्मार्ट घड्याळ मध्ये आपण आपल्या कॅलरीज मोजतो . मोबाईल द्वारे शेकडोमाईल अंतरावरून आपल्या घर लॉक करू शकतो हे सगळे कशामुळे करू शकतो तर आयओटीने म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स व कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे .

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

कृषी क्षेत्रात आय. ओ. टी. चा वापर :-

सन 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या जवळपास 9 अब्ज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अन्नपदार्थाची मागणी साहजिकच वाढणार आहे . वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी कृषी क्षेत्रातील उत्पादन जवळपास 70 टक्के वाढविण्याची आवश्यकता असून फक्त दहा टक्के शेतीसाठी न वापरलेली जमीन व सध्या वापरात असलेल्या 90% शेती योग्य जमिनीतून ही गरज पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी नवनवीन संशोधन , उपकरणे वापरण्याची गरज आहे. पारंपारिक शेतीमध्ये अधिक उत्पन्न घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च तसेच शक्ती पणाला लागते आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन वापरात आणण्याची आवश्यकता आहे .

आय ओ टी तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करण्यात आला तर आपण कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणू शकतो. या संशोधनाद्वारे शेती उत्पादन वाढू शकते तसेच गुणवत्ता सुधारून शेतकऱ्यांना उत्पादनासाठी अधिक चांगला भाव मिळू शकतो . आपण कृषी क्षेत्रात तीन प्रकारे या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो.

१) ड्रोन
२) रोबोट
३) रिमोट सेन्सर्स
४) कॉम्प्युटर इमेजिंग.

१) ड्रोन :-

ड्रोन शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे . सेन्सर व कॅमेऱ्याने सुसज्ज असा ड्रोन शेतीमधील फोटो मोजमाप व सर्वेक्षण अशी कामे करतो. यात जमिनीवरील तसेच हवेतील असे दोन प्रकारचे ड्रोन वापरतात . चाके असणारे ड्रोन हे जमिनीवर काम करतात. हवेतील ड्रोन हे मानव रहित हवाई वाहने अथवा मानव रहित विमान प्रणाली वर आधारित आहे. हे ड्रॉन्स जीपीएस व सेंसरद्वारे नियंत्रित केले जातात. ड्रोन्स द्वारे नोंद केलेल्या माहितीवरून पिकांचे आरोग्य , सिंचन , फवारणी , पिकांची लागवड , मातीचे संरक्षण , झाडांची मोजणी , शेतीची मोजणी , उत्पन्नाचा अंदाज इत्यादी गोष्टी शक्य होतात.

२) रोबोट :-

18 व्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला . त्यामुळे कामे अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आणि अधिक उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित होऊ लागले . त्यावेळी ते प्राथमिक स्तरावर होते . आता 2024 मध्ये तर तांत्रिक प्रगतीने परमावधी गाठले . कृषी क्षेत्रासह जगभरातील इतर उत्पादनांची वाढती मागणी आणि कुशल कामगारांची कमतरता यामुळे रोबोट संशोधित झाले . कृषी क्षेत्रात अग्रीबॅट्स शेतकऱ्यांचे लक्ष वेधू लागले आहेत . आपण अद्याप रोबोटिक्स क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहोत . अजूनही अनेक संशोधने चाचणीच्या स्तरावर आहेत.

३) पीक उत्पादन काढणी रोबोट :-

कुशल कामगारांची कमतरतेची समस्या हार्वेस्टिंग रोबोट्समुळे सोडविण्यात येत आहे. फळे आणि भाज्या निवडण्याच्या नाजूक प्रक्रियेत हे रोबोट न थक्ता अगदी आठवड्याचे सात दिवस 24 तास काम करू शकतात. प्रतिमा प्रक्रिया व रोबोट यांचा संयुक्त वापर करून अचूक व गुणवत्तापूर्ण फळे व भाज्या यांची निवड करणे सफल झाली आहे . या रोबोट्स चा खर्च अधिक असल्याकारणाने फक्त उच्च किंमत असलेल्या सफरचंदासारख्या पिकांसाठी याचा वापर केला जात आहे . परंतु आता टोमॅटो , स्ट्रॉबेरी तसेच ग्रीन हाऊस मधील पिकांची अवस्था व पिकांची योग्य वेळ यांच्या पडताळणीसाठी याचा वापर होत आहे.

४) ताण व किड नियंत्रण :-

हे स्मार्ट रोबोट प्रतिमा घेऊन त्यावर असणारे तन अथवा किडींवर फवारणी करण्यासाठी वापरले जातात यामध्ये इमेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी वापरली असून शेतामध्ये काढलेले फोटो आणि संगणकांमधील डेटाबेस मध्ये असलेले फोटो प्रोसेस करून त्यावर उपाययोजना करतात . अतिशय सुधारित पद्धतीने व नियंत्रित औषधांची फवारणी केल्यामुळे होणारा अतिरिक्त खर्च अवाक्यात येऊ शकतो.

५) साहित्य हाताळणी :-

या प्रकारची रोबोट मजुरांप्रमाणे साहित्य हाताळणीचे काम करू शकतात जसे जड सहित्य उचलणे , दोन झाडांमध्ये अचूक अंतर ठेवून लावणी करणे , यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते आणि उत्पादन खर्च कमी होतो.

६) उपकरणे नियंत्रण :-

खेळण्यातील रिमोट कंट्रोल कार आपण ज्या प्रकारे एका ठिकाणी बसून नियंत्रित करतो अगदी त्याचप्रमाणे आपण ट्रॅक्टर व तत्साम उकरणे मशीन रोबोटच्या सहाय्याने नियंत्रित करू शकतो. जीपीएस च्या माध्यमातून कार्यरत होणारे हे एकात्मिक स्वयंचलित उपकरणातून अचूक व स्व नियंत्रित काम अगदी सुलभपणे करते. या उपकरणाची काम करण्याची पद्धत , हालचाल व कामाची प्रगती स्मार्ट फोनवरून नियंत्रित करू शकतो अथवा पाहू शकतो. मशीन लर्निंग या टेक्नॉलॉजी वर आधारित उपकरणे कामांमध्ये येणारे अडथळे ओळखून स्वयंचलित पद्धतीने काम पूर्ण करतात.

७) कृषी संशोधनात वापर :-

कॉर्नर विद्यापीठातील तज्ञांनी एक संशोधन प्रसिद्ध केले यामध्ये असे नोंदविण्यात आले होते की , शेतीमध्ये बसविलेले सेंसर आणि संगणक प्रणालीमुळे साबुकंद या पिकावरील ठिपक्याच्या रोगाचे निदान 98% खरे ठरले . एका रोबोटिक कंपनीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून तण नियंत्रण आणि फळांची काढणी करणाऱ्या रोबो निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे . एक कंपनी संत्रा फळे तोडणारा रोबो तयार करीत आहे . यातून निश्चितपणे मजूर टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे . रोबोच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनातील इतर माहिती गोळा करणे शक्य होणार आहे.

८) स्वयंचलित सिंचन यंत्रणा :-

अनेक ठिकाणी काही भागातील जमीन क्षारपड होत्या . जमिनीतून चांगलं पीक येत नसल्यामुळे शेतकरी हवालदार झाले होते . मात्र स्वयंचलित वायरलेस ठिबक सिंचन योजना अंमलात आली आणि शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला . प्रत्येक वेळी पाणी चालू करण्यासाठी शेतावर जाण्याची गरज उरले नाही . स्वयंचलित ठिबक यंत्रणा सुरू झाली की शेतकऱ्याचे मोबाईल वर मेसेज येतो . दररोज हे वेळापत्रक तयार करून ईमेल द्वारे पाठविण्यात येतात . यामुळे शेतीला आवश्यक तेवढे पाणी मिळण्यास मदत होते.

९) रिमोट सेन्सर्स :-

आय ओटीवर आधारित असणारे रिमोट सेंसर शेतात अथवा हवामान केंद्रामध्ये बसवलेले असतात . त्याद्वारे गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून अंदाज नोंदवले जातात . सेंसर हे अतिशय संवेदनशील यंत्रणा असते . शेतकरी संसरद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करून पिकांचे परीक्षण व संरक्षणात्मक उपाययोजना वेळेत करू शकतात.

१०) रिमोट सेंसर चे उपयोग :-

अ ) पिक देखरेख :-

शेतात ठेवलेले सेन्सर्स प्रकाश , आर्द्रता , तापमान , पर्जन्य , आकार व पिकांमध्ये होणारे बदल नोंदवून शेतकऱ्यांना सुचित करतात यामुळे पिकांवर होणारा रोगांचा प्रसार रोखता येतो आणि पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवता येते.

ब) हवामान अंदाज :-

आर्द्रता , तापमान , जमिनीतील ओलावा , दव यासाठी शेतात ठेवलेले सेन्सर द्वारे माहिती गोळा करून हवामानाचा अंदाज ठरवण्यासाठी मदत होऊन पिकांची योग्य काळजी घेण्यास मदत होते.

क ) मातीची गुणवत्ता :-

मातीच्या गुणवत्तेच्या विश्लेषणामुळे पोषणमूल्य , खारफुटीचे क्षेत्र , कोरडे क्षेत्र , पाणी निचरा करण्यासाठी क्षमता किंवा क्षरांचे प्रमाण समजण्यास मदत होते. या माहितीमुळे संचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण आणि पीक लागवडीचे नियोजन करण्यास मदत होते.

ड ) कॉम्प्युटर इमेजिंग :-

यामध्ये शेताच्या वेगवेगळ्या ठिकाणी सेंसर कॅमेरे लावून फोटोद्वारे माहिती गोळा केले जाते . डिजिटल इमेज प्रोसेसिंग हा एक संगणकीय अल्कोरिदम असून आपण संगणकास दिलेल्या प्रतिमेवर प्रक्रीया करून माहिती गोळा केली जाते. या प्रक्रियेमध्ये फोटो काढले जातात. व त्याची तुलना करून त्यातून नमुने नोंदविले जातात . मिळालेले माहितीचे आधारे शेती व्यवस्थापन करणे सुरू होते.

ई) गुणवत्ता नियंत्रण निवड आणि श्रेणी :-

मशीन लर्निंग व इमेज प्रोसेसिंग याद्वारे एकत्रित केलेल्या माहिती द्वारे पिकांचा आकार , रंग , वाढ निश्चित करून पिकांची गुणवत्ता नियंत्रित करता येते. उत्पादनाचा आकार , रंगानुसार निवड व वर्गवारी करण्यास संगणक इमेजिंग चा उपयोग होतो. मराठा कृषी प्रधान देश आहे . देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे तसेच जवळपास 25% जीडीपी हा शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या क्षेत्रातून येतो. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा मोलाचा वाटा आहे.

21व्या शतकात ग्लोबलायझेशन आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होऊ शकते . इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारताचे विकासासाठी महत्त्वाचा आधार 100 करू शकते. त्यामुळे जागतिक स्तरावरील नामवंत आयटी कंपन्या तसेच प्रसार माध्यमांनाही भारतीय कृषी क्षेत्राकर्षित करत आहे. आणि आयटी च्या युगात या माध्यमांमध्ये खूप मोठे फेरबदल होत आहेत. कृषी क्षेत्रात होणारे संशोधन , योजना विस्तारीकरण यामध्ये राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील पारंपारिक वृत्तवाहिन्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Application of Artificial Intelligence in Agriculture

Leave a Comment