उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्याल Animal Management In Summer Best 8 points

Animal Management In Summer

नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळा सुरू झाल्यानंतर तापमान वाढीचा फटका माणसांसहित जनावरांना देखील बसत असतो. तापमान वाढीचा परिणाम गाई, म्हशींच्या कार्यक्षमता, प्रजनन, उत्पादकता व आरोग्यावर होत असतो. तापमान वाढीमुळे जनावरांच्या श्वासनाचा वेग वाढू लागतो. ते प्रति मिनिट 27 ते 30 वेळा श्वासोच्छवास घ्यायला लागतात. तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास संकरित जनावरांच्या खाण्याचे प्रमाण कमी होते.          जनावरांच्या मेंदूत असलेल्या hypothalamus भागांमध्ये हिट गेन (heat gain) व हीट लॉस (heat loss) अशी दोन केंद्र असतात. तापमान 40 – 41 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास जनावरांचा श्वासनाचा वेग आणखी वाढतो. तोंड उघडे ठेवून जनावर धाप घेऊ लागतात. म्हशी मध्ये गाईंच्या तुलनेत घामग्रंथींची संख्या कमी असते. त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास अधिक होतो.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

Animal Management In Summer

जनावरांची काळजी कशी घ्याल :-
1) गोठा मुक्त हवेशीर असावा व जनावरांची संख्या कमी असावी. प्रकार सूर्य प्रकाश पासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठ्यास चांगले छत असावे.

2) जनावरांना शक्यतो थंड जागी बांधावे तसेच उन्हापासून व उष्ण वाऱ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून त्याच्या भोवताली झाडे लावावी.

3) उन्हाळ्यात जनावरांना शक्यतो पुरेसे पाणी मिळत नाही व जनावरे तहाणलेली राहतात. त्याकरता जनावरांना दिवसातून पाच ते सहा वेळा मुबलक प्रमाणात पाणी पाजावे.

4) रात्री व सकाळी दूध काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर जनावरांना पाणी पाजावे. एक लिटर दुधासाठी साधारणपणे तीन लिटर पाण्याची आवश्यकता असते. जनावरांना दिवसाला 90 ते 100 लिटर पाण्याची गरज असते. तसेच दूध काढण्यापूर्वी जनावरांना थंड पाण्याने धुवावे.

5) उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाळलेला चारा कमी करून हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे. हिरवा चारा नसेल तर आहारात खुराकाचे प्रमाण वाढवावे.

6) क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी 20 ते 30 ग्रॅम क्षार मिश्रण चारातून द्यावीत.

7) सन ट्रोक, हिट ट्रोक यासाठी बऱ्याच वेळी घरगुती उपचार केल्यासही चांगला फायदा होतो.

8) पाण्यात बर्फ टाकून त्या थंड पाण्याने रोगी जनावर वारंवार किंवा थंड पाण्याचा गोणपाठ किंवा कापड भिजवून अंगावर ठेवावे. यामुळे कातडीच्या            खालील नसा आकुंचन पावतील व जनावरांचे उष्माघातापासून संरक्षण होईल.

9) शक्य असल्यास पंख्याची सोय ठेवावी. रोगी जनावर थंड व मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी बांधावे.

10) 50 मिली कांद्याचा रस त्यामध्ये दहा ग्रॅम जिऱ्याची पूड आणि 50 ग्रॅम खडीसाखर मिसळून पाजावे.

11) मीठ आणि साखर पाण्यात मिसळून पाजल्यास सनस्त्रोक हिट स्ट्रोक यासाठी चांगला फायदा होतो.

 उन्हापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी काही पशुपालक फॉगर चा वापर करतात. त्याचबरोबर मित्रांनो स्पिंकलर किंवा फॉगर जर आपण मोठ्या मध्ये लावले आणि तिथे जर फॅन नसेल हवा येण्या-जाण्याची जर तिथे जागा नसेल खिडक्या नसेल आणि तिथे चांगलं नसेल तर मित्रांनो गोठ्यामध्ये दमटपणा वाढून आपल्या जनावरांना त्रास होऊ शकतो. तर मित्रांनो फॉगर लावताना ध्यानात घ्या आपल्या शेडची हाईट किमान नऊ फूट पाहिजे आणि 9 फुटावर जरी फॉगर लावले तरी त्याचे थेंब इतके छोटे पाहिजे आणि ते फक्त एक ते दीड मिनिटांसाठी फॉगर सुरू झाले पाहिजे. जनावराच्या पाठीवर हे कण पोहोचले नाही पाहिजे आणि त्यावेळेस गोठ्यामध्ये आडवे फॅन चालू पाहिजे , उभे नाही. गोठ्यात आडवे फॅन चालू पाहिजे जेणेकरून थंड झालेली जी हवा आहे ती गोठ्यामध्ये पसरेल आणि जी बाष्पीभवन झालेले आहेत ते सुद्धा बाहेर निघून जाईल. अशा रीतीने गोठ्यामध्ये दमटपणा कमी होईल. स्प्रिंकलर बसवण्यासाठी एक ते दीड मिनिटे सुरू असावेत आणि त्याच्यानंतर ते पाणी जनावरांच्या पाठीवर पडले पाहिजे. जनावरांची पाठ ओली झाली पाहिजे परंतु त्यांच्या पाठीवरून पाणी उतरून पायापर्यंत गेला पाहिजे. अशाप्रकारे फॉगरचे पाणी जनावरांच्या अंगावर पडलं नाही पाहिजे आणि स्प्रिंकलरच पाणी जनावरांच्या अंगावर पडून पायापर्यंत आलं पाहिजे.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Animal Management In Summer

Leave a Comment