Akatmik Annadravya Vyavasthapan
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन विषयावर म्हणजेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर माहिती घेणार आहोत. एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा पद्धतीमध्ये प्रामुख्याने रासायनिक खतासोबत सेंद्रिय खते , हिरवळीची खते , जैविक खते , नत्रयुक्त हरीत शैवाल द्रव्य , झाडांची पाने , सेंद्रिय पदार्थ जसे शेतातील काडी कचरा , धसकटे , मुळे पालापाचोळा व इतर पदार्थांच्या पूर्ण चक्रीकरणातून मिळणाऱ्या खताचा फेरपालटीत समावेश करून जमिनीची सुपीकता टिकवली जाते.
कृषी संलग्न उद्योगधंदे व इतर उद्योगातील टाकाऊ पदार्थाचा सुयोग्य वापर या पद्धतीत केला जातो. जीवतंत्रज्ञानावर आधारित गांडूळ खताचा समावेश मापक प्रमाणात या तंत्रात करता येतो. या पद्धतीतील मूलभूत तंत्रज्ञान म्हणजे मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि सेंद्रिय किमती भरमसाठ वाढलेले आहेत. हे लक्षात घेऊन यांचा समन्वय आणि एकमेकांना पूरक गुणधर्मामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. जमिनीचे आरोग्य सुधारणा होते . त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता दीर्घकाट टिकून राहण्यास मदत होते व पर्यायाने अन्नधान्य उत्पादनात सातत्य राखण्यास मदत होते.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक खालील प्रमाणे आहेत :-
१) सेंद्रिय खते :-
एकात्मिक खत पुरवठा पद्धतीत रासायनिक खता नंतर सेंद्रिय खतांना महत्त्व दिले जाते . सेंद्रिय खतांच्या वापरामध्ये प्रामुख्याने शेणखत , शहरी आणि ग्रामीण कंपोस्ट , गोबर गॅस मळी , शेणमुत्र काला , तेलबिया पेंड हाडाचे खत , रक्ताचे खत , सोन खत मलमुत्रापासून मिळणारे खत इत्यादी चा वापर करता येतो. याशिवाय कृषी व पूरक उद्योगातून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ यांचा वापर यामध्ये करता येतो . शेणखत आणि प्रेसमळ यामध्ये गंधक , लोह , जस्त , तांबे , मॅग्नीज इत्यादी अन्नद्रव्य कमी अधिक प्रमाणात उपलब्ध असतात . हे सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये टाकले असता खनीजीकरणाची प्रक्रिया सूक्ष्म जीवाणूद्वारे होऊन विघटन होते आणि सेंद्रिय पदार्थाचे विघटनातून ह्युमस सारखे जमीन दुरुस्ती / सुधारणा द्रव्य मिळतात.
तसेच ऑक्सिजन , इंडोल ऍसिड संप्रेरके निर्माण करण्याची क्षमता सेंद्रिय द्रव्यत आहे . म्हणून सेंद्रिय खतांना पिकांचे पूर्ण अन्न म्हटले जाते . याशिवाय जमिनीचे जैविक शक्ती संपदेला बळ मिळते . सूक्ष्मजीवाणूची लक्षनीय वाढ होते . मातीची धूप थांबते .हवा खेळती राहून जमिनीचे तापमान योग्य राखले जाते आणि जमिनीचा पोत आणि जडणघडण इत्यादीवर अनुकूल परिणाम होतो. जीव रसायन क्रियांचा समतोल राखला जाऊन जमिनीची चिरस्तायी उत्पादकता टिकवण्यास सेंद्रिय खते परिणामकारकपणे कार्य करतात . एकात्मिक अन्नपुरवठा पद्धतीमध्ये सेंद्रिय खतांचा सहयोग 20 ते 40 टक्क्यांपर्यंत होऊ शकतो.
२) हिरवळीच्या खतांची पिके :-
बरु व धैच्या सारखी हिरवळीच्या खताचा पुरवठा करणरी पिके एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीत घेता येतात. तीन वर्षातून एकदा घेऊन ती जमिनीमध्ये गाडली जातात. त्यामुळे जमिनीला सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा होतो . ताग जमिनीत 75 ते 100 किलो नत्र पुरवते तर धैचा हेक्टरी 125 ते 150 किलो नत्र पुरवते. याशिवाय गिरीपुष्प , सुभाभूळ यासारख्या हिरवळीच्या खतांच्या पिकांची पाने व फांद्या जमिनीत गाढून सेंद्रिय द्रव्यांच पुरवठा केला जातो . गिरीपुष्पाच्या वाळलेल्या पानात 2.73% नत्र असते . यापासून चांगल्या दर्जाचे खत उपलब्ध होते . याशिवाय कोरडवाहू शेती पद्धतीमध्ये रब्बी ज्वारीचे पिकांसाठी 25 किलोग्राम नत्र रासायनिक खताद्वारे आणि उरलेले सुबाभूळीच्या पाल्याद्वारे दिल्यास रासायनिक नत्र खताची बचत करता येते . अशी शिफारस सुद्धा एकात्मिक अन्नद्रव्यांचे प्रयोगात केली आहे.
३) जैविक खते :-
रासायनिक खतांच्या वाढत्या भाव वाढीमुळे एकात्मिक अन्न पुरवठा पद्धतीत जिवाणू खतांच्या वापराला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. जैविक खते अथवा संवर्धन म्हणजे उपयुक्त अशा जिवाणूचे निर्जंतुक वाहका मध्ये केलेले मिश्रण जे बियाणे , रोपे अथवा जमिनीत वापरल्यास त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते व नत्र स्थिरीकरण स्फुरद विद्राव्याच्या उपलब्धतेत लक्षनीय वाढ होवून पिकांच्या उत्पन्नात वाढ होते आणि रासायनिक खतांची मात्रा कमी करता येते.
प्रयोग शाळेत विविध जिवाणूंच्या निवडीतून कार्यक्षम आणि त्या त्या हवामानाला पोषक ठरणाऱ्या जिवाणूंची निवड करून विशिष्ट पिकांसाठी निरनिराळे जिवाणू संवर्धने तयार केली जातात . त्यापैकी काही प्रचलित संवर्धने उदाहरणार्थ अझोटोबॅक्टर, रायझोबियम , अझोस्पायरिलम , निळी – हिरवी शेवाळ , अझोला , स्फुरद विद्राव्य जिवाणू , व्हिए मायक्रोराईझा, शेण मूत्र काला आणि गांडूळ संवर्धन इत्यादी आहेत. काही जिवाणू एकदल अथवा द्विदल पिकांच्या मुळांच्या सानिध्यात राहून वातावरणातील मूक्तं नत्राचे परिवर्तन अमोनिया स्वरूपातील नत्रात करून मुळाद्वारे स्थिर करतात.
ज्वारी बाजरी या एकदल वर्गीय पिकांसाठी एजोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पायरीलिम जिवाणू संवर्धनाचा वापर केलास दहा ते पंधरा किलोग्राम नत्राची पिकांना उपलब्धता होते. भात खाचरामध्ये भात पिकाच्या या जैविक संवर्धनाचे वापराने पिकांच्या वाढीसाठी हिरव्या निळ्या शेवाळ संवर्धनाचा वापर केल्यास प्रति हेक्टरी 30 किलोग्राम नत्राची गरज भागवली जाते.
४) रासायनिक खते :-
रासायनिक खते एकात्मिक खत पुरवठा पद्धतीतील अविभाज्य घटक आहे . यामुळे पिकांचे अन्नद्रव्यांची भूक भागविले जाते . रासायनिक खतामधून एक अथवा दोन अन्नद्रव्य विशिष्ट स्वरूपात पुरवली जातात . एक , दोन अथवा काही वेळा तीन अन्नद्रव्ये असलेली संयुक्त आणि मिश्र खते बाजारात उपलब्ध आहेत . परंतु पिकांना संतुलित पीक पोषणसाठी आवश्यक असलेले 16 ते 18 अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात होणे गरजेचे आहे . त्याच सोबत शेतातील मातीचे मृत परीक्षण करून जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि जमिनीतील दोषांची माहिती शास्त्रीय पद्धतीने मिळते . यावर आधारित जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर करता येतो . खते वापरल्यानंतर पिकांना उपलब्ध होत असताना अनेक बदल घडत असतात .
मृद परीक्षणाच्या आधारे अनावश्यक खतांची मात्रा टाळता येते व यामुळे खतांची बचत होते . तसेच पिकांना खते देताना ती बियाजवळ दिल्यास व रोपांनाही इजा होते . म्हणून पेरलेल्या बियापासून खत पाच सेंटीमीटर दूर अंतरावर द्यावे . यामुळे खतातील पोषक अंतरावर पिकांच्या मुळा द्वारे शोषण केले जातात . म्हणून खते मुळाच्या आटोक्यात घालावीत. नत्रयुक्त खते चुनखडीयुक्त जमिनीमध्ये घातली असता त्यांचा अनेक प्रकारे ऱ्हास होऊन अपव्यय होतो . म्हणून रासायनिक नत्रयुक्त खताची मात्रा पिकांना विभागून द्यावी लागते. हलक्या आणि वाळूमुय जमिनीत देखील पिकांच्या संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन मात्रा विभागून द्यावी लागते .
स्फुरदाची चलन वलन शक्ती कमी असल्यामुळे आणि चिकन माती आणि चुन्याचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीमध्ये स्फुरदाचे स्थिरीकरण होते म्हणूनही खते मुळाच्या परिघात द्यावीत. कोरडवाहू जमिनीत खते 10 सेंटीमीटर खोलवर जमिनीत ओलावा असताना वोलाट्या जवळ द्यावीत . स्फुरदिय खतांचा मातीच्या कणांची प्रत्यक्ष संबंध येऊ नये म्हणून खते बांगडी पद्धतीने अथवा पट्टे पद्धतीने द्यावीत . एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांचा सहभाग इतर घटकांच्या उपलब्धतेनुसार 20 ते 50 टक्क्यांपर्यंत ठेवता येतो.
५) सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचे व्यवस्थापन :-
अलीकडे सिंचन पद्धतीमध्ये मोठी स्थित्यंतरे घडत आहेत . अती प्रगत सिंचन पद्धतीमध्ये पाण्याच्या कार्यक्षम वापरास अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये ठिबक , तुषार , सूक्ष्म फवारा पद्धतीचा समावेश असून विशिष्ट दाबाखाली पाणी प्रवाही केले जाते अथवा तुषार सिंचन/ सूक्ष्म फवारा पद्धतीने पिकांवर फवारले जाते. ठिबक सिंचन वापरामध्ये महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर आहे . महाराष्ट्र राज्यात ठिबक सिंचनाखाली द्राक्षे , ऊस , केळी , कापूस आणि आंबा पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. ठिबक सिंचना बरोबरच विद्राव्य खते किंवा द्रवरूप खते वापरण्याच आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झाली आहे . कारण ओलिताच्या पारंपारिक पद्धतीमुळे पाण्याची पिकांसाठी गरज आणि मोठ्या प्रमाणात होणारा वापर यामधील दरी कमी केल्याशिवाय ओलीत शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविता येणार नाही . त्यामुळे अतिप्रगत सिंचन पद्धतीमध्ये पाण्याच्या कार्यक्षम वापरास अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासोबत विद्राव्य खतांचे व्यवस्थापन शक्य होणार आहे.
सिंचनातून खते अर्थात फर्टिगेशन :-
ओलीस शेती पद्धतीत फर्टिगेशन अर्थात सिंचनातून खते शेती शास्त्रातील महत्त्वाचा दुवा आहे. ज्याद्वारे पाणी आणि खतांच्या समन्वय साधून द्रवरूप , प्रवाही किंवा घनरूप विद्राव्य खते सिंचनाद्वारे दिल्याने अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळून पाणी आणि खतांचे अधिक कार्यक्षमतेमुळे त्याची बचत ही करता येते . सिंचनातून वापरता येणारी खते पूर्णपणे विद्राव्य स्वरूपात किंवा सहज पाण्यात विरघळणारे असतात .
सिंचनातून दिल्या जाणाऱ्या खतांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
१) द्रवरूप खते
२) पाण्यात विरघळणारी घनरूप खते
१) द्रवरूप खते :-
यात एक किंवा अनेक पोषण द्रव्य विरघळून द्रावणाच्या रूपात असतात . ही विरघळलेली पोषक द्रव्य द्रवरूपात स्वच्छ पारदर्शक दिसतात आणि द्रावणात तरंगणारे कण नसतात. या द्रवरूप खतांमध्ये मुख्य पोषक द्रव्यांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य देखील वापर करता येतात . द्रवरूप खते पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थेतील अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन तयार केली जातात.
२) पाण्यात विरघळणारी घनरूप खते :-
घनरूप असणारी आणि पाण्यात पूर्णपणे विरघळणारी खते ज्यात दोन अथवा अधिक मुख्य किंवा सूक्ष्म पोषक द्रव्य असतात. सिंचना बरोबर खत वापरण्याची प्रणाली आपल्या देशात नवीन आहे आणि अलीकडील काळामध्ये मोजके प्रगतिशील शेतकरी प्रामुख्याने फळबाग वर्गीय पिकास ही पद्धत उपयोगात आणतात . द्रवरूप आणि पाण्यात विरघळणारी घनरूप खत मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जात नाहीत . बहुतेक खते परदेशातून आयात केले जातात आणि अतिशय कमी प्रमाणात देशांमध्ये तयार केली जातात.
Akatmik Annadravya Vyavasthapan