A New Concept Of Tomato Production
कलमी टोमॅटो ही उत्पादन वाढीची एक नवीन संकल्पना :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण बघणार आहोत कलमी टोमॅटो ही उत्पादन वाढीचे एक नवीन संकल्पना वापरून कशाप्रकारे आपण टोमॅटोचे उत्पादन वाढवू शकतो . कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे नवीन बदल होत आहेत . शास्त्रीय दृष्ट्या पिकांच्या अधिक उत्पादनासाठी नवीन पद्धती विकसित केल्या जात आहेत . त्याचाच एक भाग म्हणजे कलम करून टोमॅटोची लागवड करणे . आजच्या काळात कलम केलेल्या टोमॅटोची लागवडीची पद्धत वापरली जात आहे . यामध्ये दोन वेगवेगळ्या जातींच्या टोमॅटोची रोपे जोडली जातात . या प्रकारे कलमी रोपे दोन्ही प्रकारचे जातींची गुणधर्म दर्शवतात . अशा रोपांची रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता अधिक असते .
कलम म्हणजे नक्की काय :- कलम करताना आपण एका जातीच्या टोमॅटोचा मुळाकडील भाग व दुसऱ्या जातीच्या टोमॅटोचा जमिनीच्या वरील भाग एकमेकांना जोडून कलम करतो . यामध्ये ज्याची मुळे वापरले जातात त्याला खुंट असे म्हणतात व ज्याचा जमिनीच्या वरील भाग खुंटा वर जोडण्यासाठी वापरला जातो त्यास कलम काडी (सायन) असे म्हणतात .
A New Concept Of Tomato Production
टोमॅटो कलम करण्याचे प्रकार :-
१) नळी कलम:- ही कलम करण्याची नवीन पद्धत आहे . ही पद्धत अमेरिका व काही आशियन देशात मोठ्या प्रमाणात वापरले जाते . यामध्ये खुंट व सायन एका प्लास्टिकच्या ट्यूबच्या सहाय्याने जोडून ठेवतात व जोडणी पूर्ण झाल्यावर ती ट्यूब गळून पडते किंवा काढून घेतली जाते.
(२) पाचर कलम:- या प्रकारामध्ये खुंटाच्या झाडाला आकाराचा कट मारतात व सायनच्या फांदीला मध्यभागी कापून एक चीर तयार केली जाते व त्यामध्ये खुंटाला पाचरे सारखे बसवले जाते व त्या दोघांना एकत्र पकडून ठेवण्यासाठी एका चिमट्याचा किंवा प्लास्टिक टेपचा वापर केला जातो. कलम भरून निघाल्यावर चिमटा/टेप काढून घेतला जातो .
टोमॅटोमध्ये कलम करण्याचे फायदे:-
1) या प्रकारे तयार केलेली रोपेही तापमानात होणाऱ्या बदलास प्रतिकारक असतात .
2) ही रोपे मुख्य म्हणजे विविध रोगांसाठी प्रतिकारक असतात .
3) ही रोपे पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत किंवा पूरग्रस्त ठिकाणी आपण वापरू शकतो .
4) या प्रकारे तयार केलेली रोपे क्षारयुक्त जमिनीत देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतात .
5) अशा प्रकारे तयार केलेली रोपे रोगाविरुद्ध लढण्यास कमी शक्ती खर्च करतात , त्यामुळे या झाडांची फळे मोठे होऊन परिणामी चांगले उत्पादन मिळते.