Importance Of Desi Cow In Organic Farming
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेंद्रिय शेतीतील देशी गायीचे महत्त्व. पूर्वीच्या काळात भारताची कृषी संस्कृती ही अन्नपूर्णा होती आणि सेंद्रिय शेतीचा मूळ पाया भारतीय देशी गोवंश घालत होता. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याकडे मुबलक पशुधन असायचे. काळाच्या ओघात रासायनिक शेतीचा वापर वाढला आणि आमच्या बळीराजाचे पशु ही गेले आणि पशु बरोबर त्याचे धन ही गेले. आपल्याला गत वैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर सेंद्रिय शेतीस पर्याय नाही आणि भारतीय वंशाच्या देशी गाय शिवाय सेंद्रिय शेती करणे शक्य नाही.
सेंद्रिय शेतीसाठी देशी गायच का महत्त्वाची –
देशी गाय श्वासनावाटे जेवढे ऑक्सिजन घेते त्यापैकी काही ऑक्सिजन मुक्त स्वरूपात बाहेर सोडते. काही अभ्यासामधून हे सिद्ध झालेले आहे की शेतीला उपयोगी असणाऱ्या जिवाणूंची संख्या जर्सी किंवा इतर गाईंच्या शेणापेक्षा देशी गाईच्या शेणामध्ये जास्त असते देशी गायीचे लिंग, पाठीचा कणा व वाशिंग यांचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सूर्यकिरणांचे दुधामध्ये स्वर्ण धार करण्याचे असते म्हणून गायीच्या दुधा-तूपाचा रंग पिवळसर असतो.
असं म्हटले जाते की देशी गायीमध्ये लक्ष्मी वसते. याचा अर्थ गाईच्या शेणात लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी म्हणजे गाईचे क्षणातील असणारे अब्जावधी अनंत कोटी अनंत प्रकारचे जीवन. या जिवाणूंची पेरणी जीवामृताच्या रूपातून जमिनीत विरजण म्हणून करायची असते. वस्तू आहे तिथे गती आहे आणि गती आहे तिथे शेती आहे. गतीमुळेच शक्तीची निर्मिती होते. अशा ते 33 प्रकारच्या शक्तीचे वसती स्थान गाई मध्ये असते.
Importance Of Desi Cow In Organic Farming
सेंद्रिय शेतीतील देशी गाईंचे महत्त्व जाणून घेऊ :-
1) जमिनीतील संरचना सुधारते :- जमिनीतील संरचना सुधारण्यासाठी देखील देशी गाई मदत करत असतात.
2) देशी गाईंच्या शेणापासून कंदील तेल देखील बनवता येते.
3) देशी गाईंना रोग होण्याची शक्यता फार कमी असते.
4) देशी गाई शेतीची जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत करतात.
5) तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशी गायींना सांभाळण्याचा खर्च देखील कमी असतो.
6) जैसी गाईंचे दूध देखील आरोग्यासाठी चांगले असते.
7) देशी गाईंचे गोबर , खत म्हणून वापरता येते यामुळे शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
👉 More Updates Join Whatsapp Group
👉 अजून वाचण्यासाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा