आपत्कालीन पर्यायी पीक योजना | Emergency Alternate Crop Scheme benefits 0

Emergency Alternate Crop Scheme

आपत्कालीन पर्यायी पीक योजना

मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता बदलत्या हवामान परिस्थितीत काही वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस , अतिवृष्टी तर काही वर्षात अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते . अशा प्रकारे बदलत्या नैसर्गिक घटकांचा शेती व्यवसायावर अनिष्ट परिणाम होत असतो. तापमानातील वाढ, कमी अधिक पाऊस हिमवर्षाव , शितलरी यांचा शेती उत्पादनावर संख्यात्मक व गुणात्मक विपरीत परिणाम होतो. मान्सून उशिरा सुरू झाल्यास पेरणी लांबते. तर पेरणीच्या वेळी अतीवृष्टी झाल्यास वेळेवर पेरणी करणे शक्य होत नाही, पेरणी झाल्यानंतर पाऊस लांबला तर त्याचा उगवलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊन कित्येकदा दुबार पेरण्याची परिस्थिती उद्भवते.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

Emergency Alternate Crop Scheme

सूर्यफूल + तूर :-

पेरणी वेळेवर झाली व पिकही चांगले वाढले तर काही वेळा पीक वाढीच्या अवस्थेत असताना किंवा दाणे भरण्याच्या वेळी पिकास शीतलहरींचा फटका बसल्यास पिकांची नुकसान होते . पाऊस वेळेवर सुरू होऊन मध्येच मोठा खंड पडणे , पाऊस उशिरा सुरू होणे , लवकर संपणे , उशिरापर्यंत पडणे , अतिवृष्टी होणे अशा आपत्कालीन परिस्थितीत पीक पेरणीच्या तारखांमध्ये बदल करावे लागतात. अशा स्वरूपाची आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन करावे लागणाऱ्या बदलांनाच आपत्कालीन पर्यायी पीक योजना असे म्हणतात आणि अति पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीशी तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे पर्यायी पीक योजना राबवावी.

आपत्कालीन परिस्थितीचे प्रमुख प्रकार व त्यांच्या उपायोजना :-

१) पिक हंगाम सुरू होतानाचा दुष्काळ – नांगे भरणे , पूर्ण लागवड , आच्छादनाचा वापर , विरळनी, युरिया अतिरिक्त मात्रा , प्रवर्तकांचा वापर , पूरक सिंचनाची व्यवस्था.

२) मध्यावधी दुष्काळ (पावसातील खंड) – धुळीचे आच्छादन , युरियाचे अतिरिक्त मात्र , आच्छादनाचा वापर , दोन टक्के युरियाचे फवारणी , 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी , पाने कमी करण , सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा , संरक्षित पाणी द्यावे.

३) मान्सूनची वेळ पूर्वी माघार – विरळणी करणे , सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचे अवलंब , संरक्षित पाणी देणे , वेळेपूर्वी काढणी करून त्याचा चारा म्हणून उपयोग करणे , परिपक्व्तेला काढणी करून घेणे.

Emergency Alternate Crop Scheme

पावसाची वेळेवर सुरुवात व पेरणीनंतर खंड पडणे :-

आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये पावसात खंड पडणे हे वरचेवर आपणास अनुभवास येते . पावसात खंड हा सर्वसाधारणपणे जुलै – ऑगस्ट महिन्यात पडतो . पाऊस वेळेवर सुरू झाला तर १५ जुलैपर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके चांगली येतात . मात्र 15 जुलै नंतर पावसामध्ये दोन ते चार आठवडे खंड पडला तर पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते .

म्हणून कोणतेही सलग पीक घेण्यापेक्षा खरीप हंगामात आंतर पिकाची शिफारस करण्यात आलेली आहे . त्यामध्ये बाजरी + तूर किंवा सूर्यफूल + तूर या अंतर्गत पद्धती चांगली दिसून आलेली आहे . हलकी जमीन असेल तर बाजरी + मटकी ही आंतर पिक पद्धती योग्य आहे . तसेच मटकी , हुलगा , उडीद यांसारखे धूप प्रतिबंधक पिके पट्टा पेर पद्धतीने घ्यावी .

पावसाने फारच ओढ दिली तर बाजरी कापून वैरणीसाठी वापरावी . म्हणजे पुन्हा पावसात सुरुवात झाल्यावर कोंब फुटून त्यापासून धान्य तसेच वैरण मिळते . अशा पिकावर दोन ते तीन टक्के युरियाची फवारणी करावी . भुईमूग पिकांवर दोन ते तीन टक्के अमोनियम फॉस्फेट ची फवारणी करावी . सूर्यफुलाच्या बाबतीत विरळणे करून झाडांची कमीत कमी संख्या म्हणजेच हेक्टरी 30 हजारापर्यंतच ठेवावे .

त्यामुळे जमिनीतील ओलावा पिकास जास्त दिवस पुरेल आणि उत्पादनात स्थैर्य येण्यास मदत होईल . तसेच खरीप पिकामध्ये निंदणी करून पीक तणमुक्त ठेवून कोळपण्याची संख्या वाढवावी.

पावसाचे उशिरा आगमन :-

अवर्षण प्रवण भागामध्ये पावसात बऱ्याच वेळा जुलै – ऑगस्टमध्ये सुरुवात होते . अशावेळी खरीप पिके घ्यावेत किंवा नाही अशा संभ्रमात शेतकरी असतात. अशा परिस्थितीत शेतकरी खरिपातील क्षेत्र रब्बी पिकाखाली घेण्याचा प्रयत्न करतात . परंतु खरीप जमिनी या हलक्या आणि कमी ओल साठवण्यात असल्यामुळे रब्बी पिके समाधानकारक येत नाहीत . म्हणून खरीप हंगामातच उशिरा पेरणीसाठी पिकांचे योग्य नियोजन करणे हे आपत्कालीन पीक योजनेचे महत्त्वाचे तंत्र आहे. म्हणजेच जुलै च्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजरी, सूर्यफूल तसेच हुलागा यासारखी पीके चांगली उत्पादन देतात, परंतु मटकी सारखे पिक उशीरा पेरणीस योग्य ठरत नाही.

खरीप हंगामामध्ये उशिरा पेरणी करताना कडधान्य , गळीत धान्य तसेच पूर्ण धान्य इत्यादी पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी अनुक्रमे तूर , हूलगा , सूर्यफूल , एरंडी , राळा अशी पिके घ्यावीत . पर्यायी पिकांचे उत्पादन नेहमीच्या सरासरी येणार नाही . परंतु कठीण परिस्थितीत काही प्रमाणात उत्पादन येऊन परिस्थिती सुसह्य होईल हे मात्र निश्चित . या सर्व पर्यायी पिकांच्या बियाण्यांची पूर्तता मात्र वेळेवर करणे गरजेचे असते.

पाऊस लवकर संपणे (सप्टेंबर अखेर) :-

ज्यावेळी रब्बी हंगामात पाऊस वेळेवर सुरू होतो परंतु ऑक्टोबर मध्यापर्यंत पडण्याऐवजी सप्टेंबर अखेरच थांबतो . त्यावेळी पिकांवर अनिष्ट परिणाम होतो . अशावेळी रब्बी पिकांच्या बाबतीत योग्य ते नियोजन करण्यासाठी खालील बाबींचा विचार व्हावा.

– रब्बी ज्वारीची पेरणी खोल करावी . तसेच खतांची मात्रा पेरणी बरोबर द्यावी .

– उपलब्ध ओळीचा कार्यक्षम वापरण्यासाठी रब्बी पिकांची विरळणी करून ताटांची संख्या हेक्टरी निम्मी करावी . ज्वारीचे उदाहरण घेतले तर हेक्टरी एक लाख ताटाऐवजी 50 हजार ताटे ठेवावे . विरळणी करताना एका आठ एक ताट काढावे किंवा एक ओळ काढावी.

– रब्बी पिकामध्ये कोळपण्याची संख्या वाढवून जमिनीत ओल जास्त टिकवावी.

– ज्वारीच्या पिकामध्ये काडी कचरा किंवा तूर काट्याचा आच्छादन म्हणून वापर करावा . हे आच्छादन हेक्टरी पाच टन वापरावे . पीक उगवणे नंतर लगेच म्हणजे पंधरा दिवसांच्या आत आच्छादन टाकावे . ज्यामुळे पिकास उपलब्ध ओलावा भरपुर मिळून उत्पादनात घट येणार नाही .

– पिक वाचवण्यासाठी शक्य झाल्यास पेरणीनंतर 30 ते 35 व्या दिवशी संरक्षित पाणी द्यावे दोन पाण्याची सोय असल्यास पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी आणि दुसरे पाणी 55 ते 60 दिवसांनी द्यावे.

पाऊस उशिरापर्यंत पडणे , अतिवृष्टी होणे :-

रब्बी हंगामात पाऊस नोवेंबर पर्यंत पडत राहिला तर ज्वारीच्या पेरण्या वेळेवर होत नाहीत . अशावेळी उशिरा पेरणीसाठी ज्वारीचे पीक धान्यासाठी न घेता वैरणसाठी घ्यावे आणि त्याची पेरणी दाट करावी. पाऊस काळ वाढल्यामुळे थंडीचा कालावधी वाढतो , अशावेळी जर ज्वारी ऐवजी हरभरा घेतला तर उत्पादन चांगले मिळते .

कधी कधी पीक पेरणीनंतर उगवणीच्या वेळेस दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत किंवा काढण्याच्या वेळेस अतिवृष्टी झाली तर पिकांचे नुकसान होते . पीक उगवून आल्यानंतर अतिवृष्टीने एक महिन्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास परत त्या क्षेत्रात पेरणी करताना पिकांची फेरबदल करून कमी कालावधीमध्ये येणारे पीक वनांचे बियाणे वापरावे.

पक्क होण्याचे अवस्थेत अगर काढणेपूर्वी पाऊस सतत पडत राहिला तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते . उदाहरणार्थ ज्वारीचे दाणे काळे पडून त्यास बाजार भाव कमी मिळतो . त्याकरिता हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असल्यास पक्व झालेल्या पिकांची काढणे त्वरित करून योग्य प्रकारे साठवणूक करावी.

Emergency Alternate Crop Scheme

Leave a Comment