Water Refilling of Wells
विहीर आणि कुपनलिकेचे पुनर्भरण
भूगर्भातील पाणी हे पिण्याच्या व ओलितासाठी लागणाऱ्या पाण्याचा महत्वाचा स्त्रोत आहे . महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 80% पिण्यासाठी पाणीपुरवठा हा भूजलाद्वारे भागाविला जातो . तसेच 55% सिंचन क्षेत्र ही भूजल साठ्यावर अवलंबून आहे . जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे दोन साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत. पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठे उदाहरणार्थ धरणे , शेततळी , तलाव इत्यादी तसेच पाणी जिरल्यामुळे भूजल साठ्यातही काहीशी वाढ होते.
लोकसंख्या वाढ , शहरीकरण औद्योगीकरण , जमीन व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन मृदा व जलसंधारण उपायांकडे दुर्लक्ष , पाणी वापरासंबंधी साक्षरतेचा अभाव , जास्त पाणी लागणारे पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ , भूजल पुनर्भरणासाठीचे अपुरे प्रयत्न , नैसर्गिक रित्या ही भूजल पुनर्भरण कमी होणे , दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा कारणांमुळे भूजल पातळी खोल खोल गेलेली आहे . ज्या प्रमाणात भूजलाच्या उपसा करण्यात येत आहे त्या प्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
भूगर्भातील पाण्याचा वापर केल्यानंतर पावसाळ्यात भूजल पातळी कायम ठेवण्यासाठी भूगर्भात पाण्याचा भराव करणे अत्यंत आवश्यक आहे . पाण्याच्या शोधात प्रत्यक शेतकरी दरवर्षी त्यांच्या विहिरी खोल करताना दिसत आहे . याचे कारण म्हणजे विहिरीद्वारे भूजलाचा उपसा होण्याचे प्रमाण हे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण पेक्षा जास्त आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळी खोल जात आहे . वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी भूजल पुनर्भरण हा महत्त्वाचा उपाय होय .
जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे व भिन्न थर आढळतात . यामध्ये मातीचा , मुरमाचा आणि खडकाचा थर असू शकतो . या थराची जाडी आकारमान वेगवेगळ्या असते. पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजल साठ्यापर्यंत पोहोचण्यास साधारणपणे एक महिना किंवा जास्त कालावधी लागतो . यावरून असे दिसून येते की नैसर्गिक पद्धतीने पुनर्भरण हे फार संत गतीने होते . पाणी उपसण्याचा वेग यावेगापेक्षा खूप जास्त आहे .
भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी जिरवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक तर आहेच सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा कासरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे सुद्धा गरजेचे आहे . आपल्या क्षेत्रातील कृत्रिम रित्या भूजल साठा वाढविण्यासाठी विहीर आणि कूपनलिकेचे पुनर्भरण करणे फार गरजेचे आहे .
Water Refilling of Wells
विहिरीचे पुनर्भरण :-
संशोधन करून कृत्रिमरीत्या विहिरीचे पुनर्भरण करण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे . त्यासाठीचे खालील काही महत्त्वाचे मुद्दे .
– विहिरी पासून तीन मीटर अंतरावर दोन टाके बांधून घ्यावेत. – पहिले टाके 1.5 मीटर लांब , एक मीटर रुंद व 1.5 मीटर खोल घ्यावी.
– दुसरे टाके दोन मीटर लांब , दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल पहिल्या टाक्याला लागूनच घ्यावे.
– दोन्ही टाक्याच्या मध्ये 45 सेंटीमीटर लांब , 45 सेंटीमीटर रुंद व आठ सेंटीमीटर खोल अशी एक खाच ठेवावी.
– दुसऱ्या टाकेच्या तळाशी 30 cm जाडीचा मोठ्या दगडाचा थर भरावा . त्या थरावरती 30 सेंटीमीटर जाडीचा छोट्या दगडाचा थर भरावा . यावर 30 सेंटिमीटर जाडीचा वाळूचा थर भरून घ्यावा . या टाक्याच्या तळापासून चार इंची पीव्हीसी पाईप काढून विहिरीशी जोडावा. पुनर्भरण करण्यासाठी विहिरीत जोडलेला पाईप विहिरीच्या कडेपासून 1 ते 1.5 फूट समोर आणावा .
– नाल्यातील पाण्यामधील गाळ , कचरा इत्यादी जड पदार्थ पहिल्या टाकीच्या तळाशी राहतील आणि काचेद्वारे दुसऱ्या टाक्यांमध्ये वर वरचे पाणी जाईल . दुसऱ्या टाक्यांमध्ये गाळण यंत्रणा टाकलेले असल्यामुळे यातून स्वच्छ व कणविरहित पाणी चार इंच पाईप द्वारे विहिरीत जाऊन पुनर्भरण होईल.
Water Refilling of Wells
कुपनलिकेचे पुनर्भरण :-
कोकणालिकेचे पुनर्भरण करण्याच्या पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे या पद्धतीने नुसार खालील काही महत्त्वाचे मुद्दे :-
– कुपनलिकेजवळ नाला किंवा ओढ्याचे पाणी वळवावे किंवा शेताचा उतार असल्यास शेतातीलच पाणी कुपनलिकेच्या दिशेने येते . याच पाण्याचा उपयोग पुनर्भरण करण्यासाठी वापरता येतो .
– कुप नलिकेच्या सभोवताली दोन मीटर लांब , दोन मीटर रुंद आणि दोन मीटर गोल आकाराचा खड्डा खोदावा . गोल खड्डा करायचा असल्यास दोन मीटर व्यासाचा सुद्धा खड्डा करता येतो .
– खड्डा संपूर्ण खोदून झाल्यानंतर क्रेसीन पाईप ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा . खड्ड्याच्या तळापासून क्रिसिन पाईप वर 50 सेंटिमीटर पर्यंत दोन ते तीन सेंटीमीटर अंतरावर सर्वे बाजूंनी चार ते पाच मिलिमीटर व्यासाची छिद्रे पाडण्यासाठी सुतळी किंवा दोरीचे सहाय्याने आधी मार्किंग / आखणी करून घ्या.
– क्रेसिंग पाईप लोखंडाचा असल्यास ड्रिल मशीन ने छिद्र पाडावी आणि क्रेसींग पाईप पीव्हीसी असल्यास दाभन गरम करून छिद्र पाडावे . पीव्हीसी पाईपला ड्रिल मशीन ने छिद्र पाडल्यास पाईप फुटण्याची शक्यता असते.
– या छिद्रवर प्लास्टिकची जाळी घट्ट गुंडाळून घ्यावी व प्लास्टिकच्या धाग्याने व्यवस्थित शिवून घ्यावी. पूर्वी प्लास्टिकच्या जाळी ऐवजी नारळाची दोरी वापरायचे पण नारळाची दोरी काही दिवसांनी कुजून जाते व त्यामुळे पाणी प्रदूषित होते . प्लास्टिकची जाळी पाण्यात राहून खराब होत नाही त्यामुळे पाणी व्यवस्थित गाळून कुपनलिकेत पडते.
– खड्ड्याचे चार भागात सारखे विभाजन करून घ्यावे. सर्वात खालच्या भागात दगड गोटे, दगडाला पर्याय म्हणून गिट्टी सुद्धा वापरता येईल , त्यावरच्या भागात खडी नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वात वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी. ही वाळू भरताना सिमेंटचे तीन रिंग कुपनलिकेच्या भोवती टाकावे .
हे रिंग टाकताना साधारण सहा इंच रिंग जमिनीवर ठेवा त्यामुळे वरची माती गाळण यंत्रणेत पडणार नाही व पाणी प्रदूषित होणार नाही . धुतलेली वाळू टाकण्याआधी जर प्लास्टिकची जाळी अंथरली तर काही दिवसांनी वाळू खराब झाल्यास काढून धुता येते व परत टाकता येते.
– अशाप्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कुकनलिकेत जाईल आणि कुकनलिकेचे पुनर्भरण होईल .
– अशा प्रकारे कुपनलिका पुनर्भरण घरी तसेच कार्यालयात सुद्धा करता येते . यासाठी छतावरील पाणी साठवण संचाच्या पाईपचे पाणी कुपनलिका पुनर्भरण गाळण यंत्रणेत सोडावे.
– अशाप्रकारे पुनर्भरण करण्यासाठी साधारण 9 ते 10 हजार रुपये लागतात . सर्व साहित्य उपलब्ध असल्यास दोन मजूर तीन दिवसात हे काम पूर्ण करू शकतात . एक दिवस खड्डा करणे व दोन दिवस आखणी करून खड्डा भरणे.