Best 6 Healthy cereals
आरोग्यास उपयुक्त कडधान्य
नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत आरोग्याच्या दृष्टीने कडधान्य कशाप्रकारे आपणस उपयुक्त असतात. शाश्वत आणि योग्य आहाराची गरज या दोन्ही बाबींच्या दृष्टीने सूक्ष्म पोषण मूल्यांचा भरपूर समावेश असलेल्या कडधान्य डाळींचे सेवन महत्त्वाचे आणि लाभदायक आहे . याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे . आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन पहिल्यांदा 2016 मध्ये साजरा करण्यात आला . नंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 10 फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला . तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो . हा दिवस म्हणजे जागतिक पल्स डे साजरा करणे मागचा उद्देश लोकांना डाळींचे महत्त्व पटवून देणे आणि पोषण आणि अन्नसुरक्षेसाठी कडधान्य किती महत्त्वाचा आहे , हे सांगणं हा आहे.
पश्चिम आफ्रिकेतल्या बुरखीना फासो या देशाने 10 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा कराव अशी मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे केली होती . संयुक्त राष्ट्र संघाच्या डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या 73 व्या आम सभेने या विनंतीला मान्यता दिली होती . त्याआधी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन म्हणून यशस्वीपणे साजरा केला होता. यात अन्न आणि कृषी संघटनेने (F A O) महत्त्वाची भूमिका बजावली होती.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
कडधान्य म्हणजे काय ? :-
साध्या सोप्या भाषेत म्हटलं तर जी धन्य द्विदल असतात , म्हणजेच ज्या धान्यापासून डाळी तयार होतात त्यांना कडधान्य म्हणतात . मूग , उडीद , तूर , हरभरा , मसूर , राजमा , वाटाणा , मटकी , कुळीत यासारख्या अनेक प्रकारच्या कडधान्याचं उत्पादन भारतात घेतल्या जातात . ते प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत . कडधान्य हा आपल्या आहाराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि याचं नियमित सेवन आवश्यक आहे . शिजवल्यानंतर ही या डाळीमधील पौष्टिक घटक सुरक्षित राहतात.
इतरांना पिकांच्या तुलनेत कडधान्य / डाळींमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते . महत्त्वाचे म्हणजे ही पिके दुष्काळ तसेच हवामानाशी संबंधित आपत्तीचा सामना करण्याच्या दृष्टीने अधिक सक्षम असतात . यामुळेच हवामान बदलासोबत जुळवून घेण्याच्या दृष्टीने तसेच हवामान बदलाची परिणामकारकता कमी करण्याच्या दृष्टीने ही कडधान्य पीक महत्त्वाचे साधन असल्याचे नक्कीच म्हणता येईल.
उडीद , तूर , मूग , हरभरा , मसूर , मटकी , वाटाणा , राजमा हे प्रमुख कडधान्य पिके असून कडधान्याच्या डाळीचा उपयोग मानवी आहारात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळेच डाळवर्गीय पिकांचे विशेष महत्त्व शाकाहारी लोकांची प्रथीमांची गरज भागवतात. कडधान्य शरीरास पचण्यास सुलभ असून प्रथिने , लायसिन आणि रिबॉलविन कडधान्यत उपलब्ध असतात. तूर आणि मसूर मधील प्रथिने लहान मुलं व वयोवृद्धांना पचण्यासारखी व सुलभ असतात.
आहारात कडधान्यात प्रतिमाशिवाय कर्बोदके , खनिजे आणि जीवनसत्वाचे प्रमाण सुद्धा चांगलेच आहे . कडधान्यांच्या कोवळ्या , हिरव्या शेंगांचा उपयोग भाजी म्हणून केला जातो . तसेच जनावरांचा आहार म्हणूनही कडधान्य पिके उपयुक्त आहे.
प्रथिनांची रोजची गरज व कमतरतेमुळे होणारे आजार :-
१) लहान मुले , गर्भवती महिला व स्तनदा मातांना अधिक मात्रेत प्रथिनांची गरज असते . प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक आजार संभवतात . कमतरतेमुळे मुलांची शारीरिक , मानसिक वाढ खुंटते आणि अतिकृशता हा आजार संभवतो . यामध्ये लहान बालकांच्या हाता-पायांच्या काड्या झाल्यासारखे दिसून येते.
२) कमी वजनाचे बालक जन्माला येणे , रक्तशय होणे तर प्रौढांमध्ये जंतुसंसर्ग , यकृत वृद्धी , जलोदर , कृशता असे आजार संभवतात.
३) प्रत्येक व्यक्तीसाठी प्रथिनांची गरज ही व्यक्तीच्या वजनानुसार व शारीरिक अवस्थेनुसार निश्चित केली जाते . सर्वसाधारणपणे एक ग्रॅम प्रति किलो वजन प्रति दिवस प्रथीने प्रत्येक व्यक्तीसाठी लागतात . म्हणजेच व्यक्तीचे वजन 50 किलो असेल तर त्या व्यक्तीला दिवसभरात पन्नास ग्राम प्रथिनांची गरज असते.
४) सर्वच प्रकारची कडधान्य पचायला सारखी नसतात . पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी त्यानंतर मूग , उडीद , चवळी आणि हरभरा . कडवाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असते.
५) आय.सी.एम.आर यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे 70 ते 80 ग्रॅम कडधान्य प्रति दिवस प्रतिमानसी आहारात घेणे गरजेचे आहे.
६) कडधान्यत भरपूर पोषक तत्वे असतात . शंभर ग्रॅम कडधान्य मध्ये 17 ते 25 टक्के पर्यंत प्रथिने असतात. याला अपवाद सोयाबीन आहे . 100 ग्राम सोयाबीन मध्ये 40 ते 42 टक्के प्रथिने असतात . शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पूर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते.
विविध कडधान्यांचे आरोग्यदायी महत्त्व :-
१)मूग :-
मूग हे सर्वाधिक पोषण युक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते . मुगाचा आहारात समावेश असल्यास अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते . मुगामुळे हृदयविकार , कर्करोग , मधुमेह व लठ्ठपणासारखे आजार टाळता येतात . मूग सहज पचणारे कडधान्य आहे.
२) तुर :-
तुरीचे पीक भारतात गुजरात व दक्षिण भारतात घेतले जाते . महाराष्ट्रात सुद्धा या पिकाचे लागवडीचे क्षेत्र अधिक आहे . तूरित प्रथिनाचे प्रमाण चांगले असते . तुरीतील प्रथिने लहान मुलांना , वृद्धांना पचण्यास हलके असतात . तुरीची डाळ पित्तकर व किंचित वातळ आहे.
३) मटकी :-
हे एका हंगामात पूर्ण होणारे व लागवडीतील कडधान्य आहे . मटकीचे वेल किंवा जुडूप असते . या पिकाची भारतात सर्वत्र लागवड केली जाते . मटकीचा जेवणात भाजी म्हणून वापर करतात.
४) हरभरा :-
रक्तदोषाच्या रोगांवर अंकुर आलेले बियाणे हे औषध म्हणून उपयोगी आहे . हिरव्या पानातून मिळणारे मेलिक व ऑक्सेलिक आम्ल पोटांच्या विकारावर उपाय म्हणून वापरता येते . हरभऱ्याच्या पानात लोह असते . त्याची भाजी करतात . पानावरील दव गोळा करतात त्याला आंब असे नाव आहे. ही आंब अपचन , अतिसार यावर गुणकारी आहे .
५) चण्याचे दाणे
फायदे : चणा शरीराला ऊर्जा देतो आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. पचनसंबंधी समस्यांसाठी फायदेशीर आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.
६) मसूर डाळ
फायदे : मसूर डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हायपरटेंशन आणि रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते. वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
कडधान्याचे होणारे फायदे :-
१) विविध पीक पद्धतीमध्ये कडधान्याचा समावेश केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व उत्पादनात वाढ होते.
२) मानवी आहारातील प्रथिनांची गरज कडधान्यापासून भागवले जातात.
३) कडधान्यापासून विविध प्रकारचे डाळीची निर्मिती करता येते.
४) कडधान्यापासून निरनिराळे प्रक्रिया युक्त व मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती करता येते.
५) कडधान्यामुळे एखादा लघुउद्योग निर्मितीला चालना मिळते.