अश्वगंधा एक औषधी वनस्पती Medicinal Uses Of Ashwagandha best

Medicinal Uses Of Ashwagandha

नमस्कार मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत एका औषधी वनस्पती बद्दल ज्याचं नाव आहे अश्वगंधा . अश्वगंधा हे आयुर्वेदातील अतिशय लोकप्रिय औषध आहे. जनसामान्यांमध्ये देखील त्याच्या गुणांमुळेच सुपरिचित असलेले हे औषध आहे. अश्वगंधा या औषधाचे झुडूप असते. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी आपोआप होणारे आणि दिसायला अगदी सामान्य असले तरी औषध म्हणून अगदी विशेष आहे.

संस्कृत भाषेत याची अनेक पर्यायी नावे आहेत, जसे की अश्वगंधा, वराह करणी, वरदा, बलदा. या झाडाची जी मुळे असतात ती मुख्यतः औषधासाठी वापरली जातात. ही मुळे चमकदार असतात आणि बाहेरून बुरकट रंगाची आणि आतून पांढरा रंगाची असतात. त्यांचा एक विशिष्ट गंध येतो जो घोड्यासारखा असतो. म्हणून या झाडाचे नाव अश्वगंध आहे. हे बल वाढवणारे औषध असल्यामुळे याला बलदा नाव आहे आणि वरदा म्हणजे मनुष्य जातीसाठी अक्षरशः वरदान असल्याप्रमाणे या औषधाचा उपयोग होतो. याच इंग्लिश नाव आहे withania somnifera

Medicinal Uses Of Ashwagandha

अश्वगंधाचे गुण व उपयोग:-

1)अश्वगंधा हे मन बुद्धी आणि मेंदूचे किंवा मानसिक विकार यामध्ये अतिशय उत्तम काम करणारे औषध आहे

.2) ज्यावेळी शरीरातील वाद आणि पित्त हे दोष प्रमाणाबाहेर वाढतात त्यावेळी अश्वगंधा हे औषध कमी येते.

3) अश्वगंधामुळे मेंदूला बळ मिळते मनाची चंचलता कमी होते, शरीरातला वात कमी होतो आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.

4) अश्वगंधा या औषधी वनस्पती मुळे झोपेसंबंधीच्या समस्या देखील कमी होतात.

5) अश्वगंधा नियमित घेतल्यामुळे हाडांना देखील फायदा होतो.

6) मधुमेहासाठी देखील अश्वगंधा या औषधी वनस्पतीचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील-रक्तातील साखर कमी होते तेही थकवा न येता.

7) अश्वगंधाच्या सेवनामुळे ताणतणाव, डिप्रेशन , anxiety कमी होण्यास मदत होते.

8) ह्रुदयाच्या तक्रारीवर देखील अश्वगंधा उपयुक्त ठरते.

Medicinal Uses Of Ashwagandha

Leave a Comment