सिताफळ लागवड आणि अंजीर लागवड : Plantation Of Sitafal And Figs Best 0

Plantation Of Sitafal And Figs

सिताफळ लागवड आणि अंजीर लागवड

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सीताफळ आणि अंजीर लागवडी विषयीची माहिती . सिताफळ लागवडीसाठी हलकी ते मध्यम , चांगली निचरा होणारी , सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन निवडावी. लागवडीसाठी भारी काळी , पाणी साचून राहणारी , अल्कली युक्त अगर चोपण युक्त जमीनी टाळाव्यात.

• लागवडीसाठी बाळानगर अर्का सहान , फुले पुरंदर , फुले जानकी , टी पी 7 , धारूर 6 या जातींची निवड करावी.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

• पावसाळ्यापूर्वी पाच मीटर बाय पाच मीटर अंतरावर घेतलेल्या खड्ड्यात शेणखत एक ते एक पॉईंट पाच घमेले , पोयटा माती दोन ते तीन घमेले , एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे       मिश्रण भरावे.

• पाऊस पडल्यानंतर खड्ड्यामध्ये मध्यभागी लहान खड्डा करून रोपे लावावी , तसेच माती हाताने दाबून काठीचा आधार देऊन , सुतळीने सेल बांधावीत . पाऊस नसल्यास त्वरित झारीने      पाणी द्यावे.

• लागवडी नंतर मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून एक मीटर पर्यंत वरचे वर काढून झाडावर चार दिशांना फांद्या विखुरलेल्या राहतील असे वळण द्यावे.

• लागवडीनंतर दोन तीन वर्षे खरीप हंगामात चवळी , भुईमूग , सोयाबीन , घेवडा किंवा ताग धैंचा ही हिरवळीची पिके घ्यावी.

• झाडाच्या एकसारख्या वाढीसाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात पानगळ झाल्यानंतर हलकी छाटणी करावी.

• सूक्ष्म फळ निर्मिती , फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून – जुलै ते सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये पाण्याची गरज असते . सुरुवातीच्या काळात बागेत हलक्या जमिनीत पाच ते   सहा दिवसांनी , मध्यम जमिनीत आठ ते दहा दिवसांनी आणि भारी जमिनीत 11 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे.

• सर्व साधारणपणे सीताफळास शेणखत , स्फुरद आणि पालाची संपूर्ण मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला देऊन नत्राची मात्रा तीन ते चार हफ्त्यात विभागून एक ते दोन महिन्यांच्या अंतराने     द्यावी . पाच वर्षानंतर पूर्ण वाढलेले झाडास बहर धरतानाच मे जून मध्ये शेणखता सोबत संपूर्ण स्फुरद आणि पालाश व अर्धे नत्र खोडापासून दूर फांद्यांच्या परीघाखाली रिंग करून द्यावे .   पहिले पाणी द्यावे मुरलेल्या अर्धे नत्र एक महिन्याच्या अंतराने दोन हप्त्यात विभागून द्यावे.

Plantation Of Sitafal And Figs

अंजीर लागवड :-

  • अंजीर लागवडीसाठी खोल परंतु निचरा होणारे जमीन निवडावी . गाळाची जमीन चांगली असते . अशा जमिनीत झाडे झपाट्याने वाढतात . खूप काळी व खोल जमिनी या फळ झाडास अयोग्य असते . लागवडीसाठी तीन ते चार फूट खोल परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
  • लागवडीनंतर 4.5 मीटर बाय 3 मीटर ठेवावे.
  • पुना पिक , दिनकर फुले , राजेवाडी या जातींची लागवड करावी. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी.
  • पूर्ण वाढलेल्या झाडास 30 ते 50 किलो शेणखत , 900 ग्रॅम नत्र , २५० ग्राम स्फुरद , 275 ग्रॅम पालाश प्रतिझाड प्रति वर्ष द्यावे . नत्र दोन समान हफत्यांमध्ये विभागून द्यावे .
  • पूर्ण वाढ झालेल्या झाडांची छाटणी दरवर्षी 15 सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान करावी . जमिनीपासून 2.5 ते 3 फुटांपर्यंत एक खोड ठेवून त्यावर चार ते पाच फांद्या राखावे.

 

मत्स्यसंवर्धन नवीन तळ्यांची निर्मिती :-

केंद्र शासन अर्थसाह्य नीलक्रांती धोरणांतर्गत मत्स्य व्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेत 21 विविध योजना राबविल्या जातात . या धोरणांतर्गत मत्स्य व्यवसायिक , मत्स्य शेती करणाऱ्या उद्योग यांच्या सहयोगाने राज्यातील बहु जलाशयीन सागरी व निम खारे पाणी क्षेत्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करून मच्छोत्पादनात वाढ करण्याचा मुख्य उद्देश आहे . मत्स उत्पादन वाढीच्या योजना राबविताना शाश्वत पद्धतीने जैविक सुरक्षितता व पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

  • राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांमुळे भूजल मत्स्य उत्पादनात भरीव वाढ.
  • 2015 – 16 मध्ये असलेल्या 1.5 लाख टन वरून ते सन 2016 – 17 मध्ये दोन लाख टन पर्यंत.
  • गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दहाव्या क्रमांक.

अशी आहे योजना :-

भू जलाशयन मत्स्य उत्पादन वाढीला मोठा वाव आहे . भूजलाशयीन मत्स्य उत्पादनाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी निलक्रांती अंतर्गत भूजलाशयीन क्षेत्रासाठीच्या आठ योजना अंतर्गत मत्स्यसंवर्धनासाठी नवीन तळी तयार करणे या एका योजनेचा समावेश आहे.

योजनेचे उद्दिष्ट :-

भू जलाशयनिक क्षेत्रात पाण्याचे स्त्रोत असलेल्या व सुयोग्य ठिकाणी मत्स्य तळ्याची निर्मिती करून मत्स्य बिजाचे साठवणूक करून मत्स्यसंवर्धनाद्वारे मत्स्य उत्पादनात वाढ व मत्स्य शेती करणाऱ्यांची आर्थिक उन्नती.

योजनेचे निकष , अटी व शर्ती :-

• लाभार्थीची स्वतःची जागा असणे आवश्यक . ना हरकत प्रमाणपत्राची जबाबदारी लाभार्थींची असते.

• बांधकाम केल्यानंतर पाण्याची पातळी एक पॉईंट पाच मीटर असणे आवश्यक आहे.

• केंद्राच्या अर्थसहायाची मर्यादा सर्वसाधारण लाभार्थ्यास दोन हेक्टर पर्यंत आणि सहकारी संस्थांसाठी 20 हेक्टर पर्यंत असेल.

• केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या शिखर संस्था , महामंडळ व संस्था यांचे प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारसी सह सादर करणे आवश्यक आहे.

अर्थसाहयाचे स्वरूप :-

• केंद्र शासनाचा 50 टक्के व लाभार्थ्यांचा 50 टक्के .

• नवीन तळी बांधकामासह त्यामध्ये पाण्याची पातळीचे नियंत्रण करणारी यंत्रणा पाणीपुरवठ्याच्या सोयी व एरिएशन यंत्रणाखाली ठेवण्याचे गोदाम आदींसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयांच्या मर्यादित केंद्र शासनाचे 50 टक्के म्हणजेच 3 लाख 50 हजार रुपये अनुदान .

Plantation Of Sitafal And Figs

सिताफळ लागवड आणि अंजीर लागवड

Leave a Comment