तुरीचे सुधारित वाण
Turiche Sudharit Wan
बीज प्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन :-
बियाणेची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीने रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बनडिजियम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति दहा ते पंधरा किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धन तुर बियाण्यासाठी 250 ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
खते :-
सुधारित वाण खत आणि पाणी यात चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यासाठी खताची मात्र योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते . प्रति हेक्टरी चांगले कुजलेले 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे . पिकाच्या सुरुवातीच्या काळात नत्राची गरज भागविण्यासाठी तुर पिकाची पेरणी करताना दोन 25 किलो नत्र आणि पन्नास किलो स्पुरद म्हणजेच 125 किलो अमोनियम फॉस्फेट अथवा 50 किलो युरिया आणि तीनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रत्येकाला द्यावे . प्रती हेक्टर 30 किलो पालाश म्हणजेच 50 किलो मिरेट ऑफ पोटॅश दिले असता प्रतिसाद देऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा अनुभव आहे.
तुरीचे सुधारित वाण
पीक सुरुवातीपासूनच तण वीरहित ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे . कोळप्याच्या सहाय्याने पीक 25 ते 35 दिवसांचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुजबुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते व त्यायोग्य पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते . तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते . दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते.
कोळपणी शक्यतो वाफशावर करावी . तुर पिक पहिले 30 ते 45 दिवस तण विरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचे दृष्टीने आवश्यक असते . गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. मजुरा अभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणीपूर्वी तण नाशकाचा वापर करावा . त्यासाठी फ्ल्यूक्लोरालीन किंवा पेंडी मेथिलिन हे तण नाशक तीन लिटर प्रति हेक्टरला 500 ते 700 लिटर पाण्यातून जमिनीवर फवारून वखर पाळी घालावी म्हणजे ते चांगले मिसळले जाऊन तण नियंत्रण अधिक होते.
तूर हे कडधान्य पीक बहुतांशी पावसाच्या पाण्यावर येते . परंतु पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास ओलावा आणि मध्यम असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते . हे टाळण्यासाठी जमिनीतील ओला फार कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याचे सुरुवातीला संरक्षित पाणी द्यावे . अवर्षण प्रवण भागात लवकर येणारे तुरीचे पिकास पावसाची शक्यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर पहिले पाणी फुलकळी लागताना , दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना आणि तिसरे शेंगात दाणे भरताना द्यावे .
मात्र पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी . जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाल्यामध्ये अंतर ठेवावे . पाऊस नसेल तर जमिनीस भेगा पडण्याच्या अगोदरच प्रमाणात पाणी द्यावे. तसेच ठिबक संचावर पूर्व हंगामी तूर पिकाची लागवड करावी.
आंतरपीक आणि मिश्र पीक :-
पारंपारिक शेतीमध्ये कोरडवाहू क्षेत्रात तूर हे मिश्र किंवा आंतरपीक म्हणून घेतले जाते. कपाशीच्या सहा किंवा आठ ओळीनंतर एक ओळ तुरीची अशी पद्धत विदर्भामध्ये प्रचलित आहे . पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच मराठवाडा विदर्भामध्ये खरीप ज्वारीचे पीक घेण्याची पद्धत आहे . अशा क्षेत्रांमध्ये 45 सेमी अंतरावर ज्वारीच्या दोन ओळी आणि त्यानंतर 30 सेमी अंतरावर तुरीची एक ओळ अशी पद्धत प्रचलित आहे . पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बाजरीमध्ये तुरीची आंतरपीक घेण्याची पद्धत आहे . यासाठी 45 सेमी अंतरावर बाजरीच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची या पद्धतीने पेरणी केल्यास बाजरीचे पीक सप्टेंबर पर्यंत निघून जाते आणि पुढे पडणाऱ्या हस्ताच्या पावसावर तुरीचे चांगले पीक हाती येते . अलीकडे भुईमूग किंवा सोयाबीनच्या तीन ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरावी आणि दोन ओळीतील अंतर 30 सेमी ठेवावे .
यासाठी तुरीचे विपूला बी एस एम आर 853 हे वाण उपयुक्त आहे . मूग , उडीद सारख्या अतिशय लवकर येणाऱ्या पिकांमध्ये मुगाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची याप्रमाणे अंतर्पित घेतल्यास तुरीची जोमदार वाढीची सुरुवात होण्यापूर्वी मूग , उडीद , चवळी हे पीक हाती येते आणि त्यापासून एकरी तीन ते चार क्विंटल उत्पन्न मिळते . मुख्य पिक तुर पासून 12 ते 15 क्विंटल पर हेक्टर उत्पन्न मिळते.
आंतरपीक पद्धतीवर सोयाबीन + तूर साठी सोयाबीन पिकाची सुधारित वाढ :-
१) महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी येथून प्रसारित केलेल्या डी एस 228 (फुले कल्याणी) के डी एस 344 (फुले अग्रणी).
२) जे एन के के व्ही , जबलपूर ने विकसित केलेल्या जे एस 335 , जे एस 93 – 05 , जेएस 97 – 52 , जे एस 95 – 60 व सोयाबीन संचालनालय , इंदोर द्वारा विकसित केलेल्या एनआरसी 37.
३) पेरणीसाठी वनामृत विद्यापीठ , परभणीने विकसित केलेल्या एम ए यू एस 47 (परभणी सोना), एम ए यू एस (प्रतिकार ) , एम ए यू एस 61 – 2 (प्रतिष्ठान ) एम ए यु एस 71 (सृद्धी ) , एम ए यू एस 81 (शक्ती ) एम ए यु एस 162 इत्यादी सुधारित वानांचा तसेच इत्यादी वानांचा वापर करावा.
Turiche Sudharit Wan
आंतरपीक पद्धतीवर सोयाबीन + तुरीसाठी लागवड तंत्रज्ञान :-
१) पेरणी अंतर सोयाबीन + तूर आंतरपीक घेताना 180 × 30 सेंटिमीटर अंतरावर तुरीची लागवड करून त्यात सोयाबीनच्या पाच ओळी आंतरपीक म्हणून 45 ×5 सेंटिमीटर अंतरावर लागवड करता येते. सोयाबीन प्लस तुरीच्या अंतर्गत करून घेताना (5:1) प्रमाण ठेवावे .
२) बियाणे मात्रा सोयाबीन 20 किलो प्रती एकर तूर 1.50 किलो प्रती एकर.
३) पेरणी पद्धत – पांभरी द्वारे करावे.
पीक संरक्षण :-
तुर पिकाचे खरे आर्थिक नुकसान पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत आढळून येणारे आणि प्रत्यक्ष फुलांवर अथवा शेंगातील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करणाऱ्या घाटे अळी , पिसारी पतंगाची अळी , शिंगे वरील काळी माशी या प्रमुख किडींपासून होते . या किडीचे वेळीच नियंत्रण केले नाही तर उत्पन्नात 30 ते 40 टक्के घट येते. तसेच अनुकूल हवामान न राहिल्यास पिकाचे अतिशय मोठे नुकसान होते.
एकात्मिक किड नियंत्रण :-
कोणत्याही पिकावरील किडींचे नियंत्रण करण्यासाठी केवळ एकच उपाय करण्यापेक्षा बहुविध उपायांची सांगड घातल्यास किड नियंत्रण योग्य प्रकारे होते . खालील मुद्दे एकात्मिक पद्धतीत लक्षात ठेवावे.
तुर पिकाची पेरणी वेळेवर करावी . पिकाची फेरपालट करावी . पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी . तसेच राझोबियम चोळावे . बाजरी , ज्वारी , भुईमूग , सोयाबीन या पिकांवर तूर हे अंतर पीक घ्यावे . वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी . फोरोमन ट्रॅप पिकांमध्ये लावावेत . पक्षांना बसावण्यासाठी कामट्या / मंचाने लावावेत . गरजेनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी.
रोग नियंत्रण :-
मर आणि वांझ हे तुरी वरील महत्त्वाचे रोग आहेत . वर्षांनुवर्षे एकाच शेतात रोगाला बळी पडणाऱ्या वानांची लागवड केल्यास फ्युजेरियम उडिम नावाच्या बुरशीची जमिनीत वाढ होते. आणि त्यापासून तुरीवर मर रोग होतो . या रोगाचा नियंत्रणाचा उत्तम उपाय म्हणजे या रोगांना प्रतिकारक्षम असणाऱ्या वानांचीच लागवड करावी . तसेच रोजग्रस्थ झाडे यामुळे उपटून वेळोवेळी नाश करावी . तसेच वर्षानुवर्षे एकच पीक घेण्याऐवजी पिकांचा फेरपालट आवश्यक करावा . पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी . तसेच उन्हाळ्यात जमीन खोल नांगरून चांगली तापू द्यावी . त्यामुळे मातीतील ही बुरशी जास्त उष्ण तापमाना मुळे मरून जाईल.
काढणी , मळणी , साठवण :-
तूरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे . व खळ्यावर काठीच्या सहाय्याने किंवा पेंड्या झोडपून मळणी करावी . साठवणीपूर्वी तूर धान्य पाच – सहा दिवस चांगले कडक उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे . साठवण कोंडट व ओलसर जागेत करू नये . कडूनिंबाचा पाला धान्यात मिसळून धान्य साठवावे . यामुळे धान्य साठवणीतील किडी पासून सुरक्षित राहते.
Turiche Sudharit Wan