नांगरणीसाठी उपलब्ध अवजारांची माहिती : Nangaranisathi Upalabdh Avajaranchi Mahiti Best 0

Nangaranisathi Upalabdh Avajaranchi Mahiti

नांगरणीसाठी उपलब्ध अवजारांची माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नांगरणीसाठी उपलब्ध असणाऱ्या अवजारांची माहिती. शेतासाठी बऱ्याच प्रकारच्या अवजारांची गरज असते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे नागरणी हे आहे. खालील प्रमाणे काही महत्त्वाचे अवजारे नांगरणीसाठी लागतात.

१) लाकडी नांगर :-

आजही पारंपारिक शेतीमध्ये वापरला जाणारा हा नांगर मुख्यत्वे लाकडापासून बनविलेला असतो. लाकूड हे उपलब्ध असल्यास सागवानी किंवा बाभळीचे वापरले जाते. यामध्ये नांगराचा आकार हा
त्रिकोणी असून लाकूड घासून तुटू नये म्हणून लोखंडी फळा खालच्या टोकाला जोडलेला असतो . या नांगराची रुंदी कमी असते . साधारण पंधरा सेंटीमीटर व याच्या सहाय्याने आपण पाच ते सात इंच खोल नांगरणी करता येते . कोकणामध्ये या नांगराचा वापर चिखलनीसाठी सुद्धा केला जातो.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

२) लोखंडी नांगर

लाकडी नांगराप्रमाणेच त्रिकोणी नांगर असून लाकडाएवजी लोखंडाचा वापर केलेला असतो. लोखंडी फ्रेम मुळे नांगराला मजबूती येते.
वर उल्लेख केलेला नांगर बैलजोडीचे सहाय्याने ओढले जाऊ शकतात. त्यांचा वापर लहान आकाराचे शेतांमध्ये करता येतो . वजनाला हलके असल्याने शेतात ने- आण करणे सोपे जाते. परंतु या नांगराचा मुख्य दोष म्हणजे यांच्या वापराने जमीन फक्त उकरले जाते. नांगरणीची इतर दोन उद्दिष्टे सफल होत नाहीत तसेच नांगर त्रिकोणी आकाराचा असल्यामुळे तयार होणारे चर त्रिकोणी आकाराचे होतात . त्यामुळे काही जमीन नांगरणीतूनच सुटून जाते. म्हणूनच देशी नांगराने शेत नांगरताना उभी आडवी आणि तिरकस नांगरणी करण्याची शिफारस केली जाते . याचा अर्थ चांगले नांगरणी करण्यासाठी एकाच शेतामध्ये तीन वेळा नांगर फिरवावा लागतो.

३) फाळाचा नांगर

वर उलेख केलेले त्रिकोणी नांगराचे दोष काढून टाकण्यासाठी फाळाच्या नांगराचा विकास करण्यात आला आहे . या नांगरामध्ये विशिष्ट साच्याचा फाळ असतो. या फाळाची खालची पूर्ण कडा धारदार बनविलेली असते . जेणेकरून तिच्याने माती कापली जाईल . ही कापलेली माती वरच्या बाजूला उचलून फाळक्यावरून वक्राकार घसरेत उलटून जमिनीवर पडते . या प्रक्रियेमध्ये मातीची ढेकळे बारीक होतात आणि चराच्या तळाची माती वर फेकली जाते. फाळाच्या नांगरामुळे आयताकृती चर तयार होतात. तसेच एका चरातील माती दुसऱ्या चरामध्ये फेकली जाते. त्यामुळे कोठेही जमीन नांगरणीतून सुटत नाही.

४) तव्याचा नांगर

तव्याचा नांगर म्हणजे ज्या नांगरामध्ये माती कापणे , कापलेली माती वर उचलली जाऊन पलटी करण्याचे काम गोल फिरणारे तवेच करतात. यांचा विकास फाळाच्या नांगरातील बॉटमचा जो भाग जमिनीला घासत चालतो त्याऐवजी फिरणारे बॉटम वापरून नांगराचे घर्षण कमी करण्यासाठी झाला . मुख्यत्वे ट्रॅक्टर सोबतच वापरण्याचे नांगर आकाराने फाळाच्या नांगरापेक्षा मोठे असून वजनदार असतात. यामध्ये मुख्य दोन प्रकारचे नांगर उपलब्ध आहेत.
– 1) स्टॅंडर्ड तव्याचा नांगर
– 2) उभ्या तव्याचा नांगर
नांगराचा जो भाग गोल फिरत जमिनीत घुसून खालच्या भागातील माती कापतो . म्हणजेच तो फाळ आणि फाळक्याचे काम करतो . त्याच्या विशिष्ट वक्राकारामुळे कापलेली माती वर उचलली जाते व या तव्यावर घासत उलटून पडते . हे तवे दोन थ्रस्ट बेअरिंगच्या सहाय्याने एका असावर बसवलेले असतात , ज्यामुळे तवे मातीच्या प्रक्रिया बलाच्या विरुद्ध गोल फिरत राहू शकतात . या बेरिंगचे कार्य योग्य प्रकारे चालू राहणे आवश्यक आहे . अन्यथा तवे फिरणे बंद होऊन नांगराचे काम बिघडेल . म्हणूनच या भागाला नियमित ग्रीस लावने गरजेचे आहे.

५) पटाशीचा नांगर

या ट्रॅक्टरचलित नांगरालाच चिजल प्लावू या नावाने ओळखले जाते . फाळाच्या नांगराने जास्त खोलवर नांगरणी करता येत नाही . जेव्हा नांगरणीची खोली 20 ते 40 cm इतकी ठेवणे आवश्यक असेल तेव्हा पटाशीच्या नांगराचा वापर करावा लागतो .
हा नांगर कल्टीवेटर प्रमाणेच दिसतो . परंतु याचे डिझाईन मात्र अशा प्रकारचे असते की कडक जमिनीत सुद्धा खोलवर घुसून जमीन फोडली जाते . या नांगराचे फाळ हे पटाशी प्रमाणे असतात . जाड लोखंडी विशिष्ट आकाराच्या दात्यावर दोन टोके असणारे पोलादी दात बसवलेले असतात . असे 7.9 किंवा 11 दाते एका मजबूत लोखंडी चौकटीवर ‘यु’ आकाराच्या बोल्टना जोडले जातात . नांगर ट्रॅक्टर ला जोडण्यासाठी वर बसवतात.

६) सब सॉयलर :-

पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी , तसेच खारवट चोपट जमीन सुधारण्यासाठी नेहमीच्या मशागतीच्या पातळीपेक्षा खोल मातीचा कठीण थर फोडून शेत तयार करणे आवश्यक असते . तसेच सतत नागरणी करून नांगरणीच्या पट्ट्याच्या खालचा मातीचा थर दाबला जाऊन कठीण बनतो . अशा जमिनीचे नागरणीच्या वेळी साधे नांगर उपयोगी पडत नाहीत . म्हणूनच 50 सेंटिमीटर खोलीवर नागरणी करण्यासाठी सब सॉयलर या अवजाराचा वापर करतात .

सब सॉयलर मध्ये पहारे सारखा टोकदार फाळ मजबूत अशा उभ्या लोखंडी खोडावर तिरकस बसवलेला असतो . हा फाळ जमिनीशी साधारणतः 45 अंशाचा कोण करतो . या नांगराचे खोड 30 ते 40 मीमी जाडीच्या लोखंडी पाट्यापासून बनवतात . हा नांगर कठीण मातीच्या 50 सेंटीमीटर खोल थरात काम करतो . त्यामुळे माती फोडण्यासाठी जवळजवळ 2000 kg इतके ओढ बल आवश्यक असते . सब सॉयलर हे साधारणपणे ट्रॅक्टरने ओढले जातात.

सब सॉयलर चा वापर :-

या नांगराचा वापर दरवर्षी करण्याची गरज नसते व उल्लेख केल्याप्रमाणे विशिष्ट कारणासाठी त्याचा उपयोग केला जातो. हा नांगर ट्रॅक्टर शी जोडताना चाकांच्या मागे मध्यभागी जोडावा म्हणजे ट्रॅक्टर एका बाजूला खेचला जाणार नाही. ट्रॅक्टर चालवताना नेहमी कमी वेगळाच चालवावा. तसेच याचा वापर शक्यतो कोरड्या जमिनीवर करावा , कारण ओल्या जमिनीवर माती बाजूला दाबली जाऊन फक्त चर तयार होतो. कोरड्या जमिनीत सब सॉयलर नेहमीच्या नांगरनीच्या दिशेला काटकोनात चालवावा. कठीण थर फुटून योग्य निचरा व्हावा यासाठी प्रत्येक चार फुटावर चालवावा आणि जमिनीची अवस्था अगदीच वाईट असल्यास प्रत्येक दोन फुटावर चालवावा. अशाप्रकारे सबसॉयलर चालवल्याने जमीन उभी कापली जाते , आजूबाजूला भेगा पडतात आणि कठीण जमिनीच्या संरचनेत बदल होऊन ती सच्छिद्र बनते. सबसॉयलरच्या वापरामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढते व रोपाच्या मुळ्या जमिनीत घुसण्यास मदत मिळते. या कामात माती किंवा ढेकळे वर खाली केली जात नाहीत त्यामुळे जमिनी वरचे आच्छादन टिकून राहते व जलसंधारण होते.

७) रोटावेटर (रोटरी टिलर) :-

हे एक असे यंत्र आहे जे मातीची उलटा पालट न करता बियाणे पेरणीसाठी जमीन तयार करण्यासाठी डिझाईन केले गेले . याचा उपयोग तणाचा नाश करणे , मातीमध्ये खते मिसळणे , गायरानाची जमीन फोडून त्याचे नूतनीकरण करणे आणि ढेकळे बारीक करण्यासाठी होतो . पारंपारिक मशागतिशी तुलना केल्यास रोटरी टीलरच्या सहाय्याने कमी ओढ बलामध्ये जलद मशागत करता येते . कारण की रोटरी टिलर चालवण्यासाठी प्रत्यक्ष ट्रॅक्टर इंजिनची शक्ती पी.टी.ओ. च्या माध्यमातून पाती फिरवण्यासाठी म्हणजेच माती बारीक करण्यासाठी वापरली जाते . त्यामुळे इतर अवजारांप्रमाणे चाकांची घर्षण शक्ती वापरली जात नाही व ताकद वाया जात नाही . इतकेच काय याच्या कार्यामुळे ट्रॅक्टरच पुढे ढकलला जातो. आणि ट्रॅक्टरच्या मागच्या चाकांवर जादा भार देण्याची गरज पडत नाही . म्हणजेच कमी वजनाचा ट्रॅक्टर वापरता येतो व जमीनही दाबली जात नाही . परंतु रोटरी टिलर चालवण्यासाठी फाळाच्या नांगरापेक्षा तिप्पट शक्ती लागते. मशागतीची नियोजन आणि रोटरी टिलर चा योग्य प्रकारे वापर केल्यास नांगरणी आणि कुळवणी या दोन्हीला मूल्यवान पर्याय शेतकऱ्यांना मिळतो . त्यामुळेच हे गोल फिरणारे पात्याची यंत्र भात शेती करणाऱ्या सर्व देशांमध्ये प्रसिद्ध झाले आहे . भारतात हे यंत्र रोटावेटर , कृषी वेटर इत्यादी व्यापारी नावाने विकले जाते.

रोटरी टिलर दोन प्रकारचे असतात.

1)पावर टिलर सोबत जोडलेला
2) ट्रॅक्टरचलित

या दोघांची संरचना सारखीच असते . ज्यामध्ये फ्लांज वर दोन किंवा तीन पात्यांच्या जोड्या बसवलेल्या असतात . या प्लॅज रोटर शाप्टला अशा प्रकार जोडले जातात की मशागतीच्या साचयानुसार गरज पडल्यास काढून टाकता येतील . अथवा इकडून तिकडे हलवता येतील. जेव्हा रोटर शाफ्ट फिरतो तेव्हा प्रत्येक पाते मातीचा छोटा घास कापते . या घासाचे क्षेत्रफळ मशागतीची खोली आणि पुढे सरकण्याचा वेग यांच्यावर अवलंबून असते.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Nangaranisathi Upalabdh Avajaranchi Mahiti

Leave a Comment