Animal Care During Summer
उन्हाळ्यात जनावरांची घेतली जाणारी काळजी
नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळा सुरू झाल्यानंतर तापमान वाढीचा फटका माणसांसहित जनावरांना देखील बसत असतो. तापमान वाढीचा परिणाम गाई म्हशींच्या कार्यक्षमता, प्रजनन , उत्पादकता व आरोग्यावर होत असतो. तापमान वाढीमुळे जनावरांच्या श्वसनाचा वेग वाढू लागतो . ते प्रतीमिनीट 27 ते 30 वेळा श्वासोच्छ्वास घ्यायला लागतात.
तापमान 36° c च्या वर गेल्यास संकरित जनावरांच्या खाण्याचे प्रमाण कमी होते. जनावरांचे मेंदूत असलेल्या हायपोथेलेमस या भागांमध्ये हिट गेन (heat gain) व हिटलॉस (हॅट loss)अशी दोन केंद्र असतात. तापमान 40-41 च्या वर गेल्यास जनावरांच्या श्वासनाचा वेग आणखी वाढतो . तोंड उघडे ठेवून जनावरे धाप घेऊ लागतात.
म्हशीन मध्ये गाईंच्या तुलनेत घामग्रंथींची संख्या कमी असते. त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास अधिक होतो.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
- अति तापमान, आर्द्रता, अतिरिक्त स्नायू काम.
- मालवाहक जनावरांद्वारे केली जाणारी जड कामे.
- उन्हात अतिरिक्त काम, पिण्याचे पाणी वेळेवर न मिळणे किंवा पुरेसे न मिळणे.
- उपाशी जनावरांकडून कामे करून घेणे.
- बैलगाडीसह उन्हात उभे ठेवणे, बैलांवरील ओझे कमी न करता त्यांना उन्हात उभे ठेवणे, बांधणे.
- गोठ्यांचे नियोजन व्यवस्थित नसणे, खेळत्या हवेचा अभाव, कोंदटपणा, पत्र्याचे छत.
- दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे.
- सूर्यप्रकाश सरळ गोठ्यात शिरणे.
- गाई, म्हशींना भर उन्हात रानात चरायला नेणे. चरून आल्यावर मुबलक पिण्याचे पाणी न मिळणे.
- भर उन्हातून आलेल्या जनावरांवर लगेच थंड पाणी ओतणे.
Animal Care During Summer
जनावरांची काळजी कशी घ्याल
1) गोठा मुक्त उशीर असावा व जनावरांची संख्या कमी असावी. प्रखर सूर्यप्रकाशापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठ्यास चांगले छत असावे.
2) जनावरांना शक्यतो थंड जागी बांधावे . तसेच उन्हापासून व उष्ण वाऱ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून गोठ्याच्या भोवताली झाडे लावावी.
3) उन्हाळ्यात जनावरांना शक्यतो पुरेसं पाणी मिळत नाही व जनावरे आणलेली राहतात . त्याकरता जनावरांना दिवसातून पाच ते सहा वेळा मुबलक प्रमाणात पाणी पाजावे. 4 रात्री व सकाळी दूध काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर जनावरांना पाणी पाजावे. एक लिटर दुधासाठी साधारणपणे तीन लिटर पाण्याचे आवश्यकता असते. जनावरांना दिवसाला 90 ते 100 लिटर पाण्याची गरज असते. तसेच दूध काढण्यापूर्वी जनावरांना थंड पाण्याने धुवावे.
5) उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाळलेला चारा कमी करून हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे . हिरवा चारा नसेल तर आहारात खुराकाचे प्रमाण वाढवावे.
6) क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी 20 ते 30 ग्रॅम क्षार मिश्रण चाऱ्यातून द्यावी .
7) सण स्ट्रोक , हिट स्ट्रोक यासाठी बऱ्याच वेळी घरगुती उपचार केल्यासही चांगला फायदा होतो.
8) पाण्यात बर्फ टाकून त्या थंड पाण्याने रोगी जनावर वारंवार धुवावे किंवा थंड पाण्याचा गोंडपाठ किंवा कापड भिजवून अंगावर ठेवावे. ज्यामुळे कातडीच्या खालील नसा आकुंचन पावतील व जनावरांचे उष्मघातापासून संरक्षण होईल.
9) शक्य असल्यास पंख्याची सोय ठेवावी . रोगी जनावर थंड व मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी बांधावे.
10 ) 50 मिली कांद्याचा रस त्यामध्ये दहा ग्रॅम जिऱ्याची पूड आणि ५० ग्रॅम खडीसाखर मिसळून पाजावे.
11) मीठ आणि साखर पाण्यात मिसळून पाजल्यास सन स्ट्रोक , हिट स्ट्रोक यासाठी चांगला फायदा होतो.
उष्माघाताची जनवरांमधील लक्षणे :-
- वाढलेले शारीरिक तापमान (१०३ ते ११० अंश फॅरानाईट ) हे उष्माघाताचे प्रथम लक्षण आहे.
- जनावराच्या हृदयाचे ठोके वाढतात, श्वसनाचा वेग वाढतो व धापा टाकते, तोंडावाटे श्वास घेतो.
- त्वचा कोरडी व गरम पडते.
- खुराक, चारा खाणे कमी अथवा बंद करते.
- सुरवातीला अतिरिक्त घाम व तोंडातून सतत लाळ गळते.
- जनावरास तहान लागते, जनावर हे पाण्याच्या स्त्रोताकडे जाते, पाण्यामध्ये बसण्याचा किंवा पाणी अंगावर घेण्याचा प्रयत्न करते.
- जसजशी शारीरिक तापमानात (१०७ अंश फॅरन्हाईट) वाढ होते, तसतसे जनावर धाप टाकते. अशा अवस्थेत कोसळून खाली पडणे, ग्लानी येणे.
- घाम गेल्यामुळे, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे असंतुलन होऊन अशक्तपणा येतो.
- सोडियमची कमतरता झाल्यास जनावरांमध्ये पाणी पिण्याची इच्छा मरते. पाण्याची कमतरता निर्माण होते.
- तीव्र उन्हाच्या चटक्यांमुळे पोटदुखीची लक्षणे दिसतात. प्रामुख्याने उठबस कारणे, पाय झाडणे, थेंब थेंब लघवी करणे, घट्ट शेण टाकणे ही लक्षणे दिसून येतात.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌