Medicinal Benefits Of Javas ( FLAXSEED)
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे जवस हे पीक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
१) जवस तेलामध्ये 58% ओमेगा 3 , मेदामल् आणि एंटीऑक्सीडेंट आहेत. त्यामुळे हृदयरोगाला कारणीभूत असलेले विकार, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लीसराईड यांचे प्रमाण कमी होते. संधिवात सुसह्य होती. मधुमेह आटोक्यात येतो. कर्करोग व इतर रोगांना प्रतिकार शक्ती निर्माण होते.
2) या पिका कधीचा मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. हेक्टरी दहा गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून व वखराच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
3) कोरडवाहू पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर बागायती पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात करावी.
4) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास कार्बेडाजीम दोन ग्रॅम किंवा थायरम तीन ग्रॅम लावावे.
5) लागवडीकरिता एन एल – ९७ किंवा पी के व्ही एन एल 260 या अधिक उत्पन्न देणाऱ्या वानांचा वापर करावा.
6) या पिकात जवस हरभरा, जवस करडई (4:2) , जवस मोहरी (5:1) या प्रमाणात घेता येते.
7) पिकाची पेरणी मुख्यत्वे झाडाच्या तीफणने करावी. दोन ओळीतील अंतर 30 सेंटिमीटर ठेवावे. पेरताना बियाणे योग्य खोलीत पडेल याची काळजी घ्यावी. प्रति हेक्टरी 25 किलो बियाणे वापरावे.
8) कोरडवाहू पिकाला हेक्टरी 25 किलो नत्र व पंचवीस किलो स्फुरद तर ओलीत पिकाला 60 किलो नत्र व 30 किलो स्फुरद या प्रमाणात घ्यावे.
9) या पिकाला पहिले ओलित पिक फुलोर्यावर असताना म्हणजेच 40-45 दिवसांनी व दुसऱ्या ओळीत 65 – 70 ( बोंड्या धरण्याच्या वेळेस) दिवसांनी द्यावे.
Medicinal Benefits Of Javas ( FLAXSEED)
10) जवसाचे पीक पहिले तीस दिवस तण विरहित ठेवले तर उत्पादनात वाढ होते. पेरणीनंतर 25 दिवसांनी पहिली डवरणी करणे आवश्यक आहे. तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेता निंदन करावे. व तणांच्या अवशेषाचे आच्छादन करावे.
11) पिकाची पाने व बोंड्या पिवळ्या पडल्यावर पीक काढण्याचे योग्य समजावे. या पिकाची कापणी विळ्याच्या सहाय्याने करावी. कापणी झाल्यानंतर चार-पाच दिवस वाळवून मळणी करावी व बी योग्य प्रकारे साठवून ठेवावे.
12) या पिकावर गादमाशीच्या प्रादुर्भाव आढळल्या 15 दिवसाच्या अंतराने अझाडीरक्तीन 300 पीपीएम 50 मिली किंवा एसीटॅमीप्रीड 20 एस पी दोन ग्रॅम किंवा ईमीडकलोप्रिड 17.8 एस एल 2.5 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या करावे.
13) या पिकात अल्टरनेरिया लाईट या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास बीज प्रक्रिया थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास करावी. आणि मेन्कोझेब
0.25 % 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
14) भुरी रोगाचे नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी 25 ग्रॅम किंवा कराथेन 5 मिली दहा लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. मर रोगाला थायरम बीजप्रक्रिया करावी किंवा पाच ग्रॅम प्रति किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी बियाण्यास चोळवे.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌