बहुगुणी गिरीपुष्प : Benefits Of Giripushp Plant Best 0

Benefits Of Giripushp Plant

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बहुउपयोगी गिरीपुष्प या झाडाबद्दल. गिरीपुष्पाची लागवड शेत जमिनीत करणे फायदेशीर ठरते. कारण त्यापासून मिळणारी हिरवी पाने व फांद्या कापून जमिनीत मिसळून दिल्यास जमिनीची सुपीकता वाढविता येते. तसेच खडकांची झीज होऊन जमीन चांगल्या प्रकारे तयार होण्यासही मदत होते. या झाडाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. त्यात पहिली पद्धत छाट कलम तयार करणे व दुसरी पद्धत झाडांच्या बियांपासून रोप तयार करून करता येते. कलम तयार करण्याच्या पद्धतीत झाडांचे छाट कलम साधारणपणे एक वर्ष वयाची झाडापासून किंवा त्याच्या फांदीपासून तयार करावे. फांदीची जाडी 1.5 ते 2 सेमी, लांबी 50 ते 100 सेमी असावी. लागवड करताना छाट कलमाची खालची बाजू जमिनीत साधारण 20 ते 50 सेमी खोल रुजवावी. लागवड पावसाळ्यात जमिनीत ओलावा असताना करावी. दोन झाडांतील अंतर 50 सेमी ठेवावे. बियांपासून रोप तयार करण्यासाठी गिरीपुष्प झाडाच्या बिया उपलब्ध करून त्या आठ ते दहा तास पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर लाल माती , रेती आणि शेणखत यांचे 1:1:1 या प्रमाणात मिश्रण तयार करून साधारण 500 ग्रॅम मिश्रण प्लास्टिक विषयी भरावे व त्यामध्ये टोकन पद्धतीने लागवड करावी आणि नियमित पाणी द्यावे. गिरीपुष्पाचे रोप तीन ते चार महिने वयाचे झाल्यानंतर पावसाळ्यात लागवड करावी. दोन झाडांतील अंतर साधारणपणे 50 सेमी ठेवावे. हे झाड वेगाने वाढत असल्यामुळे छाटणी करणे आवश्यक आहे.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

साधारणपणे एक वर्ष वयाचे झाल्याबरोबर छाटणी करावी. छाटणी करताना जमिनीपासून 60 ते 75 cm वरून करावी. या झाडाची छाटणी वर्षातून तीन वेळा करावी. जून, नोव्हेंबर व मार्च तीन महिन्यात छाटणी केल्यानंतर हिरवी पाने व फांद्या बारीक कापून याचे मिश्रण तयार करावे व नंतर ते जमिनीत किंवा मातीत मिसळून द्यावे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते व त्यासोबत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवून जमिनीचे जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मांमध्ये अनुकूल बदल होतो. जमिनीची सुपीकता वाढते तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. याचा फायदा रासायनिक खतांवर व ओलीतावर होणारा खर्च कमी करता येतो.

Benefits Of Giripushp Plant

बहुगुणी गिरीपुष्प :-

शाश्वत विकासाच्या वाटेवर चालताना सेंद्रिय शेती भूमी- जल व इतर संसाधनांचा कार्यक्षम, काटकसरीने वापर करणे निकडीचे झाले आहे. कमीत कमी वेळात, कमी खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार वनस्पतीजन्य उत्पादने व पर्यावरण सुलभ शिकस्ता राबविला जात आहे. त्यात खारीचा परंतु मोलाचा वाटा उचलणाऱ्या मानबिंदू गिरीपुष्पाबद्दल थोडक्यात पाहूयात.

मध्य अमेरिका आणि मेक्सिकोतून याचा विस्तार जगभर पसरला. वेस्टइंडीज मधून श्रीलंकेत आणि त्यानंतर गिरीपुष्पला भारतात आणला गेल. विशेष म्हणजे ही वनस्पती परप्रांतीय असून सुद्धा भारतात आणि भारतीय उपखंडात उत्तमरित्या वाढते. याचा वृक्ष प्रकार पानझडी झुडूपात मोडत असून फांद्या आणि खोड हरणाच्या शिंगाप्रमाणे फोफावते. याची साल गुळगुळीत हिरवट करड्या रंगाची असून उंची साधारणपणे 10 ते 12 सेमी पर्यंत वाढते. पानांचा आकार चमचा सारखा असून त्यावर मेणसर चमक आढळते. याची सोटमुळे जमिनीत खोलवर पसरत असल्याने माती घट्ट धरून ठेवतात. बि आणि शेंगा आकर्षक गडद काळसर, मरून रंगाचे असतात. प्रजनन बी रुजून किंवा दोन-तीन सेमी जाडीच्या फांद्या लावून केली जाते. बीज प्रसार हवेमार्फत होऊन पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवून येण्यात गिरीपुष्पाचे प्रमाण लक्षणीय आहे. निळ्या, पांढऱ्या, गुलाबी , रंगाचे संकरण असलेल्या रंगछटांतील फुले पर्नरहीत फांद्यांवर फुलतात हे याचे खास वैशिष्ट्य आहे. पानगळती झाल्यानंतर फुलांचे डेरेदार झुपके मन आणि वातावरण प्रसन्न करतात. भरसगच्च फुलांच्या ताटव्यांमुळे शोभेची झाड म्हणून गिरीपुष्प बागेची शोभा वाढविते.

जलदवाढच्या विशेष गुणांमुळे गिरीपुष्प प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूल ठरते. सन्मुख हवामानातही जुळवून घेणे याला सहज शक्य असल्याने याची जोपासणी करणे सोपे होय. उपजतच कमी पाण्यावर वाढण्याची क्षमता व दव-गारव्यासाठी असहिष्णुता धोरण वृक्ष लागवड व वनीकरणाकरिता खूप किफायतशीर ठरते.

रायझोबियम जिवाणू याच्या मुळांवर सहजीवी पद्धतीने सहजरीतीने गाठी विकसित करीत असल्याने नत्र स्थितीकरण प्रभावीपणे केले जाते. त्यावर कोणती पूर्व प्रक्रिया करणे गरजेचे नसल्याने कमी खर्चात मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेता येते. पालापाचोळ जमिनीत जलदरीत्या कूजत असल्याने पोषक घटक द्रव्यांचे पुनश्चिकरण लवकर होते.

वातावरणातील कार्बन जमीनीत थोपवून धरण्यात इतर वनस्पतींबरोबर याची भागीदारी वैश्विक तापमान वाढीला आळा घालण्यासाठी उपयुक्त आहे. चहा, कॉफी, कोको अशा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पिकांसाठी याची सावली दर्शनीय ठरते.

शेंगा उंदीराना आकर्षित करीत असल्याने बियांच्या सेवनाने उंदरांचा वावर कमी होतो. साल आणि पाणी एकत्रितपणे तांदळा सोबत शिजवून तयार केलेल्या भाताचे सेवन उंदीरमारीचे काम करते. गिरीपुष्पाची वाढ मोठ्या संख्येने असलेल्या भागात मच्छर, डास इत्यादींचा परादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Benefits Of Giripushp Plant

Leave a Comment