Ganesh Chaturthi
गणेश पूजन आणि ऋषिपंचमी या तीन दिवसांमध्ये पूजेसाठी विविध पत्री वापरले जातात. या तीन दिवसात वापरल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या वनस्पती अतिशय औषधी आहेत. त्यातल्या काही महत्त्वाच्या औषधी पत्रांचे गुणधर्म जाणून घेऊया. सर्व दूर गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहेत. ज्यांच्या घरी गणपती उत्सव असतो त्यांची लगबग सुरू असेल. साफसफाई, गणपतीची आरास, त्याचा प्रसाद अशी सगळी तयारी करावी लागते. त्यातही सगळ्यात मुख्य तयारी केली जाते ती म्हणजे गणेश पूजनाची. कारण गणेश पूजनात 21 पत्री म्हणजे पानं वापरली जातात.
दहा दिवस गणपतीची पूजा चर्चा करायची म्हणजे ही पत्रे आणि फुलं आधीच आणून ठेवावे लागतात. मात्र या गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रि किवा फुल याला काही ना काही औषधी महत्त्व आहे. 21 पैकी काही पत्रींच औषधी महत्त्व जाणून घेऊया..
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
दूर्वा म्हणजे जमिनीवर पसरणारा एक प्रकारचा गवत असत. आयुर्वेदातही दुर्वाला महत्त्व आहे. तसेच गणपतीला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच दुर्वाचा हार गणपतीला वाहीला जातो.
दुर्वा प्रकृतीने थंड असतात. रक्तदोष दूर करतात. उष्णतेमुळे नाकातून रक्त येतं त्यासाठी दुर्वाचा रस नाकात घातला जातो. त्यामुळे लवकर आराम मिळतो. पित्त झालेल्या लोकांनी खडीसाखरे बरोबर दुर्वाचा रस प्यायल्याने पित्त कमी होतात. नागिन सारखे अनेक त्वचा विकार दूर होण्यास मदत होते. आजकाल प्रत्येक जण संगणकावरच काम करतात सतत संगणकावर बसल्याने डोळ्यांची जळजळ होऊ शकते अशा वेळी दुर्वाचा रस घातल्याने आराम होतो.
सकाळी किंवा पहाटेच्या वेळी दुर्वावर अनवाणी चालल्याने दृष्टीदोष कमी होण्यास मदत होते. डोळ्यांवरचा ताण कमी होतो. दुर्वा अतिशय थंड असतात. नाकातून रक्त येत असल्यास दुर्वाचा रस व खडीसाखर एकत्र करून दिल्यास रक्त येणे थांबते. विष मज्वरातील ताप ज्यावेळी वाढतो अंगाची अतिशय आग होते त्यावेळी दुर्वाचा रस हे अमृत समान औषध आहे. अतिसार रक्तातीसार दुर्वा रसाने बरे होतात. आगी जवळ काम करणारे तसेच गॅस जवळ सतत काम करणारे गृहीनी यांनी आगेची उष्णता व त्यामुळे येणाऱ्या घामाने जे त्वचारोग होतात म्हणजे खाज सुटणे त्यावरही दुर्वांचा रस उपयोगी आहे. दुर्वा व तांदूळ समभाग एकत्र वाटून याचा जाड लेप तयार करून लावल्यास मस्तकातील उष्णता कमी होते. आगपैनी यावर सुद्धा दुर्वाचा वाटून लेप लावावा.
Ganesh Chaturthi
केवडा :-
गणपतीला केवड्याचं पान किंवा फुल वाहिले जातात. केवड्याच फूल हे बुद्धीवर्तक आहे. गणपती ही तर बुद्धीची देवता असल्याचा मानले जातात. म्हणूनही हे फुल वाहिले जातात . अपस्मरावर केवड्याची फुले आणि केवड्याच्या कणसावरील बारीक कण एकत्र करून तयार केलेले मिश्रणाचा नस्य घ्यायला सांगितलं जातं. तसंच केवड्याच्या पारंब्या ही बलकर असतात . Thyroid च्या विकारावरही केवड्याचा उपयोग होतो .
जास्वंद :-
हे गणपतीला आवडणार फूल . पांढरी , पिवळी , गुलाबी , आणि लाल अशा विविध रंगांमध्ये हे फूल उपलब्ध असले तरी गणपतीला लाल रंगाच फुलच अधिक प्रिय आहे . रंग वेगवेगळे असले तरी त्या सर्व फुलांचे गुणधर्म हे सारखेच आहेत . जास्वंदीच्या फूलमुळे केसांची वाढ उत्तम होते . फूल वाटून त्याचा रस केसना लावला तर केस काळे होतात आणि त्यांची वाढ होते .
अगस्ती :-
अगस्तीला आपण हादगा म्हणूनही ओळखल जात . याच्या फुलांची भाजी केळी जाते . या फुलांमध्ये अनेक जीवांसतवंचा खजिना आहे .
मधुमालती :-
मधूमालती ही वनस्पति शहरातही अगदी सहज उपलब्ध आहे . गुलाबी, पांढरी, पिवळी अशा रंगांची ही फुले असतात .फुफ्फुसाचे विकार , त्वचारोग , सांधेदूखी , पोटातील जंत ,आदि विकरांवर या वनस्पतीचा उपयोग होतो .
शमी:-
शमीला अग्निदेवता म्हणतात. म्हणून यज्ञाच्या ठिकाणी या वनस्पतीचा उपयोग केला जातो. कोरड्या हवामानात वाढणारे हे झाड त्वचारोग, दमा, मूत्रपिंड, या आजारांवर प्रभावी आहे.
माका :-
डोंगरदऱ्यांमध्ये वाढणारी ही वनस्पती म्हणजे रसायनी आहे. म्हणजे कोणतेही रोगांवर रामबाण उपाय म्हणून ही वनस्पती वापरली जाते. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी विकारांवर याचे औषध वापरले जाते.
बेल:-
एरवी शंकराचे आवडीचे पान म्हणून बेल ओळखले जातात. मात्र गणेश चतुर्थीला मात्र गणपतीला मान दिला जातो. ही वनस्पती पोटातील जंत यांवर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींमध्ये हिचा उपयोग होतो.
धोतरा:-
कोणत्याही जागेत उगवणारी ही विषारी वनस्पती आहे. काटेरी लांब नरसाळ्यासारखी याची फूल विविध रंगात उपलब्ध आहेत. हे फुल दमा , कफ, संधिवात आदि रोगांवर उपयुक्त ठरते.
तुळस:-
एरव्ही गणपतीला दुर्वाशिवाय कोणतीही वनस्पती वाहत नाहीत. मात्र गणेश चतुर्थीला गणपतीला तुळस वहिनी जाते. हे औषधी वनस्पती अजून ऑक्सिजन पुरवणारी आहे. खूप दमा, सर्दी, कीटकदंश, आणि कॅन्सर सारखे विकारांवर ही अतिशय उपयुक्त वनस्पती आहे.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌