Uses And Benefits Of 4 Oils For HEALTH
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आरोग्यासाठी उपयुक्त तेल. आपल्या आहारामध्ये आपण तेलाचा उपयोग करत असतो. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार तेलाचा वापर आपल्या स्वयंपाकात करत असतात. परंतु त्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याची पुरेशी माहिती आपल्याला नसते. आरोग्यासाठी कोणते तेल फायद्याचे आहे किंवा कोणत्या तेलाचा आपल्या आहारात समावेश केल्यास आपल्या आरोग्याला फायदा होतो त्याबद्दल या लेखात आपण माहिती घेऊ.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
नाशपाती विषयी थोडक्यात माहिती:-
तेलाचे वेगवेगळे प्रकार व त्यांचे आरोग्यदायी फायदे:-
शेंगदाणा तेल :-
शेंगदाणा तेलामध्ये सगळ्याच प्रकारचे फॅट असतात. शेंगदाणा तेलाचे आरोग्याच्या दृष्टीनं अनेक फायदे आहेत. त्वचेच्या आरोग्यासाठी या तेलाचा वापर लाभदायक ठरतो. स्किन एजिंग रोखण्यासाठी आपण या तेलाचा वापर केला पाहिजे. शेंगदाणा तेलामुळे त्वचेला आर्द्रता मिळते. सूर्याच्या हानीकारक अतिनील किरणांपासून संरक्षण मिळते. शेंगदाणा तेलात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अकाली वृद्धत्वाची लक्षणं यामुळे दूर राहतात.
इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यासाठी शेंगदाणा तेल फायदेशीर ठरतं. इन्शुलिनच्या प्रतिकारामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारणं गरजेचं असतं. शेंगदाणा तेलातील ऑलिक अॅसिड इन्शुलिन निर्मितीत अडथळा आणणाऱ्या इन्फ्लेमेटरी सायटोकाईन टीएनएफ-अल्फाचा प्रभाव कमी करण्यास मदत करतं.हे फॅट हृदयविकारापासून बचाव करतात. शेंगदाणा तेलामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे तयार होणारे फ्री रॅडिकल्स रोखतात आणि आपला कर्करोगापासून बचाव होतो. शेंगदाणा तेल आपल्या शरीरामध्ये वाहणाऱ्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
तिळाचे तेल :-
तिळाचे तेल दोन प्रकारचे असते. म्हणजे रिफाइंड आणि दुसऱ्या म्हणजे नॉन रिफाइंड. रिफाइंड न केलेले तिळाचे तेल अन्नाला सुगंध देते. तिळाच्या तेलात विरघळणारे अँटिऑक्सिडंट असतात. फ्री रॅडिकलची निर्मिती रोखतात. तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचाही गुणधर्म असतो. तिळाचे तेल आपल्या नसा आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. तिळाचे तेल रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच पोटाचे समस्यांवर तिळाचे तेल रामबाण उपाय आहे. जे लोक नेहमी वापरतात ते ताण-तणावावर सुद्धा मात करू शकतात. तिळाच्या तेलात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते सांधेदुखी आणि वात यासाठी उपयोगी आहे.
Uses And Benefits Of 4 Oils For HEALTH
सूर्यफूल तेल :-
- या तेलामध्ये ई जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. तसेच सनफ्लावर तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असतात. सन फ्लावर तेलामध्ये पॉलि सॅच्युरेटेड फॅट आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असतात. त्यामुळे ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. म्हणून सनफ्लॉवर तेल हृदयासाठी उपयुक्त आहे.
- सूर्यफूल तेलामध्ये असलेले ओलिक ऍसिड कोरड्या, वृद्धत्वाच्या त्वचेवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. सूर्यफूलचे तेल त्वचेद्वारे सहजपणे शोषले जाते, हरवलेला ओलावा भरून काढण्यासाठी तसेच त्वचेतील छिद्रे न अडकवता तेल पुनर्संचयित करते.
- सूर्यफूल तेलामध्ये असलेले ओलिक ऍसिड खनिज वाहतूक, प्रतिकारशक्ती आणि संप्रेरक प्रतिसादासाठी महत्वाची भूमिका बजावतात. तसेच मेंदूचे कार्य व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.
- सूर्यफूल तेलामध्ये असलेले लिनोलिक ऍसिड रक्ताच्या गुठळ्या रोखण्यास मदत करते. स्नायूंचे आकुंचन सुधारते आणि पेशींच्या पडद्याच्या निर्मितीस मदत करते.
- सूर्यफूल तेलात व्हिटॅमिन ई मुक्त रॅडिकल्स तटस्थ करून कोलन कर्करोगापासून संरक्षण देते. यामध्ये असलेले कॅरोटीनॉइड्स गर्भाशय, फुफ्फुस आणि त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करतात.
- सूर्यफूल तेल केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते आणि कोरड्या, कुरळ्या केसांवर उपचार करण्यास मदत करते.
- सूर्यफूल तेलातील लिनोलेनिक ऍसिड केस गळती थांबवते आणि गुळगुळीत रेशमी केस देते.
- सूर्यफूल तेलबद्धकोष्ठता उपचार करण्यासाठी वापरले जाते. जखमा, संधिवात, सोरायसिस इत्यादी बरे करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.
- सूर्यफूल तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई एक्जिमासारख्या त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.
करडई तेल :-
करडई तेलामुळे वजन कमी करण्यास मदत होते. करडई तेल पेशींचे आवरण मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे पेशींमध्ये विषारी घटकांना आत जाण्यास मज्जाव होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. करडई तेल हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. त्यामुळे हे तेल मधुमेहांसाठी फायदेशीर आहे.
महत्त्वाचे म्हणजे शक्य असेल तर सेंद्रिय रिफाइल न केलेले वनस्पती तेल वापरावे. कच्चे तेल वापरायचे असेल तर शुद्ध ऑलिव्ह तेल वापरा. पण त्याचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी करू नये.एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की थंड प्रक्रिया केलेले आणि सेंद्रिय तेल रिफाइंड तेलापेक्षा चांगले असतात. तेलाना रिफाइंड केल्यामुळे त्यांचे आरोग्यदायी गुण कमी होतात.
तेलांचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे पण आहेत. म्हणून असे तेल वापरा की ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
ट्रान्सलेट असलेले तेल टाळा. वनस्पती तेलात ट्रान्सलेट जास्त असतात. त्यामुळे ते शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात. हृदयविकार होण्याची संभावना असते. यामुळे तेल असे वापरा की त्याचा स्मोक पॉइंट जास्त आहे. त्यात अँटिऑक्सिडंट व विटामिन जास्त प्रमाणात असतील तर फारच चांगले.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌