11 Medicinal Benefits Of Lemon Grass
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गवती चहा हे कशाप्रकारे औषधी वनस्पतीचे काम करू शकते आणि गवतीच्या या आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. पारंपारिक शेतीला बगल देत शेतीमध्ये नवे प्रयोग करणं ही सध्या शेतकऱ्यांसाठी काळाची गरज बनली आहे अनेकदा लहान शेतकऱ्यांना इच्छा असून सुद्धा शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा धोका पत्करणे शक्य होत नाही. पण मोठ्या शेतकऱ्यांनी थोडसं धाडस दाखवून नवा प्रयत्न केल्यास तो यशस्वी ठरू शकतो . लहान शेतकऱ्यांसाठी सुद्धा तो प्रयोग नवी दिशा देणारा असतो. गवती चहाची लागवड करण्यासाठी लेमन ग्रास ची रोपे डेहरादून हून मागवली जातात. एका रोपाची किंमत अडीच रुपये इतकी आहे . एका एकरासाठी 22000 रोपांची गरज असते. एक एकरासाठी रोपांचा खर्च 55 हजार रुपये इतका आहे . आणि पाच हजार रुपये लागवडीचा खर्च आहे. एका वेळेस लागवड केल्यानंतर सलग सहा वर्ष यातून उत्पन्न मिळतं. एक एकरात दरवर्षी 60 ते 70 हजारांचा उत्पन्न मिळत. खूप पाणी आणि खूप मशागतीची गरज नसल्याने हे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीस्कर ठरतं. शेतीत नवे प्रयोग करताना उत्पादनासाठी उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठेचा योग्य अभ्यास केला तर शेतकऱ्यांचे कष्ट आणि गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता कमी होते.
11 Medicinal Benefits Of Lemon Grass
गवती चहामध्ये अनेक प्रकारचे औषधी घटक आढळतात जसे विटामिन ए विटामिन b1 b2 b3 b5 b6 विटामिन सी आणि फोलेट. याशिवाय शरीराला आवश्यक असणारे मिनरल्स तसे पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक, कॉपर आणि मगेनिझ हे देखील मुबलक प्रमाणात आढळून येतात. या गवती चहाचा वापर आपण ताजी पाने असताना किंवा ती सुकवून देखील करू शकता. गवती चहाच्या वनस्पतीचे तेल देखील तितकेच उपयुक्त आहे. पचनक्रिया सुरळीत चालवण्यासाठी या गवती चहाचा वापर केला जातो. यामध्ये असणारे सायट्रल पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत करते. आणि यामुळेच बऱ्याच वेळा जेवणानंतर गवती चहा दिला जातो. असा हा गवती चहा पिल्याने आपल्याला पित्त, जळजळ आणि ऍसिडिटी सारख्या समस्या कधीच उद्भवणार नाही. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी देखील या गवती चहाचा पुरेपूर वापर होऊ शकतो. गवती चहाच्या युरेटिक गुणधर्मामुळे शरीरातील निरुपयोगी आणि अपायकारक घटक शरीराबाहेर फेकले जातात. शिवाय या चहाने किडनी आणि लिव्हरची कार्यक्षमता वाढून शरीर निरोगी बनते.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
गवती चहा बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. बारीक आकारात कापलेली ताजी किंवा वाळवलेली गवती चहाची पाने उकळत्या पाण्यात टाकावे. झाकण ठेवून या पानांना चांगल्या प्रकारे उकळवून घ्यावे. यानंतर गाळणीने गाळून घ्यावे. यात आपल्या आवडीनुसार गोडपणा येण्यासाठी मध टाकावे आणि अशा प्रकारें आपल्याला निरोगी ठेवणारा गवती चहा तयार झालेला असेल . गवती चहा जरी आरोग्यवर्धक असला तरी त्याचे अतिसेवन माणसाला सुसती आणतो. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी असायला हवे. गर्भवती महिलांनी यांचे सेवन शक्यतो टाळावे. याची एलर्जी असणाऱ्यांनी तर हा चहा पिऊ नये.
11 Medicinal Benefits Of Lemon Grass
गवती चहासाठी निचरा होणारी, पोयट्याची किंवा रेताड जमीन सुद्धा योग्य असते. या गवताच्या कठीणपणामुळे विविध प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेता येते. केरळमध्ये हे गवत, बरड व उताराच्या जमिनीवर लावतात, त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते.गवती चहाची लागवड सर्वसाधारणपणे खरिपामध्ये करावी. लागवडीसाठी ठोंबा(खुंटा)पासून, तसेच बियांपासून रोपे मिळविता येतात.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌
गवती चहाचे फायदे:-
- गवती चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते
- गवती चहा पिल्याने सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास कमी होतो.
- गवती चहा मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, सुज येणे पोटासंबंधी समस्या दूर होतात.
- गवती चहा पिल्याने केस मजबूत होतात आणि केस गळती कमी होते.
- वजन कमी करण्यासाठी गवती चहा पिणे फायदेशीर आहे.
- गवती चहा मध्ये विटामिन ए, बी, सी, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, आर्यन असते.
- गवती चहामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात.
- गवती चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी गवती चहा प्यावा.
- गवती चहा हा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विरोधी बुरशीजन्य गुणधर्म आहे. ज्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला आणि फ्लूचा सामना करण्यास मदत होते.
- गवती चहा पोटॅशियम समृद्ध आहे. ज्यामुळे रक्तपरिसंचारण उत्तेजित होते आणि रक्तदाब कमी होतो. रक्तपरीसंचरण वाढवून यकृत शुद्ध करण्यात देखील मदत करते. नैसर्गिकरीत्या त्वचा आणि केस उत्तम ठेवण्यासाठी गवती चहा गुणकारी आहे.
- विटामिन ए आणि विटामिन सी चा एक चांगला स्रोत आहे. जो सुंदर त्वचा आणि केसांसाठी आवश्यक पोषक आहे. आपल्या शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी आपण नियमित गवती चहा वापरात आणू शकतो.