आंतरपीक पद्धत : शाश्वत पीक उत्पादनासाठी फायदेशीर Antarpik Paddhat Benefits Best 8 Points

Antarpik Paddhat

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शाश्वत पीक उत्पादनासाठी आंतरपीक पद्धत. आंतरपीक घेत असताना महत्त्वाचे आठ गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे तर कोणत्या आहेत त्या गोष्टी हे आपण जाणून घेणार आहोत.

1) सर्वात महत्वाचं म्हणजे एकदल जर आपलं मुख्य पीक असेल तर त्यामध्ये घेतले गेलेले आंतरपीके द्विदल असले पाहिजे किंवा मुख्य पीक जर द्विदल असेल तर आंतरपीक एकदल असलं पाहिजे.

आता एकदल मध्ये काय येतं तर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. तर मित्रांनो हे एकदल वर्गीय पीक आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला आंतरपीक घ्यायचं तर ते द्विदल असले पाहिजे. म्हणजे दोन दलाचा असला पाहिजे ज्यामध्ये हरभरा किंवा तूर येतात.

2) त्यानंतर महत्वाचा दुसरा मुद्दा असा की आपल्या मुख्य पिकाच्या मुळे जर खोलवर जाणार असतील तर आपले जे अंतर पीक आहे त्याची मुळे वर राहायला पाहिजे खोलवर जायला नको. मग याच्या उलट आपल्या मुख्य पिकाची मुळे जर वर राहणार असेल तर आंतर पिकाची मुळे खोलवर जायला हव्यात आणि याच्यामुळेच आपले आंतरपीक व्यवस्थित येऊ शकते.

3) याच्यानंतर जे आयुष्यमान असते पिकाचे ते सर्वात महत्त्वाचा तिसरा मुद्दा आहे. आंतरपीक ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळी मुख्य पीक याचे आयुष्य एक तृतीयांश किंवा अर्ध असला पाहिजे. जर मुख्य पीक 180 दिवस आपल्या शेतामध्ये राहिले तर आंतरपीकाचा कालावधी ९०  दिवसात असला पाहिजे. म्हणजे मुख्य पिकाच्या अगोदर निघणारे पिके असले पाहिजे आणि तो कालावधी आपल्याला समजून घेतला पाहिजे. याचा फायदा असा होईल की आंतरपीक आपल्याला लवकर निघाल्यानंतर मुख्य पिकासाठी जास्त कालावधी मिळेल.

4) आंतरपीक घेत असताना उंची मुख्य पिकापेक्षा जास्त नसावी. म्हणजे आंतर पिकाची जर उंची वाढली तर मुख्य पीक खाली राहील आणि आंतरपीक वर गेल्यामुळे आंतर पिकाची सावली मुख्य पिकावर येते आणि सूर्यप्रकाश घेण्यासाठी या दोघा पिकांची स्पर्धा लागते म्हणूनच आंतर पिकाची उंची ही मुख्य पिकापेक्षा कमी असावी.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

5) सर्वात महत्त्वाचा पाचवा मुद्दा असा की आंतर पिकाची वाढण्याची गती ही मुख्य पिकापेक्षा लवकर आणि जलद असावी. आणि आंतरपीक हे सर्व जमीन झाकणार असावं.

6) जर मित्रांनो तुमचं मुख्य पीक हे सूर्यप्रकाशाची तीव्रता सहन करणारा असेल तर मग त्यातला आंतरपीक घेत असताना ही काळजी घ्यायची की त्याला सूर्यप्रकाश लागलाच पाहिजे किंवा सूर्यप्रकाश त्याला पण पाहिजे आणि मुख्य पिकाला जर पाहिजे तर हे दोन पीक जर सारखे राहिले तर ते अवघड होऊ शकतं.

7) जर तुमचं मुख्य पीक जास्त गतीने वाढणार असेल तर आंतरपीक हे हळूहळू वाढणार असलं पाहिजे म्हणजे त्यातला समतोल साधला जाईल किंवा ते व्यवस्थित रित्या येईल.

8) मुख्य पिकाचे पान जर गळणार नसतील तर तुमचा आंतरपीक हे पान गळणार असलच पाहिजे म्हणजे त्याची पान पडली पाहिजे. सोयाबीन असेल तूर असेल तर मित्रांनो आपण कापसामध्ये आंतरपीक घेतो तर कापसाची पानं गळत नाही तर त्यामध्ये घेतले गेलेले हे तुरीचे जे काही अंतर पीक आहे तर या तुरीची पानं गळून पडतात तर हा एक समतोल असला पाहिजे. मुख्य पिकाची पानं गळणार नसतील तर आंतरपीकाची पानं गळलीच पाहिजेत आणि हे जर आठ नियम व्यवस्थित रित्या आंतरपीक घेण्यासाठी आपण पाळले आणि ते जर व्यवस्थित केले तर हे अंतर पीक यशस्वीरित्या येऊ शकते. त्याचबरोबर मुख्य पिकालाही काही हानी होणार नाही आणि दोनही पिक जोमाने येऊ शकतात. मित्रांनो या आठ मुद्द्याचा आपण नक्की विचार केला पाहिजे .

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

Antarpik Paddhat

आंतर पिकाचे फायदे :-

१) सरासरी पेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास देखील आंतरपीक पद्धतीमुळे उत्पादन हमखास येते.

२) सरासरीपेक्षा जास्त पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास जमिनीची धूप कमी करता येते. पाण्याच्या निचरा लवकर होतो.

३) सातत्याने बदलत्या हवामानाच्या दुष्परिणामाची तीव्रता कमी करून जमीन हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होते.

४) जमिनीची भौतिक, जैविक, रासायनिक सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते.

आंतरपिकास खतांची मात्रा:-

आंतरपीक घेताना शिफारसीनुसार रासायनिक खते देणे आवश्यक आहे. अन्यथा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. अशा वेळेस आंतरपीकाचा फायदा दिसून येत नाही. याकरिता मूळ पिकास शिफारसीनुसार आणि आंतरपीकास शिफारशीनुसार मात्रा एक हेक्टर ताटांची संख्या गृहीत धरून घ्यावी .

आपत्कालीन परिस्थितीत आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते:-

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना शेतकऱ्यांनी सलग पीक पद्धतीपेक्षा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. कारण पेरणीपुरता पाऊस चांगला झालेला असला तरी पिकाच्या मधल्या काळात चांगला पाऊस पडेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. संपूर्ण खरीप हंगामात विभागून चांगला पाऊस आला तर दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले मिळते आणि आर्थिक फायदा होतो.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Antarpik Paddhat

Leave a Comment